Chanakya Niti: सुखी संसारासाठी या गोष्टी आपण केल्याचं पाहिजेत, अन्यथा लागेल संसाराची वाट

0

Chanakya Niti: कित्येक वर्षांपूर्वी चाणक्यांनी लिहिलेल्या नीतिशास्त्रातील (Chanakya Niti) गोष्टी आज तंतोतंत जुळतात. आज आपण वैवाहिक जीवनातील आनंद टिकवून ठेवण्यासाठी काय केले पाहिेजे हे जाणून घेणार आहोत. जर आपले वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्धीचे असेल तर संसारात भरभराट येते. याचा परिणाम आपल्या मुलांवर होत असतो. जर पती आणि पतीच्या नात्यात गोडवा नसेल आणि सतत वादविवाद होत असतील तर मुलांवर देखील त्याचा गंभीर परिणाम होत असतो.आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार वैवाहिक जीवनात या ३ गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनात या ३ गोष्टी असतात ते आपल्या संसाराची गाडी खूप सुसाट घेऊन जातात.

मन शांत असणे हे खूप महत्वाचे आहे. कुठलीही आणि कितीही मोठी समस्या आली तर काही लोक गोंधळून जातात तर काही लोक त्याला संयमीपणे सामोरे जातात. शांत मनाचे व्यक्ती अशा परिस्थितीत गोंधळून न जाता अशा परिस्थितीला शांतपणे सामोरे जातात. याचे कारण असे की ज्यावेळी मन शांत असते तेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल दोन्ही बाजू जाणून घेणे शक्य होते. चालू घटनेचा किंवा परिस्थितीचा आढावा घेता येतो. परंतु त्याच वेळी, मन शांत नसलेली व्यक्ती रागाच्या भरात स्वत: बरोबरच इतरांचेही नुकसान करते. त्यामुळे वैवाहिक जीवनात ताणतणावाची परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे मनःशांती खूप महत्वाची आहे.

नवरा बायको समाधानी असायला हवेत. चाणक्य नितीमध्ये (Chanakya Niti) सांगितल्या प्रमाणे सुखी संसारासाठी समाधानी असणे खूपच गरजेचे आहे. जर पती आणि पत्नीच्या नात्यात जर दोघे समाधानी नसतील तर मग चिडचिड, वाद होण्याची शक्यता असते. दोघांमधील एक व्यक्ती जरी समाधानी नसेल तरी मग चिडचिड, वादविवाद या गोष्टींना सामोरे जावे लागते. बऱ्याचदा वादविवाद हे कुटुंबातील आर्थिक खर्च यावरून देखील होत असतात. बऱ्याचदा स्त्रियांना अनावश्यक खर्च करण्याची सवय असते. अशावेळी जर स्त्रियांना खर्च करण्यासाठी पैसे मिळाले नाहीत तर मग त्या चिडचिड करतात आणि अनावश्यक मागण्यांमुळे नात्यात वाद निर्माण होतात.

नात्यातील समानता: बऱ्याचदा पुरुष मंडळी कुठल्याही निर्णयात स्त्रियांना सामील करून घेत नाहीत किंवा स्त्रियांना विचारून निर्णय घेण्यात त्यांना कमीपणा वाटतो. परंतु आपल्या आयुष्याच्या जोडीदाराला घरातील प्रत्येक निर्णयात सामील करून घेण्यात संकोच ठेऊ नये. कारण नात्यातील एकमेकांबद्दल आदर असणे खूप गरजेचे असते. जर एकमेकांबद्दल आदर असेल तर ते नात दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत जाते. अशी नाती कधीच तुटत नाहीत. नात्यामध्ये अहंकाराला स्थान नसते. त्यामुळे एकमेकांना आदर देणे गरजेचे आहे. यामुळे तुमचे नये घट्ट तर होईलच परंतु वैवाहिक देखील खूप सुखी होईल.

हेही वाचा: Chanakya Niti: जीवनात या दोन गोष्टी नेहमी गुप्त ठेवा, अन्यथा याल रस्त्यावर..

Chanakya Niti: ..म्हणून विवाहित पुरूष दुसऱ्यांच्या बायकांकडे होतात आकर्षित; चाणक्यांनी सांगितलेली चार कारणे जाणून बसेल धक्का..

तुमचे केस पांढरे झालेत का? चिंता सोडा, अवघ्या दोन रुपयांत करा घरच्या घरी काळे तेही नैसर्गिक 

Health Tips: सतत थकल्यासारखे वाटत असेल तर लगेच व्हा सावधान; जाणून घ्या थकवा येण्याची गंभीर कारणे..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.