Chanakya Niti Quotes: जवानीत या तीन गोष्टींपासून दूर राहा, अन्यथा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही..

0

Chanakya Niti Quotes: आपल्या मुलाने जीवनामध्ये यशस्वी व्हावं, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्यासाठी अनेकजण लहानपणापासूनच चांगल्या सवयी आणि संस्कार करण्याचे काम करतात. मात्र तरीदेखील मुलगा मोठा झाल्यानंतर, अपेक्षेप्रमाणे यशस्वी होत नाही. किंवा वाईट मार्गाने आपला प्रवास सुरू करतो. जीवनात यश मिळवण्यासाठी तरुण वयात काही गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यावी लागते. अन्यथा तुमच्या आयुष्याचा कधी सत्यानाश झाला, हे तुम्हाला देखील कळत नाही. (Chanakya Niti on youngster)

आचार्य चाणक्य (aacharya Chanakya) थोर विद्वान होते. आपल्या चाणक्य नीति (Chanakya Niti) या ग्रंथांमधून त्यांनी आयुष्यासंबंधी अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. चाणक्य नीति जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अवलंबली, तर तुम्ही हमखास यश मिळवू शकतात. मनुष्याने जीवनात यश मिळवण्यासाठी तारुण्यात तीन गोष्टींपासून दूर राहावं, असं चाणक्य सांगतात. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या तीन गोष्टी.

तुमची संगत ही तुमच्या जीवनाची चावी असते. जर तुम्हाला योग्य लोकांची संगत लाभली, तर तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी होऊ शकता. जीवनात तुम्हाला कोणाचीच संगत लाभली नसेल तरीदेखील तुम्ही यश मिळवू शकता. मात्र जर तुमची संगत चुकली असेल तर मात्र गुणवत्ता असून देखील तुमची माती झालेली तुम्हाला कळणार देखील नाही. खास करून तुमच्या तारुण्यामध्ये.

आळस हा माणसाचा शत्रू असतो. हेच वाक्य तुम्ही लहानपणापासून वाचत ऐकत आला आहात. आचार्य चाणक्य (aacharya Chanakya) देखील सांगतात, ज्या मनुष्यामध्ये आळस असतो, असा मनुष्य जीवनामध्ये कधीच यशस्वी होऊ शकत नाही. तुमच्या तारुण्याध्ये आळस चुकूनही तुम्हाला शिवता कामा नये. तारुण्यामध्ये जर तुम्हाला आळसाने जखडलं, तर तुमच्या ज्ञानात किंचितही भर पडत नाही. जर तुमच्याकडे ज्ञान नसेल, तर तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही.

राग आणि भीक माग! हा उच्चार तुम्ही थोरामोठांकडून अनेकदा ऐकला असेल. खासकरून खेडेगावात. राग हा माणसाचा शत्रू आहे. जर तुमच्यामध्ये राग असेल, तर तुम्हाला तुमच्या बुद्धीचा वापर तो कधीच करू देत नाही. ज्या माणसांमध्ये क्रोध असतो, अशा लोकांजवळ कोणीही येत नाही. आणि म्हणून प्रगती आणि संघर्ष करण्याच्या काळात तुमच्यामध्ये राग नसायला हवा. असं आचार्य चाणक्य सांगतात.

हे देखील वाचा Guru Purnima 2023: या  राशींच्या लोकांचा सुरू होणार सुवर्ण काळ; जाणून घ्या गुरुपौर्णिमेचे महत्त्व..

Viral video: ..होय लागोपाठ तीन मोटार सायकल अंगावरून जाऊनही चिमुकली वाचली; पाहा थरकाप उडणारा व्हिडिओ..

Dog Viral video: शिकार करायला गेलेल्या कुत्र्यांचा झाला करेक्ट कार्यक्रम; पाहा गाढवाचा पराक्रम..

Chanakya Niti: मार्ग कितीही खडतर असू द्या, फक्त चाणक्याचे हे शब्द ध्यानात ठेवा; यश लोटांगण घालेलच..

Aacharya Chanakya: या महिलांशी लग्न केल्यास घराचा विनाश होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.