shubman gill: सारा नव्हे ‘या’ पोरीच्या प्रेमात पागल आहे शुभमन गिल? त्या फोटोमुळे झाला भांडाफोड..

0

shubman gill: दिवसेंदिवस क्रिकेटर्सचे स्टारडम वाढत चालले आहे. बॉलीवूड सेलिब्रेटिंपेक्षाही क्रिकेटर्स आता अधिक पॉप्युलर होत चालले आहेत. एवढेच नाही, तर बॉलीवूडला देखील क्रिकेटर्सची भुरळ पडलेली आहे. भारताचा उगवता सितारा शुभमन गिल (shubman gill) सध्या मैदानाबरोबर मैदानाच्याबाहेर देखील तितकाच फॉर्ममध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षभरापासून सारा आणि शुभमन एकमेकांना देत करत असल्याचा चर्चा रंगत आहे. अशातच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. (shubman gill dating Sara)

शुभमन गिल गेल्या काही महिन्यांमध्ये चांगलाच फॉर्ममध्ये आहे. तो सध्या त्याच्या फॉर्ममुळे जितका चर्चेत आहे, तितकाच त्याच्या रिलेशनशिपमुळे (shubman gill relationship) देखील चर्चेत आहे. गेल्या वर्षभरापासून शुभमन गिल सारा तेंडुलकरला (shubman gill Sara Tendulkar) डेट करत असल्याच्या चर्चा रंगत होत्या. मात्र काही महिन्यांपूर्वी शुभमन गिल आणि सारा अली खान (shubman gill Sara Ali Khan) या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर गिल सारा तेंडुलकरला नाही तर, सारा अली खानला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या.

मात्र या दोन्ही सारांव्यतिरिक्त आता एक भलतंच नाव चर्चेत आल्याने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. शुभमन गिल आणि एका सुंदर मुलीचा रोमँटिक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. विशेष म्हणजे, मुलीच्या हातात फुलाचा गुच्छ असल्याने या चर्चांना नवीन फांदी फुटली. दोघांनीही आपल्या नात्याविषयी अधिकृत स्पष्टता केली नसली तरीदेखील दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा मात्र जोर धरू लागल्या आहेत.

शुभमन गिल सोबत हातात फुलांचा गुच्छ घेऊन रोमॅण्टिक अंदाजात उभा असणारी सुंदर मुलगी कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला. एवढ्या रोमँटिक अंदाजामध्ये हे दोघेही नक्की कुठे भेटले? असे असंख्य प्रश्न विचारले गेले. या दोघांच्या भेटीचे कारण आता समोर आले असून, दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे देखील बोलले जाऊ लागले आहे. शुभमन सोबत रोमँटिक अंदाजामध्ये असणाऱ्या सुंदर तरुणीचे नाव निहारीका एन.एम. असं आहे. (Niharika Nm) निहारीका social media influencers असून ती प्रसिद्ध देखील आहे.

कोण आहे निहारीका?

निहारीका प्रसिद्ध social media influencers आहे. निहारिका कॉलेजमध्ये असतानाच त्याने आपला युट्युब चॅनेल सुरू केला होता. ती आपल्या यूट्यूब चॅनलवर सेलिब्रिटींच्या मुलाखती घेत असते. शुभमनला भेटण्याचे कारण देखील मुलाखत असून, तिने शुभमनची एक मुलाखत घेतली आहे. जी सध्या कमालीची चर्चेत आहे. मुलाखतीचा काही भाग तिने आपल्या इंस्टाग्राम वरून पोस्ट केला आहे. जो तुफान व्हायरल झालाय.

दोघांच्या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने, डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत. दोघांची मुलाखत फारच मजेशीर आहे. सोबतच दोघांचा एकमेका प्रति चांगला बॉण्डिंग असल्यामुळे साहजिकच या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. हे दोघेही एकमेकांना डेट करत आहेत, की नाही या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आता सारा अली खान आणि सारा तेंडुलकर प्रकरणा प्रमाणेच वाट पाहावी असल्याचं सध्यातरी दिसतंय.

हे देखील वाचा Ileana DCruz: अखेर इलियानाच्या बाळाचा पिता समजला; bollywod च्या स्टार अभिनेत्याचे नाव आले समोर..

Asia Cup 2023: पाकिस्तानमध्ये होणार सामने; भारत पाकिस्तान तीन वेळा होणार लढत, वाचा सर्व डिटेल्स..

Vastu Tips: अशा ठिकाणी घर बांधल्यास व्हाल बर्बाद, जाणून घ्या घर बांधण्याचे योग्य ठिकाण..

Chanakya Niti: ही तीन कामे केल्यामुळे अफाट कष्ट करूनही लक्ष्मी राहते सदैव नाराज..

Astrology Horoscope: आजपासून या राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार..

INDvsWI T20I Series: रोहित, विराटला टी ट्वेंटी संघातून कायमस्वरूपी डच्चू; IPL गाजवणाऱ्या पाच खेळाडूंना संघात स्थान..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.