Shark Eats Man video: शार्क माशाने माणसाला गिळले जिवंत; पाहा दोघांचा थरारक व्हिडिओ..

0

Shark Eats Man video: सोशल मीडियावर (social media) रोज काही ना काही व्हायरल होत असतं. खास करून प्राण्यांचे व्हिडिओ नेहमी व्हायरल होतात. परंतु सोशल मीडियावर सध्या असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुमचा थरकाप उडेल. समुद्रकिनाऱ्यावर पोहण्याचा आनंद घेत असताना एका रशियन माणसाला शार्क माशाने अक्षरशः जिवंत गिळले आहे. (Shark Eats Russian Man viral video)

शार्क मासा किती खतरनाक असतो हे तुम्ही अनेक चित्रपटांमधून पाहिलं असेल. शार्क माणसाला जिवंत गिळतो. यासंदर्भातली अनेक दृश्य अनेक चित्रपटांमधून दाखवली आहेत. मात्र प्रत्यक्षात तुम्ही शार्क माशाने माणसाला जिवंत गिळल्याचे क्वचितच पाहिलं असेल. समुद्राच्या किनाऱ्यावर एका माणसाला शार्कने जिवंत गिळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शार्क माशाच्या तावडीत सापडणारा मनुष्य स्वतःला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करतो, मात्र शार्क पुढे त्याचं काहीही चालत नाही.

कुठला आहे व्हिडिओ?

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ इजिप्तच्या हुरघाडामधील रेज सी रिसॉर्ट या शहरातील असल्याचं इजिप्तच्या पर्यावरण मंत्रालयाने म्हटलं आहे. सोबतच मृत पावलेला व्यक्ती हा रशियन नागरिक असल्याचा देखील खुलासा इजिप्तच्या पर्यावरण मंत्रालयाने केला आहे.

कसा झाला हल्ला

एक रशियन नागरिक समुद्रकिनाऱ्यावर पोहण्याचा आनंद घेत होता. मात्र अचानक शार्क मासा त्याच्याजवळ आला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ तो व्यक्ती पोहोचताना शार्क जवळ येत असल्याचं देखील दिसत आहे. शार्क माशाने हल्ला केल्यानंतर तो स्वतःला वाचवण्यासाठी ओरडू देखील लागला.

रशियन नागरिक स्वतःला वाचवण्यासाठी मोठमोठ्याने ओरडत असल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर दोन-तीन वेळा तो माशाच्या तावडीतून देखील सुटून पोहत किनाऱ्यावर जवळ येण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्याच्या मदतीला पाठीमागे एक व्यक्ती बोट देखील घेऊन येत असल्याचं दिसत आहे. मात्र तोपर्यंत शार्क मासा रशियन नागरिकाला जिवंत गिळून देखील टाकतो.

हे देखील वाचा shubman gill: सारा नव्हे या पोरीच्या प्रेमात पागल आहे शुभमन गिल? त्या फोटोमुळे झाला भांडाफोड..

Ileana dCruz: अखेर इलियानाच्या बाळाचा पिता समजला; bollywod च्या स्टार अभिनेत्याचे नाव आले समोर..

Vastu Tips: अशा ठिकाणी घर बांधल्यास व्हाल बर्बाद, जाणून घ्या घर बांधण्याचे योग्य ठिकाण..

Health Tips: पाणी पिण्याच्या या तीन आहेत सर्वात घातक वेळा; वेळीच थांबला नाहीत तर..

Asia Cup 2023: पाकिस्तानमध्ये होणार सामने; भारत पाकिस्तान तीन वेळा होणार लढत, वाचा सर्व डिटेल्स..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.