IPL 2023 playoffs Scenario: RCB च्या विजयाने तीन संघ व्हेंटिलेटरवर; मुंबई जिंकूनही पोहचणार नाही प्लेऑफमध्ये..

0

IPL 2023 playoffs Scenario: आयपीएल 2023 (IPL 2023) ची स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. रविवारी संध्याकाळी प्लेऑफचे चार संघ कोणते? हे निश्चित होणार आहे. आतापर्यंत केवळ एकच संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. तीन जागांसाठी एकूण सहा संघांमध्ये स्पर्धा असली तरी चार संघांमध्ये अधिक चढाओढ आहे. काल खेळल्या गेलेल्या सामन्यात आरसीबी संघाचा पराभव झाला असता, तर लखनऊ (Lucknow super giants) आणि चेन्नई (Chennai super kings) हे दोन संघ आपोआप प्लेऑपमध्ये पोहोचले असते. तर मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) संघाला अधिक संधी मिळाली असती. मात्र Rcb च्या विजयाने मुंबई इंडियन्स संघाचे आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. जाणून घ्या प्लेऑफचे समीकरण सविस्तर. IPL 2023 playoffs Scenario)

आयपीएल 2023 स्पर्धा फारच रोमांचक राहिली आहे. शेवटच्या सामन्यापर्यंत प्लेऑफमध्ये चार संघ कोणते असतील, हे कोणीही सांगू शकणार नाही. असं पहिल्यांदाच होत आहे. या स्पर्धेमधील प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा पहिला मान गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाला मिळाला आहे. गुजरात संघाव्यतिरिक्त एकाही संघाला अद्याप प्लेऑफमध्ये पोहोचता आलेला नाही. आरसीबी संघाने हैदराबाद संघावर मिळवलेल्या विजयामुळे चेन्नई, लखनऊ आणि मुंबई हे तिन्ही संघ व्हेंटिलेटरवर आहेत.

..तर चेन्नई, लखनऊ पैकी एक संघ जाणार बाहेर..

आयपीएल 2023 या स्पर्धेत कमालीचे उलटफेर पाहायला मिळत आहेत. आरसीबी संघाने काल मिळवलेल्या विजयामुळे, आता या स्पर्धेमधील लखनऊ आणि चेन्नई संघाचे प्लेऑफमध्ये पोहचण्याचे स्थान धोक्यात आले आहे. जर चेन्नई सुपर किंग्स संघाने आपला उर्वरित दिल्ली विरुद्धच्या सामना गमावला, तर त्यांना लखनऊ आणि कोलकत्ता या दोन संघांमध्ये होणाऱ्या सामन्यांवर अवलंबून राहावं लागेल. जर लखनऊ संघाने कोलकाता संघाला पराभव केले तर या स्पर्धेतलं चेन्नई सुपर किंग संघाचे आव्हान संपुष्टात येऊ शकतं.

..तर चेन्नई जाणार बाहेर

जर चेन्नई सुपर किंग संघ पराभूत झाला, आणि दुसरीकडे लखनऊ संघाने कोलकत्ता संघावर विजय मिळवला, त्याचबरोबर मुंबई इंडियन्स संघाने देखील हैदराबाद संघाला पराभूत केले, याबरोबरच आरसीबी संघाने देखील गुजरात संघाला पराभव केले, तर या स्पर्धेमधील चेन्नई सुपर किंग संघाचे आव्हान अधिकृतरीत्या संपुष्टात येईल.

तर लखनऊ जाणार बाहेर..

एकीकडे जर लखनऊ संघ पराभूत झाला. दुसरीकडे चेन्नईने दिल्ली विरूद्ध विजयी मिळवला,आणि आरसीबी, मुंबई या दोन्हीं संघांनी आपला उर्वरित एक-एक सामना जिंकला. तर लखनऊ संघाचे या स्पर्धेमधील आव्हान संपुष्टात येईल. दुसरीकडे मुंबई इंडियन्स संघाचे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्थान देखील धोक्यात आले आहे. आरसीबीच्या विजयामुळे आता मुंबई संघाने उर्वरित एक सामना जिंकला तरी देखील त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागणार आहे.

..तर मुंबई जिंकूनही जाणार बाहेर

काल हैदराबाद विरुद्ध आरसीबीने (RCBvsSRH) मिळवलेल्या विजयामुळे मुंबई इंडियन्स संघाला आता इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे. मुंबई संघाने हैदराबाद विरुद्धचा आपला उर्वरित सामना जिंकला तरी देखील त्यांना प्लेऑफमध्ये थेट प्रवेश मिळणार नाही. चेन्नई आणि लखनऊ या दोन संघाने आपला उर्वरित एक-एक सामना जिंकला आणि आरसीबी संघाने अखेरचा सामना जिंकला, तर मुंबई इंडियन्स जिंकूनही या स्पर्धेबाहेर फेकला जाईल. मात्र यासाठी चेन्नई लखनऊ आणि RCB या तिन्ही संघांना आपला उर्वरित एक-एक सामना जिंकावा लागेल.

हे देखील वाचा Realme Narzo N53: 50MP कॅमेरा, 6GB RAM असणारा Realme चा सर्वात पातळ स्मार्टफोन लॉन्च; किंमत केवळ..

IPL 2023: ती आली अन् पृथ्वीने मैदान मारलं; नाशिकच्या तरुणीने असं केलं सेलिब्रेशन, विजयानंतर पृथ्वीही गेला भेटायला..

Google search: नवीन लग्न झालेल्या मुली गुगलवर सर्च करतात या पाच धक्कादायक गोष्टी; दुसरी आहे फारच भयानक..

Honda EM1 electric scooter: Honda ची दमदार इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात दाखल; जाणून घ्या फीचर्स आणि वैशिष्ट्ये..

JioCinema: अखेर JioCinema चा ग्राहकांना दणका! आता JioCinema पाहण्यासाठी वर्षाकाठी मोजावे लागणार 999 रुपये..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.