Suhana Khan: शाहरूखची मुलगी करणार शेती, ‘एवढ्या’ कोटींची खरेदी केली जमीन; जाणून घ्या कुठल्या भागात घेतली शेती
शाहरुख खानची (Shahrukh Khan) ओळख बॉलीवूडचा बादशाह अशी आहे. शाहरुख नेहमी या ना त्या कारणाने सतत चर्चेत असतो. मध्यंतरी त्याचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात चांगलाच अडकला होता. त्यांनतर कित्येक महिने आर्यन खान प्रकरण मीडियामध्ये चर्चेचा विषय ठरला होता. आर्यन खानला तुरुंगात देखील राहावं लागले होते. ते प्रकरण कुठे ना कुठे शांत झाले, त्यानंतर काही दिवसातच शाहरूखचा पठाण हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमातील एका गाण्याच्या चित्रीकरणात दीपिका पदुकोणने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीवरून शाहरुख चांगलाच अडचणीत सापडला होता.
परंतु सध्या शाहरूखची मुलगी (Shahrukh Khan Daughter) चर्चेत आली आहे. मध्यंतरी सुहाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. लवकरच जोया अख्तरच्या द आर्चीज या सिनेमातून ती बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अशातच आता शाहरुखच्या मुलीने शेती खरेदी केल्याची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरत आहे. विशेष म्हणजे तिने ही जमीन खरेदी करताना तिने शेतकरी असा उल्लेख केला आहे. साहजिक यामुळे आता सुहाना खान शेती करणार अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
इंटीमेट सीन्सचा भरणा असणारा आणखी एक ट्रेलर रिलीज; तम्मनाने पार केल्या साऱ्या सीमा, बातमी येथे वाचा
गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीचे व्यवहार झाले आहेत. अनेक बड्या कलाकार, तसेच खेळाडू यांनी देखील जमिनी घेटल्या आहेत. बॉलीवूडची दमदार अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा पती क्रिकेटपटू विराट कोहली यांनी देखील काही महिन्यांपूर्वी जमिनीचा व्यवहार केला आहे. या दोघांनी अलिबागमध्ये 8 एकर शेती विकत घेतली होती. ही शेती 19 कोटी 24 लाखांना त्यांनी विकत घेतली होती. अलिबाग आणि तेथील आसपासच्या भागांमध्ये अनेक बड्या कलाकारांची जमीन आहे.
अलिबाग येथील थालगावात सुहाना खानने जमीन विकत घेतली आहे. या जमिनीमध्ये 1750 स्क्वेअर फुटमध्ये एक घर देखील असल्याची माहिती मिळाली आहे. सुहाना खानने दीड एकर जमीन (1.5) विकत घेतली आहे. या जमिनीची किंमत कोट्यावधींच्या घरात आहे. ही जमीन समुद्रकिनाऱ्या लगतच आहे. या परिसरातच बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांची घरे आहेत. तसेच सचिन तेंडुलकर यांचे देखील घर याच परिसरात आहे. रोहित शर्मा, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण यांची घरे देखील या ठिकाणी आहेत.
सुहानाच्या जमिनीची किंमत किती?
सुहानाने (Suhana Khan) खरेदी केलेल्या दीड एकर जमिनीची किंमत तब्बल 12 कोटी आणि 91 लाख एवढी आहे. मिळालेल्या माहितीनुसार या जमिनीचे सर्व व्यवहार पार पडले आहेत. तसेच महसूल विभागाकडे 1 जून रोजी या जमिनीची नोंदणी झालेली आहे. या जमिनीच्या व्यवहाराची 77 लाख 46 हजारांची स्टॅम्प ड्युटी देखील भरण्यात आली असल्याची माहिती आहे.
सुहाना खानने ही जमीन तिच्या जवळच्याच बहिणींकडून विकत घेतली आहे. ज्या भागात सुहाना खानने शेती विकत घेतली आहे, त्या भागामध्ये शाहरुखचा एक बंगला देखील आहे. याच बंगल्यामध्ये शाहरुख खानने त्याचा 52 वा वाढदिवस साजरा केला होता. सुहाना खान या जमिनीमध्ये शेती करणार की नाही, याबाबत कुठलीही माहिती मिळाली नाही. या जागेची नोंदणी शेतजमीन अशीच आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुहाना खान या ठिकाणी शेती करताना पाहायला मिळाली तर नवल वाटायला नको.
Ration Card: धान्य घेण्यासाठी आता रेशन कार्डची आवश्यकता नाही! फक्त करा हे काम..
Chanakya Niti About Parenting : या 10 गोष्टींची काळजी पालकांनी घेतली पाहिजेच, अन्यथा होईल सत्यानाश
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.