Aadhar card update: आधारकार्ड धारकांनो दोन दिवसांत करा हे काम नाहीतर द्यावे लागतील पैसे..

0

Aadhar card update: आधार (aadhar card) हे फक्त सर्वसामान्यांची ओळखच नाही, तर आधार देखील बनलं आहे. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. आधार कार्ड  प्रत्येकाकडे असले तरीदेखील आता ज्या धारकांचे आधार कार्ड दहा वर्ष जुने आहे, अशा कार्डधारकांनी आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. सरकारनी यासंदर्भात नियम जारी केला असून 14 जून 2023 पर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करता येणार आहे.

आधार कार्ड धारकांनी जर आज आधारकार्ड अपडेट केले नाही, तर उद्यापासून आधारकार्ड अपडेट करण्यासाठी 50 रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. जर तुमचा आधार कार्ड दहा वर्ष दोन असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरून ऑनलाईन आधार कार्ड अपडेट करता येणार आहे.

काय अपडेट करावे लागणार? 

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला https://myaadhaar.uidai.gov.in या वेबसाईटवर जावे लागणार आहे. दहा वर्ष जुने असणाऱ्या आधार कार्ड मध्ये तुम्हाला तुमचा ओळख पुरावा अपडेट करावा लागणार आहे याशिवाय तुमचा पत्ता देखील अपडेट करणे अनिवार्य आहे.

या पद्धतीने करा अपडेट 

जर तुमच्याकडे दहा वर्ष जुने आधार कार्ड असेल तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड अपडेट करावे लागेल. असं असलं तरी फारशी चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील तुमचे आधार कार्ड अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://myaadhaar.uidai.gov.in असं सर्च करायचं आहे.

त्यानंतर या विभागाची अधिकृत वेबसाईट ओपन होईल. यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकून लॉग इन करायचं आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर, तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल. हा ओटीपी तुम्ही समोरील रकान्यात सबमिट केल्यानंतर, लॉगिन होईल. लॉगिन केल्यानंतर, ‘अपडेट आधार’ हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे.

इथपर्यंत व्यवस्थित प्रोसेस झाल्यानंतर, तुम्हाला तुमचे नाव, जन्मतारीख, पत्ता आणि लिंग व्यवस्थित टाकायचा आहे. त्यानंतर समोरील रकान्यामध्ये कॅप्चा कोड व्यवस्थित टाकून तुम्हाला सबमिट पर्यावर क्लिक करायचे आहे. यानंतर पुष्टीकरणा संदर्भातला एसएमएस प्राप्त होईल. जो तुमचे आधार कार्ड अपडेट झाले आहे, याची पुष्टी करतो.

हे देखील वाचा INDvsWI T20I Series: रोहित, विराटला टी ट्वेंटी संघातून कायमस्वरूपी डच्चू; IPL गाजवणाऱ्या पाच खेळाडूंना संघात स्थान..

WTC Final 2023: WTC पराभवामुळे तीन खेळाडूंना कसोटी संघातून डच्चू; या खेळाडूंची लागली लॉटरी..

India Tour Of West Indies 2023: कर्णधार पदावरून रोहितची हकालपट्टी; हा तंत्रशुद्ध फलंदाज कसोटीचा नवा कर्णधार..

Marriage Tips: लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याकडून पत्नीला हव्या असतात या चार गोष्टी..

Flipkart Big Saving Days Sale 2023: फक्त दोनच दिवस शिल्लक! फ्लिपकार्टवर हे स्मार्टफोन मिळतायत निम्म्या किंमतीत..

NPC Recruitment 2022: बारावी आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! जाणून घ्या सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.