Health Tips: सतत थकल्यासारखे वाटत असेल तर लगेच व्हा सावधान; जाणून घ्या थकवा येण्याची गंभीर कारणे..

0

Health Tips: मला विकनेस आला आहे. हा शब्द आपण अनेक वेळा ऐकतो. आपल्याला थकवा जाणवत असलेली अनेक लोक भेटतात. आपल्यालाही कधी-कधी थकवा जाणवतो. काहीवेळ तर आपल्याला अंथरुणावरून देखील उठता येत नाही. आपण अनेक घरगुती उपाय करतो. लिंबू पाणी हा त्यावरील एक फेमस उपाय आहे. पण हा उपाय आपण कायम करू शकत नाही. लिंबू पाणी हा काही थकव्यावरील कायस्वरूपी उपाय नाही. त्यासाठी आपल्याला सारखा सारखा थकवा का जाणवतोय? हे जाणून घेऊन मग त्यावर योग्य उपाय करणे गरजेचे असते. काहीजण तर जाऊद्या थकवाच तर आहे, असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात. पण हे आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक आहे.

थकवा जाणवत असेल, तर त्या आजारावर तात्पुरता उपाय करण्यापेक्षा त्या आजाराचे मूळ जाणून घेऊन त्यावर उपाय करायला हवा. देशातील अनेक लोक या आजाराचे शिकार असतात. त्यामुळे डॉक्टरांनी अशा लोकांसाठी Tired All The Time ही टर्म तयार केली आहे. थकवा जाणवत असेल, तर त्याला अनेक कारणे असतात. ते आपण जाणून घेणे गरजेचे आहे. तुम्हाला थकवा जाणवत असेल, तर त्यामागचे नेमकी कारणे कोणती? हे आपण जाणून घेऊ.

व्यायाम न करणे: व्यायाम करणे ही सवय प्रत्येकाला असायला हवी. आपले शारीरिक स्वाथ्य चांगले राहावे असे वाटत असेल, तर व्यायाम हा शरीरासाठी गरजेचा आहे. व्यायाम केल्याने शरीर सदृढ राहते, आणि आपल्याला ही दिवसभर ताजे असल्याचा फील येतो. दररोज व्यायाम केल्याने शरिराची इम्युनिटी पावर वाढण्यास मदत होते. ज्यामुळे आपल्याला थकवा जाणवत नाही. दररोज व्यायाम केल्याने आपले हृदय आणि फुफ्फुसे अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करतात. त्यामुळे कायमच थकवा जाणवत असेल, तर व्यायामाला सुरुवात करा.

कॉपी पिणे : कॉपी पिल्याने अनेकांना फ्रेश झाल्याचा फील येतो. त्यामुळे जॉब करणारे अनेकजण दिवसभरात कॉफीचे सेवन अधिक करतात. काहींना काम करताना कंटाळवाणे वाटू नये, झोप येऊ नये, म्हणून देखील अनेक लोक कॉफी घेतात. यामुळे त्यांना थोडा वेळ फ्रेश वाटतही असेल. मात्र याचे परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे तुम्ही किमान झोपेच्या ६ तास तरी आधी कॉफी घेणे टाळले पाहिजे. झोपण्यापूर्वी किमान तुम्ही सहा तास काहीही खाल्ले नाही, तर उर्जेची पातळी दीर्घकाळासाठी वाढीस लागते.

झोप न घेणे: आपल्या शरीराला किमान आठ तास झोप आवश्यक असते. हे अनेक संशोधनातून समोर आले आहे. पण सध्याच्या धावपळीच्या युगात अनेकांना आठ तास झोप घेता येत नाही. आपल्या शरीराला आराम मिळत नसल्याने, शरीरातील ऊर्जा कमी होते. त्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो. तुम्ही जर वेळेवर झोपत असाल, तर शरीरातील ऊर्जेची पातळी वाढण्यास मदत होते. त्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश राहू शकता. शरीरही सुदृढ होईल.

लोहाची कमतरता: जसे कोणत्याही झाडाला वाढण्यासाठी पोषक घटकांची गरज असते, तसेच आपल्या शरीराला ताजे तवाने आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी काही पोषक घटकांची गरज असते. त्यातला महत्वाचा घटक म्हणजे, लोह आहे. आपल्या शरीरात लोहाची कमतरता असेल, तर आपल्याला कायम थकवा जाणवत असतो. डोळ्याच्या पापण्या खाली खेचल्या जातात. पाय दुखतात. डोके दुखी वाढते. त्यामुळे तुमच्या रोजच्या आहारात लोहाचे प्रमाण वाढवा.

पाण्याचे प्रमाण: पाणी हा आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचा घटक आहे. त्यामुळे आपण दिवसभरात किमान ४-५ लिटर पाणी पिणे गरजचे असते. आपल्या शरीरातील पाण्याची पातळीपेक्षा जर आपण कमी पाणी प्यायलो तर त्याचा आपल्या शरीरातील ऊर्जेच्या पातळीवर परिणाम होतो. आणि आपल्याला थकवा जाणवतो. त्यामुळे कितीही कामात असाल तरी पाणी पिणे कधीच टाळू नका.

हे देखील वाचा Motorola Smartphone: 22 हजारांचा हा दर्जेदार स्मार्टफोन मिळतोय केवळ 13 हजारात; जाणून घ्या ऑफर विषयी सविस्तर..

Workout tips: हे घरगुती उपाय देतील जिमसारखी बॉडी आणि फिटनेस.

Tractor Subsidy Scheme: शेतकऱ्यांनो आता ट्रॅक्टर घेणे झाले सोपे; सरकार देतेय ३ लाख रुपये अनुदान..

How To Get Sleep Early: रात्री चांगली झोप लागत नसेल तर करा हे काम झटक्यात लागेल झोप..

Breast Shape Tips: सैल झालेले ब्रेस्ट या घरगुती उपायांनी बनवा सुडोल आणि आकर्षक..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.