Animal Emotional video: लेकराला वाचवण्यासाठी हरणाने मानवाकडे अशी मागितली मदत; पाहा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ..

0

Animal Emotional video: माणसांपेक्षा प्राणी अधिक संवेदनशील आणि भावनिक असतात. याची असंख्य उदाहरणे तुम्हाला देखील माहिती असतील. सोशल मीडियावर (social media) प्राण्यांचे अनेक रुदयस्पर्शी व्हिडिओ (video) तुम्ही पाहिले असतील. मात्र सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जो तुमच्या हृदयाला स्पर्श तर करेलच, मात्र आई म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तरही देईल.

जगात आई शिवाय निस्वार्थी प्रेम करणारं कोणीही नाही. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आपल्या मुलासाठी जीव अर्पण करणारी या जगात एकमेव व्यक्ती म्हणजे आई. मग ती कोणत्याही प्राण्याची असो. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक हरीण आपल्या लेकराला वाचवण्यासाठी चक्क मानवाची मदत मागत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर (social media) सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्या व्हिडिओमध्ये एक हरीण रस्त्याच्या मध्यभागी उभा असल्याचं पाहायला मिळत आहे. हरणाच्या आजूबाजूने वाहनांची ये जा होत असताना देखील हरिण किंचितही घाबरत नसल्याचं पाहायला मिळत आहे. ते हरिण मानवाला जणू काही सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत.

अचानक एक गाडी हरणा जवळ येऊन थांबते. गाडीतून एक मनुष्य हरणा जवळ जातो. हरीण त्या मनुष्याला काहीतरी सांगत असल्याचा भास तुम्हाला देखील जाणवतो. मला काय म्हणायचं आहे? हे पटवून देण्यात हरीण यशस्वी होतं. हरीण पुढे आणि त्याच्या पाठीमागे मनुष्य जात असताना या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता. अखेर हरीण त्या मनुष्याला आपल्या लेकरा जवळ घेऊन जातं.

त्या मनुष्याला फुटबॉलच्या जाळीमध्ये हरणाचे लेकरू सापडल्याचे पाहायला मिळतं. यावर त्याच्या लक्षात येतं, त्याची आई आपल्या लेकराला वाचवण्यासाठी मानवाकडे मदत मागण्यासाठी रस्त्यावर आली होती. अखेर तो मनुष्य हरणाचं लेकरू व्यवस्थित बाहेर काढतो. हरणाचं लेकरू बाहेर काढल्यानंतर, त्याच्या आईचा आनंद गगनात मावेनासा होतो. हे तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता.

पिल्लाने मानले आभार..

हरणाच्या पिल्लाचे जीव वाचवल्यानंतर हरणाचं पिल्लू देखील किती कृतज्ञ आहे, हे तुम्ही या व्हिडिओच्या शेवटी पाहू शकता. आपला जीव माणसाने वाचवल्यामुळे, हरणाचे पिल्लू मानवासमोर अक्षरशः नतमस्तक झाल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ फारच हृदयस्पर्शी असून, मानवापेक्षा अधिक संवेदनशीलता प्राण्यांमध्ये असते. हे पुन्हा एकदा सिद्ध करणारा हा व्हिडिओ आहे.

हे देखील वाचा Snake rabbit viral video: ससा आणि सापाच्या झुंजीचा थरारक व्हिडिओ; शेवट पाहून..

Success Story: शाब्बास..! लाल केळीतून 35 लाख उत्पन्न, वाचा इंजिनियर तरुणाची यशोगाथा..

Panjab Dakh Havaman Andaj : पंजाब डक यांनी सांगितले या तारखेपासून पडणार जोरदार पाऊस;एवढंच नव्हे तर..

WI vs IND Test Series: विराट कोहलीच्या नेतृत्वात BCCI ने कसोटी संघ केला जाहीर; पुजारासह या खेळाडूंना मिळाला डच्चू, तर गिल उपकर्णधार..

Chanakya Niti on Humanity: या चार लोकांची साथ वेळीच सोडा, नाहीतर आयुष्य उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.