INDvsWI T20I Series: रोहित, विराटला टी ट्वेंटी संघातून कायमस्वरूपी डच्चू; IPL गाजवणाऱ्या पाच खेळाडूंना संघात स्थान..

0

INDvsWI T20I Series: 2013 पासून आयसीसी स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी निराशा जनक राहिली आहे. 2017मध्ये झालेल्या चॅम्पियन ट्रॉफी फायनलमध्ये भारतीय संघ पोहोचला होता. मात्र फायनलमध्ये पाकिस्तान संघाकडून पराभव करावा लागला. त्यानंतर भारतीय कसोटी संघ सलग दोन वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचला. मात्र न्युझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघाकडून भारताला लागोपाठ पराभव पत्करावा लागला. अशातच आता बीसीसीआयने अनेक नवीन खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

रोहित, विराटची कायमस्वरूपी हकालपट्टी

सलग दोन टी-ट्वेंटी विश्वचषकात भारतीय संघाची सुमार कामगिरीमुळे राहिली. आणि म्हणून अनेक सीनियर खेळाडूंना टी-ट्वेंटी संघातून कायमस्वरूपी दूर करण्यात आलं आहे. 12 जुलैपासून सुरू होणाऱ्या वेस्टइंडीज दौऱ्यातील t20 संघात देखील रोहित विराट यांना संधी देण्यात येणार नाही. एक प्रकारे रोहित-विराट दोघांनाही टी-ट्वेंटी संघातून वगळण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

हार्दिक पांड्याने आपल्या कर्णधार पदाची चुणूक आयपीएलमध्ये दाखवली. याचा फायदा त्याला झाल्याचं स्पष्ट होत आहे. सिनियर खेळाडूंच्या अप्रोचवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याने, बीसीसीआयने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात टी-ट्वेंटी संघ बांधायला सुरुवात केली आहे. वेस्टइंडीज दौऱ्यावर खेळण्यात येणाऱ्या पाच टी ट्वेन्टी सामन्यात अनेक नवीन खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे.

या पाच खेळाडूंना टी ट्वेंटी संघात संधी

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केलेल्या पाच खेळाडूंना वेस्टइंडीज विरुद्ध होणाऱ्या टी20 सामन्याच्या मालिकेत स्थान मिळणार आहे. रिंकू सिंग, यशस्वी जयस्वाल, जितेश शर्मा, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड या पाच खेळाडूंना वेस्टइंडीज विरुद्ध होणाऱ्या टी-20 संघात स्थान मिळणार असल्याची माहिती आहे.

या खेळाडूंची संधी हुकली

आयपीएल 2023 मध्ये ज्या खेळाडूंची चांगली कामगिरी झाली नाही अशांची संधी वेस्टइंडीज दौऱ्यावर जाण्याची संधी हुकणार आहे. यामध्ये संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी, पृथ्वी शॉ, या खेळाडूंचा समनवेश असण्याची शक्यता आहे. आयपीएल अगोदर न्युझीलंड विरूद्ध झालेल्या टी-ट्वेंटी मालिकेत या खेळाडूंना संधी देण्यात आली होती. मात्र आता वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेत संधी मिळणार नसल्याचे वृत्त आहे.

हे देखील वाचा Marriage Tips: लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याकडून पत्नीला हव्या असतात या चार गोष्टी..

WTC Final 2023: WTC पराभवामुळे तीन खेळाडूंना कसोटी संघातून डच्चू; या खेळाडूंची लागली लॉटरी..

India Tour Of West Indies 2023: कर्णधार पदावरून रोहितची हकालपट्टी; हा तंत्रशुद्ध फलंदाज कसोटीचा नवा कर्णधार..

NCL Recruitment 2023: या उमेदवारांना NCL इंडिया लिमिडेटमध्ये नोकरीची मोठी संधी..

Flipkart Big Saving Days Sale 2023: फक्त दोनच दिवस शिल्लक! फ्लिपकार्टवर हे स्मार्टफोन मिळतायत निम्म्या किंमतीत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.