RR vs PBKS: ही एक चूक आणि ‘या’ एका खेळाडूमुळे राजस्थान रॉयल्सने गमावला सामना..
RR vs PBKS: आयपीएल सीझन16 (IPL16) मधील आठवा सामना काल आसामच्या मैदानावर राजस्थान रॉयल्स (rajsthan royals) आणि पंजाब किंग्स (Punjab kings) यांच्यामध्ये पार पडला. या सामन्यांमध्ये राजस्थानवर पाच धावांनी विजय मिळवत या स्पर्धेत पंजाबने सलग दुसरा विजय संपादन केला. अटीतटीच्या लढतीत पंजाब संघाने राजस्थान संघावर पाच धावांनी विजय मिळवला असला तरी राजस्थानवर केवळ दोन चुकांमुळे हा सामना गमावण्याची वेळ आली.
महत्त्वाच्या सामन्यात नाणेफेक जिंकून संजू सॅमसन (Sanju Samson) क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळी या मैदानावर दव पडत असल्याने, हा निर्णय देखील योग्य होता. पंजाब संघाचे जबरदस्त सुरुवात केली. सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि प्रभसिमरन या दोघांनी केवळ ९.४ षटकात ९० धावांची सलामी दिली. मात्र अखेरच्या षटकात राजस्थानच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत पंजाब संघाला १९७ धावांवर रोखले.
फलंदाजीसाठी अनुकूल असणाऱ्या या खेळपट्टीवर १९७ धावा आव्हानात्मक होत्या. मात्र संध्याकाळी दव पडत असल्याने, आणि राजस्थान रॉयल संघाकडे एकाहून एक सरस पावर हिटर असल्याने, या धावा सहज चेस होतील, असा अनेकांचा अंदाज होता. राजस्थान रॉयल्स संघाने स्वतःच्या चुकीमुळे हा सामना गमावला. क्षेत्ररक्षण करताना राजस्थान रॉयल संघाचा सलामीवीर बटलरला किरकोळ दुखापत झाली.
क्षेत्ररक्षण करताना बटलरला किरकोळ दुखापत झाल्यामुळे, तो सलामीला उतरू शकला नाही. मात्र त्याच्या जागी संजू सॅमसन किंवा देवदत्त पडिक्कल या दोघांपैकी एकाला सलामीला पाठवणे आवश्यक होते. मात्र असं न करता, राजस्थान रॉयल्स संघाने ऑफ स्पिनर रविचंद्र अश्विनला सलामीला पाठवत पंजाब संघाला स्वतःहून जिंकण्याची संधी दिली.
कोणताही संघ जेव्हा 200 किंवा 200 च्या आसपास धावसंख्या चेस करतो, तेव्हा पावर प्ले मध्ये सुरुवात चांगली होणे आवश्यक असते. रविचंद्रन अश्विनला सलामीला पाठवण्याचा निर्णय पराभवाचे एक करणं नक्कीच ठरला. रविचंद्रन अश्विनच्या जागी सलामीला देवदत्त पडिक्कलला पाठवणे हा कदाचित योग्य निर्णय ठरला असता. देवदत्त पडिक्कलने सलामीवीर म्हणून चांगली कामगिरी केली आहे.
पावर प्ले नंतर त्याचा स्ट्राईक रेट कमी येत असल्याचा इतिहास सांगतो. आणि म्हणून, आज त्याला सलामीला पाठवण्याची संधी असतानाही राजस्थान रॉयल्सने ही संधी गमावली. त्याला सलामीला न पाठवता पाचव्या क्रमांकावर पाठवले. देवदत्त पडिक्कलने तब्बल २६ चेंडू खेळले आणि केवळ २१ धावा केल्या. देवदत्त पडिक्कलच्या संथ खेळीमुळे त्याच्या साथीदार आणि राजस्थान संघाचा कर्णधार संजू सॅमसनवर देखील दबाव आला. या दबावात मोठा फटका मारण्याच्या नादात संजू बाद झाला.
एकीकडे रनरेट वाढत असताना दुसरीकडे देवदत्त पडिक्कल स्ट्राईक रोटेट देखील करण्यात अपयशी ठरत होता. साहजिकच या खेळीचा परिणाम संजू सॅमसनवर झाला. आणि मोठा फटका मारण्याच्या नादात त्याची विकेट गेली. एखादा खेळाडू लयीत नसेल, तर कर्णधार म्हणून तुम्ही खेळ पुढे चालवणे आवश्यक असतं. मात्र संजू यात अपयशी ठरला. हेही नाकारता येणार नाही. राजस्थान रॉयल्स संघाने जर देवदत्त पडिक्कलला सलामीला पाठवलं असतं, तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. पाचव्या क्रमांकावर देखील त्याने 26 चेंडू 35, 40 धावा केल्या असत्या तरी देखील राजस्थान संघाने हा सामना सहज जिंकला असता.
हे देखील वाचाWedding viral video: स्टंटबाजीच्या नादात नवरीचा सुंदर चेहरा झटक्यात जळाला; पाहा व्हिडिओ..
PAN Card: पॅन कार्ड हरवलंय? सोडून द्या चिंता! घरबसल्या असा करा ऑनलाईन अर्ज मिळून जाईल पॅन कार्ड..
OnePlus Nord CE3 lite: OnePlus चा खतरनाक स्मार्टफोन लॉन्च; 108MP कॅमेरा असणारा फोन केवळ 20 हजारात..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम