India Tour Of West Indies 2023: कर्णधार पदावरून रोहितची हकालपट्टी; हा तंत्रशुद्ध फलंदाज कसोटीचा नवा कर्णधार..

0

India Tour Of West Indies 2023: नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC final 2023) ऑस्ट्रेलियाने भारताचा दारुण पराभव केला. पहिल्या दिवसापासूनच भारत बॅक फुटवर गेला तो परत सामन्यात येऊच शकला नाही. क्रिकेट विश्लेषकांनी ऑस्ट्रेलिया फेवरेट असल्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र भारत इतका खराब खेळ करेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. रोहितचा टॉस जिंकून प्रथम शेत्रक्षण करण्याचा निर्णय हा सपशेल चुकीचा होता, असं मत अनेकांनी व्यक्त केलं. पराभवानंतर आता रोहित शर्मावर जोरदार टीका होत असतानाच, आणखी एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. (Ajinkya Rahane test captain of West Indies tour)

आगामी वेस्टइंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड येत्या दोन दिवसात होणार असून, अनेक प्रमुख खेळाडूंना या दौऱ्यातून वगळण्यात येणार आहे. 18 महिन्यानंतर कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) बढती मिळाली असून, वेस्टइंडीज विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी अजिंक्य रहाणेला कर्णधार पदाची धुरा देण्यात आली आहे. या संदर्भात अधिकृत घोषणा झाली नसती, तरी खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे.

12 जुलै पासून वेस्टइंडीज दौऱ्याला सुरुवात होणार आहे. भारत या दौऱ्यामध्ये दोन कसोटी तीन एकदिवसीय आणि पाच टी-ट्वेंटी सामने खेळणार आहे. टी-ट्वेंटी संघाच्या कर्णधारपदी पुन्हा एकदा हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) निवड केली जाणार आहे. वेस्टइंडीज विरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यासाठी अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद देण्यात येणार असून, विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमीसह काही वरिष्ठ खेळाडूंना या दौऱ्यातून विश्रांती देण्यात येणार आहे.

रोहित शर्माच्या कामगिरीवर बीसीसीआय संतुष्ट नसल्याची माहिती समोर आली आहे. रोहित व्यतिरिक्त पूर्णवेळ कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार कोण असायला हवा, या संदर्भात चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. वेस्टइंडीज विरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यासाठी सलामीविर म्हणून यशस्वी जयस्वालचे नाव चर्चेत आहे. तर मधल्या फळीमध्ये सरफराज खानला संधी देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

प्रमुख खेळाडूंना विश्रांती

आगामी विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून भारतीय संघाच्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आहे. एकदिवसीय विश्वचषक याच वर्षी होणार असल्याने, वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत रोहित शर्मा कर्णधाराच्या भूमिकेत, तर प्रमुख खेळाडू देखील या मालिकेत सहभाग घेणार आहेत. मात्र टी ट्वेंटी मालिकेत प्रमुख खेळाडूंशिवाय हार्दिक पांद्याच्या नेतृत्त्वात भारत पाच t20 सामन्याची मालिका खेळणार आहे.

हे देखील वाचा WTC Final 2023: WTC पराभवामुळे तीन खेळाडूंना कसोटी संघातून डच्चू; या खेळाडूंची लागली लॉटरी..

Marriage Tips: लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याकडून पत्नीला हव्या असतात या चार गोष्टी..

NCL Recruitment 2023: या उमेदवारांना NCL इंडिया लिमिडेटमध्ये नोकरीची मोठी संधी..

Flipkart Big Saving Days Sale 2023: फक्त दोनच दिवस शिल्लक! फ्लिपकार्टवर हे स्मार्टफोन मिळतायत निम्म्या किंमतीत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.