Job Opportunities: 88 हजार तरुणांना नोकरी; सरकारच्या या वेबसाईटवर जाऊन तुम्हीही करा लगेच अर्ज..

0

Job Opportunities: महागाई (inflation) दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने, आता प्रत्येकाला रोजगार (employment) असणे फार गरजेचे बनले आहे. बेरोजगारीने देखील उच्चांक गाठला असल्याने नोकरी मिळवणं हे अनेकांपुढचे मोठे आव्हान असलं तरी आता तर केंद्र सरकारने या संदर्भात मोठी पावले उचलली आहेत. रोजगार उद्योजकता, नाविन्यता, कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी जानेवारीपासून मे पर्यंत तब्बल 88 हजार आठ उमेदवारांना नोकरी देण्यात आल्याची माहिती दिली आहे. (Rojgar maha swayam)

सरकारने यासंदर्भात एक पोर्टल सुरू केले असून, या पोर्टलद्वारे इच्छुक उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. या वेबसाईटवर इच्छुकांनी रजिस्टर केल्यानंतर त्यांना नोकरी देण्यात येणार आहे. सरकारने बेरोजगार तरुणांची सांगड कॉर्पोरेट संस्था, त्याचबरोबर अनेक कंपन्याशी घालून दिली आहे. सरकारने जारी केलेल्या पोर्टलवर उमेदवारांना रजिस्टर करावे लागणार आहे. त्यानंतर उमेदवाराच्या कौशल्यानुसार त्याची निवड बड्या कंपन्या आणि कॉर्पोरेट संस्था करणार आहेत. ही निवड ऑफलाईन आणि ऑनलाईन रोजगार मेळाव्या (rojgar melava) अंतर्गत केली जाईल.

बेरोजगार उमेदवार त्याचबरोबर मोठमोठ्या कंपन्या उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यात आली आहे. ही सांगड घालण्यासाठी https://rojgar.mahaswayam.gov.in हे पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे. नोकरीसाठी इच्छूक असणारे उमेदवार या वेबसाईटवर जाऊन आपल्या कामाचा अनुभव, शिक्षण त्याचबरोबर कौशल्य सगळ्यांची माहिती सबमिट करतात.

उमेदवारांनी आपल्या कॉलिफिकेशन विषयीची सर्व अपडेट नोंदणी केल्यानंतर मोठमोठ्या कॉर्पोरेट संस्था, उद्योजक, कंपन्या त्यांना आवश्यक असणाऱ्या गुणवंत उमेदवारांचा शोध या वेबसाईटवरून घेतात. ज्या मुलाची गुणवत्ता चांगली असेल, आणि आपल्या कंपनीसाठी जो उमेदवार योग्य असेल, त्याची निवड या वेबसाईटवरून कॉर्पोरेट संस्था करतात. जर तुम्हाला देखील नोकरीची नोंदणी करायची असेल, तर तुम्ही सरकारच्या या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करू शकतात.

नोकरीची संधी

आतापर्यंत या वेब पोर्टलवर एक लाख चार हजार 695 खाजगी त्याचबरोबर सार्वजनिक उद्योजकांनी नोंदणी केलेली आहे. हे सर्व उद्योजक आपल्याला आवश्यक असणाऱ्या उमेदवारांच्या भरतीची प्रक्रिया ऑफलाईन आणि ऑनलाइन पद्धतीने राबवतात. यामध्ये अनेक कौशल्य विकास उपक्रम घेतले जातात. ऑनलाइन रोजगार मेळावे देखील घेतले जातात. साहजिकच त्यामुळे बेरोजगार तरुणांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. अशी माहिती मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.

जानेवारी ते मे या पाच महिन्यांमध्ये तब्बल 61 लाख 6 हजार 58 बेरोजगार तरुणांनी नोकरीसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये नाशिक विभागामध्ये नऊ लाख 47 हजार 746 तरुणांचा समावेश आहे तर मुंबईमध्ये दहा लाख 37 हजार 747 तरुणांनी नोंदणी केली आहे. औरंगाबाद विभागामध्ये हे बारा लाख 5 हजार 687, नागपूर विभागामध्ये आठ लाख 51 हजार 301, पुणे विभागामध्ये 14 लाख 27 हजार 617 बेरोजगार तरुणांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे.

सरकार राबवत असलेल्या उपक्रमांतर्गत तुम्हाला देखील नोकरी करायची असेल तर सरकारने जरी केलेल्या पोर्टलवर जाऊन नोकरीसाठी नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी तुमचा मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://rojgar.mahaswayam.gov.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर या विभागाची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. तुमच्या कौशल्याविषयीची सविस्तर अपडेट या वेबसाईटवर सबमिट करून तुम्ही नोकरीसाठी नोंदणी करू शकता.

हे देखील वाचा Ration Card: धान्य घेण्यासाठी आता रेशन कार्डची आवश्यकता नाही! फक्त करा हे काम..

Chanakya Niti: मार्ग कितीही खडतर असू द्या, फक्त चाणक्याचे हे शब्द ध्यानात ठेवा; यश लोटांगण घालेलच..

Suhana Khan: शाहरूखची मुलगी करणार शेती, एवढ्या कोटींची खरेदी केली जमीन; जाणून घ्या कुठल्या भागात घेतली शेती

Animal Emotional video: लेकराला वाचवण्यासाठी हरणाने मानवाकडे अशी मागितली मदत; पाहा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ..

Success Story: शाब्बास..! लाल केळीतून 35 लाख उत्पन्न, वाचा इंजिनियर तरुणाची यशोगाथा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.