Vastu Tips: अशा ठिकाणी घर बांधल्यास व्हाल बर्बाद, जाणून घ्या घर बांधण्याचे योग्य ठिकाण..

0

Vastu Tips: सुंदर घर (beautiful house) हे प्रत्येकाचे स्वप्न असतं. आपल्या स्वप्नातलं घर बांधण्यासाठी अनेक जण दिवस रात्र मेहनत देखील करतात. प्रचंड मेहनत करून आपल्या स्वप्नातलं घर बांधण्याचे स्वप्न अनेकांचे पूर्ण देखील होतं. मात्र घर बांधताना तुम्ही काही गोष्टींविषयी जाणून घेणे फार आवश्यक आहे. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे घर कुठे बांधायला हवं? जर तुम्ही योग्य ठिकाणी घर बांधले नाही तर आयुष्यभर तुम्हाला पश्चातापाशिवाय पर्याय राहणार नाही. (Vastu tips for home)

आचार्य चाणक्य (aacharya Chanakya) हे थोर विद्वान होते. अर्थशास्त्र आणि नितीशास्त्राचे जनक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. समाजात आजही आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या नीतीशास्त्राचा अवलंब करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळते. मनुष्याने घर कुठे बांधायला हवं, याविषयी देखील आचार्य चाणक्य यांनी सविस्तर भाष्य केले आहे. जाणून घेऊया सविस्तर. (Aacharya Chanakya Chanakya Niti)

उपजीविका

घरात सुख-समृद्धी आणि शांती प्रत्येकाला हवी असते. यासाठी आचार्य चाणक्य यांनी कानमंत्र दिला आहे. आचार्य चाणक्य म्हणतात, जिथे तुमच्या कुटुंबाचे व्यवस्थित पालन पोषण उदरनिर्वाह होणार नाही, अशा ठिकाणी चुकूनही घर बांधू नये. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी घर बांधणार आहेत, त्या ठिकाणी जर तुमच्या रोजगाराचा प्रश्न उद्भवणार असेल, तर अशा ठिकाणी घर बांधणे मूर्खपणाचे ठरते. आचार्य चाणक्य म्हणतात, तुम्ही अशा ठिकाणी घर बांधायला हवं ज्या ठिकाणी तुमच्या उदरनिर्वाहाचे साधन असते.

मूल्य आणि तत्वे 

याबरोबरच आचार्य चाणक्य म्हणतात, ज्या ठिकाणी तुम्ही घर बांधणार आहात त्या परिसरात जर लोकांना लज्जेची भीती नसेल, तर अशी जागा तुम्ही घर बांधण्यासाठी कदापिही निवडू नये. तुम्ही ज्या ठिकाणी घर बांधणार आहात, त्या परिसरात तत्त्व आणि मूल्य पाळली जात असतील तर घर बांधावे, अन्यथा तुमच्या आयुष्याचा उतरता काळ सुरू होऊ शकतो.

त्यागाची भावना

चाणक्य सांगतात, मनुष्याने आपले घर अशा ठिकाणी बांधायला हवे जिथे परोपकारी लोक त्याचबरोबर त्यागाची भावना असणारे लोक राहतात. आचार्य चाणक्य सांगतात, ज्या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीची लोकं राहतात त्याचबरोबर कायद्याला जी मंडळी अजिबातही घाबरत नाहीत, अशा लोकांमध्ये आपलं घर बांधणे म्हणजे वाईट काळाची सुरुवात असते. जी लोक दानधर्म आणि पुण्यकर्मावर विश्वास ठेवतात. अशा लोकांमध्ये जर आपलं घर असेल तर आपल्याला आध्यात्मिक शांती मिळते. असं आचार्य चाणक्य सांगतात.

हे देखील वाचा Asia Cup 2023: पाकिस्तानमध्ये होणार सामने; भारत पाकिस्तान तीन वेळा होणार लढत, वाचा सर्व डिटेल्स..

Chanakya Niti: ही तीन कामे केल्यामुळे अफाट कष्ट करूनही लक्ष्मी राहते सदैव नाराज..

Chanakya Niti: सुखी संसारासाठी या गोष्टी आपण केल्याचं पाहिजेत, अन्यथा लागेल संसाराची वाट

Ileana dCruz: अखेर इलियानाच्या बाळाचा पिता समजला; bollywood च्या स्टार अभिनेत्याचे नाव आले समोर..

INDvsWI T20I Series: रोहित, विराटला टी ट्वेंटी संघातून कायमस्वरूपी डच्चू; IPL गाजवणाऱ्या पाच खेळाडूंना संघात स्थान..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.