Motorola Smartphone: 22 हजारांचा हा दर्जेदार स्मार्टफोन मिळतोय केवळ 13 हजारात; जाणून घ्या ऑफर विषयी सविस्तर..

0

Motorola Smartphone: सध्याच्या युगामध्ये स्मार्ट फोन हा प्रत्येकाच्याच जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे. कारण आज लहानांपासून ते जेष्टांपर्यंत सगळ्यांच्याच हातात स्मार्टफोन दिसून येत आहे. कारण या स्मार्ट फोनेमुळे दुनिया आपल्या हातात आलेली आहे. आज आपण एका सेकंदात कुठलीही माहिती या स्मार्ट फोनच्या माध्यमातून सहज मिळवू शकतो. जसा जसा स्मार्ट फोनचा वापर वाढत गेला, तशाच स्मार्टफोन उत्पादन करणाऱ्या कंपन्या देखील वाढत गेल्या. प्रत्येक कंपनी आपला फोन कसा ‘स्मार्ट’ आहे? हे पटवून देत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असते.

बाजारपेठेत अनेक पर्याय उपलब्ध असल्याने ग्राहकांना देखील निवड करणे सोपे जात आहे. आपण आपल्या आवडी-निवडी नुसार फोन विकत घेऊ शकतो. स्मार्टफोन खरेदी करण्याची प्रत्येकाची गरज वेगवेगळी असते. ग्राहकांच्या अपेक्षेप्रमाणे अनेक कंपन्या आपल्या स्मार्टफोनची निर्मिती करत आहेत. कमी किमतीत जबरदस्त कॅमेरा क्वालिटी असणाऱ्या स्मार्टफोनला अलीकडे मोठी मागणी असल्याचे पाहायला मिळते.

तरुणाईमध्ये मोटोरोला स्मार्टफोनची मोठी क्रेझ असल्याचे पाहायला मिळते. कॅमेरा त्याचबरोबर प्रोसेररसाठी दमदार फोन अशी या स्मार्टफोनची ओळख आहे. फ्लिपकार्टवर (Flipkart) ऑफरमध्ये विक्री होत असलेल्या या स्मार्टफोनची मूळ किंमत 22 हजार रुपये आहे. तर हा फोन आहे मोटोरोला कंपनीचा moto G62 5g आहे. हा फोन फ्लिपकार्टवर तुम्ही ऑफरमध्ये खरेदी करू शकता.

१२८ जीबी स्टोरेज आणि ६ जीबी रॅम असणारा हा स्मार्टफोन तुम्ही केवळ 14 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याशिवाय जर तुम्हाला आणखी ऑफरमध्ये हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर तुम्हाला अक्सिस बँक कार्डच्या माध्यमातून पेमेंट करायचे आहे. यामध्ये तुम्हाला 5 टक्के अतिरिक्त सवलत मिळणार आहे. या सगळ्या ऑफरचा लाभ घेतल्यानंतर, तुम्हाला 13850 रुपयांमध्ये हा दर्जेदार स्मार्टफोन खरेदी करता येऊ शकतो. आता आपण या स्मार्टफोनचे फीचर्स काय आहेत हे देखील जाणून घेऊ.

Moto G62 5G चे फीचर्स

कंपनीकडून याफोनमध्ये आकर्षक फीचर्स देण्यात आले आहेत. 405 पिक्सेल प्रति इंच पिक्सेल डेन्सिटीसह 120 Hz रिफ्रेश रेटचा 6.5-इंच फुल-एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले. देण्यात आला आहे. 20W फास्ट चार्जला सपोर्ट असणारी 5000 mAh बॅटरी या स्मार्टफोनमध्ये देण्यात आली आहे. ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटसह Adreno 610 GPU प्रोसेसर देण्यात आला आहे.

कॅमेरा

सगळ्यात महत्वाचं म्हणजे या स्मार्टफोनचा खूपच दर्जेदार देण्यात आला आहे. याफोनमध्ये देण्यात आलेला सेल्फी कॅमेरा सेन्सर १६ मेगा पिक्सेल असून, बॅक पॅनलवरही सेन्सर देण्यात आले आहेत. यामध्ये 50MP प्रायमरी सेन्सर, 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2MP मॅक्रो सेन्सरची रेंज देण्यात आली आहे. फोटो आणि व्हिडिओ ग्राफीसाठी जर तुम्ही खरेदी करू इच्छित असाल तर हा फोन परचेस करू शकता.

हे देखील वाचा Workout tips: हे घरगुती उपाय देतील जिमसारखी बॉडी आणि फिटनेस.

Tractor Subsidy Scheme: शेतकऱ्यांनो आता ट्रॅक्टर घेणे झाले सोपे; सरकार देतेय ३ लाख रुपये अनुदान..

How To Get Sleep Early: रात्री चांगली झोप लागत नसेल तर करा हे काम झटक्यात लागेल झोप..

Breast Shape Tips: सैल झालेले ब्रेस्ट या घरगुती उपायांनी बनवा सुडोल आणि आकर्षक..

Virat Kohli: विराट कोहलीचा सोनाक्षी सिन्हासोबत भन्नाट डान्स; व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.