WTC Final 2023: WTC पराभवामुळे तीन खेळाडूंना कसोटी संघातून डच्चू; या खेळाडूंची लागली लॉटरी..

0

WTC Final 2023: नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये झालेल्या दारून पराभवानंतर आता बीसीसीआयच्या (BCCI) हालचालींना वेग आला आहे. अनेक खेळाडूंना आता बाहेरचा रस्ता दाखवला जाणार असून, खेळाडूंची नावे देखील समोर आली आहेत. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (IND vs AUS WTC Final) अंतिम सामना सामना ओव्हल (oval) मैदानावर पार पडला. परंतु भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये सलग दुसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला.

2013 पासून भारतीय संघाला अद्याप एकही आयसीसी ट्रॉफी (ICC trophy) जिंकता आलेली नाही. आयसीसीच्या नॉक आउट सामन्यात भारतीय संघ वारंवार अपयशी ठरत असल्याने आता बीसीसीआयने मोठी पावले उचलायला सुरुवात केली आहे. याचेच एक पाऊल म्हणून आता चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादव (Cheteshwar Pujara and Umesh Yadav) या दोघांना डच्चू देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. आगामी वेस्टइंडीज दौऱ्यावर या दोघांची निवड केली जाणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

भारताच्या वेस्टइंडीज दौऱ्याला 12 जुलैपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यावर भारत दोन कसोटी, तीन एकदिवसिय आणि पाच टी-ट्वेंटी सामने खेळणार आहे. या दौऱ्यावर बीसीसीआय नवीन खेळाडूंना संधी देणार असून, अनेक सिनियर खेळाडूंना विश्रांती देणार आहे. त्याचबरोबर चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादव या दोन सिनियर खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे. याबरोबरच विकेटकीपर श्रीकर भरतला देखील संघात स्थान दिले जाणार नसल्याची माहिती आहे.

या खेळाडूंना मिळणार संधी

आगामी वेस्टइंडीज दौऱ्यासाठी भारताच्या अनेक नवीन खेळाडूंना संधी मिळणार आहे. आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या तीन खेळाडूंना टी ट्वेंटी संघात स्थान देण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यामध्ये यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग, आणि जितेश शर्माचा समावेश आहे. याशिवाय कसोटी संघात सर्फराज खानला देखील मिडल ऑर्डरमध्ये संधी देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

हार्दिक पांड्या कर्णधार

वेस्टइंडीज दौऱ्यावर होणाऱ्या पाच t20 सामन्याच्या मालिकेसाठी पुन्हा एकदा हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) कर्णधार म्हणून निवड करण्यात येणार आहे. अद्याप अधिकृतरित्या स्पष्ट करण्यात आलं नसलं तरी भारत आगामी टी-ट्वेंटी विश्वचषक हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणारा आहे. आगामी t20 विश्वचषकासाठी आतापासूनच टी ट्वेंटी संघ बांधणीला सुरुवात करण्यात आली असल्याने नवीन खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे.

विराट कोहली रोहित शर्माला स्थान नाही

भारतीय क्रिकेट संघ आगामी टी-ट्वेंटी विश्वचषक हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळणार आहे. टी-ट्वेंटी संघाची आतापासूनच संघ बांधणीला सुरुवात झाली असून, भारताच्या टी-ट्वेंटी संघात रोहित शर्मा (rohit sharma) आणि विराट कोहलीला (Virat kohli) स्थान देण्यात येणार नाही. विराट कोहली, रोहित शर्मा बरोबरच मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, केएल राहुल यांना देखील टी-ट्वेंटी संघात स्थान नसणार आहे.

हे देखील वाचा Marriage Tips: लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याकडून पत्नीला हव्या असतात या चार गोष्टी..

NCL Recruitment 2023: या उमेदवारांना NCL इंडिया लिमिडेटमध्ये नोकरीची मोठी संधी..

Married life tips: वैवाहिक जीवनातल्या या तीन गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नका, अन्यथा व्हाल बर्बाद..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.