Marriage Tips: लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याकडून पत्नीला हव्या असतात या चार गोष्टी..

0

Marriage Tips: भारतीय संस्कृतीमध्ये (Indian culture) लग्नाला (marriage) खूप महत्त्व आहे. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा टप्पा असतो. लग्न म्हणजे दोन अनोळखी व्यक्ती आयुष्यभरासाठी एकत्र येतात. अर्थात लग्न हे दोन्ही जीवांचे मिलन असल्याने लग्नाला अनन्य साधारण महत्त्व आहे. असलं तरी देखील मी तुमच्या जोडीदाराची योग्य काळजी घेतली नाही, तर आयुष्य उध्वस्त व्हायला देखील वेळ लागत नाही. (Marriage is most important thing is life)

लग्नासाठी फक्त नवरा-नवरी (husband wife) दोघेच उत्सुक नसतात. तर दोन्हीं कुटुंबाच्या सदस्यांना देखील लग्नाची प्रचंड उत्सुकता असते. याबरोबरच नवरीच्या मनात काही प्रश्न देखील असतात. अर्थात चांगला पती म्हणून तिच्या प्रश्नाने निरसन करण्याची जबाबदारी नवरा म्हणून तुमच्यावर असते. अनेकदा आपण पाहतो, लग्न झाल्यानंतर पहिल्या रात्री नवरा पत्नीकडे शारीरिक संबंधाची अपेक्षा ठेवतो. यात गैर देखील काही नाही. मात्र पहिल्या रात्री पत्नीला तुमच्याकडून वेगळ्याच अपेक्षा असतात, जाणून घेऊया सविस्तर.

मुलांपेक्षा मुलींसाठी लग्न हे खूप आव्हानात्मक असते. एका नवीन कुटुंबात वावरण्याचं मोठं आव्हान आणि जबाबदारी मुलीसमोर असते. या सगळ्या प्रश्नांचे काहूर मुलीच्या मनामध्ये माजलेलं असतं. लग्नानंतर नवरा वगळता घरातील सगळे सदस्य मुलीसाठी नवीन असतात. आणि म्हणून तुम्ही पत्नीच्या मनात असणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरे लग्नाच्या पहिल्या रात्री देणे अपेक्षित असते.

लग्नानंतर जेव्हा तुम्ही पहिल्या रात्री नवरी जवळ जाल तेव्हा तुम्ही काहीतरी गिफ्ट घेऊन नवरी जवळ जाणे आवश्यक आहे. अशी अपेक्षा देखील नवरीची असते. यामुळे संवाद साधण्यास मदत होते. एखादा सुगंधित परफ्युम, साडी, गजरा यासारख्या वस्तू तुम्ही नवरीला पहिला रात्री भेट म्हणून देऊ शकता. यामुळे नवरीच्या मनात असणारी भीती कमी होते. आणि तिच्या मनात असणारे प्रश्न ती तुम्हाला विचारू शकते.

कोणत्याही नात्यांमध्ये संवाद फार महत्त्वाचा असतो. संवादामुळे तुम्ही भावनिकरित्या जोडला जाता. लग्न झाल्यानंतर पत्नीची देखील हीच अपेक्षा असते. सवादामुळे पत्नीच्या मनात असणारी भीती कमी होईल. संवाद साधताना नेहमी मैत्रिणीच्या नात्यातून तुम्ही संवाद साधावा. अशी पत्नीची देखील इच्छा असते. लग्नाच्या पहिल्या रात्री चुकूनही तुम्ही शारीरिक संबंध ठेवण्याची घाई करू नका.

कोणत्याही नात्यांमध्ये जोपर्यंत भावनिकता येत नाही, तोपर्यंत नात्याला फारसं महत्त्व नसतं. खासकरून पती-पत्नीच्या नात्यामध्ये. आणि म्हणून पत्नीची अपेक्षा असते, पतीने लग्नाच्या पहिल्या रात्री आपल्याशी प्रेमाने गप्पा माराव्यात. माझ्या भावना समजून घेऊन सन्मान करावा. तुम्हाला देखील वैवाहिक आयुष्य सुख समाधानाने घालवायचं असेल, तर लग्नाच्या पहिल्या रात्री पत्नीसोबत प्रेमाने गप्पा मारणे आवश्यक आहे.

लग्नाच्या पहिल्या रात्री पत्नी सोबत संवाद साधताना तुमची पत्नी सर्वगुण संपन्न आहे. हे देखील तुमच्या पत्नीला दाखवून द्या. प्रेमाने गप्पा मारताना तिच्या सौंदर्याचे कौतुक करा. तू घरात आल्याने घरातील सगळेच सदस्य प्रचंड खुश आहेत. याची देखील जाणीव तिला करून द्या. यामुळे तिच्या मनात असणारी भीती संपुष्टात येईल. आणि ती तुमच्याशी एकरूप होईल.

हे देखील वाचा Life Hacks: या ट्रीकचा वापर करा, स्वयंपाक गॅस सिलेंडर चालेल दुप्पट..

Sex Life Tips: सेक्स लाईफचा आनंद द्विगुणित करायचाय? फॉलो करा या चार गोष्टी..

Married life tips: वैवाहिक जीवनातल्या या तीन गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नका, अन्यथा व्हाल बर्बाद..

Marriage Tips: लग्न न करण्याचे गंभीर परिणाम जाणून सरकेल पायाखालची जमीन; समाजाचा दृष्टिकोनही बदलतो..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.