Flipkart Big Saving Days Sale 2023: फक्त दोनच दिवस शिल्लक! फ्लिपकार्टवर हे स्मार्टफोन मिळतायत निम्म्या किंमतीत..

0

Flipkart Big Saving Days Sale 2023: धावपळीच्या जीवनामध्ये ई-कॉमर्स वेबसाईटला (e-commerce website) प्रचंड महत्व प्राप्त झालं आहे. वेळ वाचावा म्हणून प्रत्येकजण ऑनलाईन शॉपिंग (online shopping) करताना पाहायला मिळतो. खास करून फ्लिपकार्ट या ई कॉमर्स वेबसाईट (Flipkart e commerce website) वरून अनेक जण स्मार्टफोनसह (smartphone) अनेक इलेक्ट्रिक (electric) वस्तूंचे खरेदी मोठ्या प्रमाणात करतात. फ्लिपकार्ट ई-कॉमर्स वेबसाईट देखील आपल्या ग्राहकांसाठी वारंवार फ्लिपकार्ट Big Saving Days Sale चे आयोजन करत असते. आपल्या ग्राहकांसाठी Flipkart ने पुन्हा एकदा बिग सेविंग डेज सेलचे आयोजन केले असून, या सेलमध्ये ग्राहकांना निम्म्या किंमतीत स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी आहे. (Flipkart Big seving day’s sale 2023)

फ्लिपकार्ट ई-कॉमर्स वेबसाईटने आपला सेल सुरू केला असून, हा सेल 14 जून पर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना आयफोन (iPhone) सॅमसंग (Samsung) मोटो (Moto) यासह अनेक मोठ्या कंपनीचे स्मार्टफोन डिस्काउंटमध्ये (smartphone discount) खरेदी करण्याची संधी आहे. फ्लिपकार्टने आयोजित केलेल्या सेलची अंतिम तारीख 14 जून असणार आहे. साहजिकच यामुळे ग्राहकांना या संधीचा फायदा उठवण्यासाठी केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत. जाणून घ्या अधिक.

Samsung Galaxy F23 5G

फ्लिपकार्ट बिग सेविंग डे सेलमध्ये Samsung कंपनीचा Galaxy F23 5G हा स्मार्टफोन ग्राहकांना जबरदस्त डिस्काउंटमध्ये खरेदी करता येत आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 17,999 रुपये इतकी आहे. मात्र फ्लिपकार्टवर या सेल अंतर्गत तुम्हाला हा स्मार्टफोन केवळ साडे तेरा हजार रुपयांमध्ये खरेदी करता येत आहे. म्हणजेच या स्मार्टफोन खरेदीवर तुम्हाला साडेसहा हजार रुपयांची सूट मिळत आहे.

याबरोबरच Samsung Galaxy M14 हा स्मार्टफोन देखील तुम्हाला 14 हजार 327 रुपयांना मिळत आहे. त्याचबरोबर Galaxy F13 हा स्मार्टफोन देखील तुम्ही फ्लिपकार्टच्या या सेलअंतर्गत 10 हजार 999 रुपयांना खरेदी करू शकता. जर तुम्ही एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतला तर तुम्हाला फ्लिपकार्टवर हे स्मार्टफोन निम्म्याहून कमी किमतीत मिळत आहेत. मात्र यासाठी तुमचा जुना स्मार्टफोन व्यवस्थित असणे आवश्यक आहे.

iPhone 13

जर तुम्हाला आयफोन अधिक डिस्काउंटवर खरेदी करायचा असेल, तर तुम्हाला यापेक्षा उत्तम दुसरा सेल मिळणार नाही. फ्लिपकार्टच्या बिग सेविंग डेज सेल अंतर्गत iPhone 13 हा स्मार्टफोन तुम्हाला केवळ 58 हजार 749 रुपये किमतीत खरेदी करता येत आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 69 हजार 999 रुपये आहे. म्हणजेच फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये तुम्हाला तब्बल 11 हजार रुपयांहून अधिक डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्ही एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे या स्मार्टफोनचे पेमेंट केल्यास, तुम्हाला अतिरिक्त दहा टक्के डिस्काउंट मिळणार आहे.

हे देखील वाचा Marriage Tips: लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याकडून पत्नीला हव्या असतात या चार गोष्टी..

WTC Final 2023: WTC पराभवामुळे तीन खेळाडूंना कसोटी संघातून डच्चू; या खेळाडूंची लागली लॉटरी..

NCL Recruitment 2023: या उमेदवारांना NCL इंडिया लिमिडेटमध्ये नोकरीची मोठी संधी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.