why men weight increase after marriage: म्हणून त्या कारणामुळे लग्नानंतर पुरुषांना सुटते ढेरी..

0

why men weight increase after marriage: शरीरावरची चरबी ही अलीकडच्या काळातील मोठी समस्या निर्माण झाली आहे. मोबाईलमुळे फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी होत असल्याने, ही समस्या अधिक उद्भवते. मात्र केवळ हे एकच कारण नाही. लठ्ठपणाची अनेक कारणे आहेत. खासकरून पुरुषांना लग्नानंतर ढेरी सुटण्याचे प्रमाण अधिक आहे. तुम्ही पाहिलं असेल, लग्नानंतरच पुरुषांना ढेर सुटते. असं कशामुळे होते? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

अनेकदा आपण पाहतो, लग्नापूर्वी अगदी सडपातळ असणारा पुरुष लग्नानंतर लठ्ठ होतो. हे इतक्या लवकर घडते, की आपल्याला देखील आश्चर्य वाटतं. मात्र शरीरामध्ये हे बदल नक्की कशामुळे होतात? निरोगी आरोग्यासाठी शरीराची व्यवस्थित काळजी घेणे फार आवश्यक आहे. अन्यथा कालांतराने मोठ-मोठे आजार जडतात. जाणून घ्या लग्नानंतर लठ्ठपणा येण्याची कारणे.

लग्नानंतर वजन वाढणे किंवा लठ्ठपणा येणे यासाठी अनेक कारणे जबाबदार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे, लग्नानंतर पुरुषांची झोप कमी होते. पुरेशी झोप झाली नसल्याने, लठ्ठपणा यायला मदत होते. नवीन लग्न झाल्यानंतर, पाहुण्यांची ये जा होते. त्याचबरोबर अनेक नवीन जबाबदाऱ्या देखील अंगावर येऊन पडतात. त्यामुळे पुरेशी झोप होत नाही.

लठ्ठपणा येण्याचे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे, शरीरामध्ये होणारे हार्मोनल बद्दल. जर तुमच्या शरीरामध्ये हार्मोनल बदल झाले, तर तुमचे वजन वाढतं. शरीरामध्ये हे बदल दोन कारणामुळे होतात. एक म्हणजे, वय आणि दुसरं म्हणजे लैंगिक जीवन. अर्थात लग्नानंतर लैंगिक जीवनाला सुरुवात होते. आणि म्हणून पुरुषांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात. हे फक्त पुरुषांच्याच नाही, तर स्त्रियांच्या बाबतीत देखील होतं. आणि म्हणून लग्नानंतर वजन वाढते, आणि ढेर देखील सुटते.

लग्न झाल्यानंतर, अनेक जण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाहीत. फिजिकली ऍक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे देखील वजन वाढायला सुरुवात होते. लग्नाअगोदर आपण आपल्या शरीराची व्यवस्थित काळजी घेत असतो. मात्र लग्न झाल्यानंतर, याकडे दुर्लक्ष होतं. शिवाय व्यायाम करण्यासाठी पुरेसा वेळ देखील मिळत नाही.

लग्नानंतर, आपण पाहतो बऱ्याच वेळा आपण आपल्या पत्नी सोबत बाहेर फिरायला जातो. अनेक वेळा आपण व्हेकेशनवर गेल्यानंतर बाहेरचे पदार्थ खाण्याचा योग येतो. शिवाय आठवड्यातून एकदा बाहेर जेवायला देखील जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. अशी लाईफस्टाईल अर्थात लग्नानंतर वजन वाढण्यास कारणीभूत ठरते.

हे देखील वाचा Mumbai News: लग्नाला न बोलवता जेवायला जाताय का? ही बातमी तुमच्यासाठी आहे; कारण तरुणांची झाली अशी अवस्था..

Job Opportunities: 88 हजार तरुणांना नोकरी; सरकारच्या या वेबसाईटवर जाऊन तुम्हीही करा लगेच अर्ज..

Ration Card: धान्य घेण्यासाठी आता रेशन कार्डची आवश्यकता नाही! फक्त करा हे काम..

Aacharya Chanakya: या महिलांशी लग्न केल्यास घराचा विनाश होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.