IND vs AUS: या तीन कारणांमुळे आजही भारताचा दारून पराभव होण्याची शक्यता..
IND vs AUS: तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना आज भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia 3Rd ODI) यांच्यामध्ये चेन्नईमच्या चेपॉक (Chepauk) मैदानावर खेळवण्यात येणार आहे. (MA Chidambaram Stadium, Chennai) मायदेशामध्ये भारताची आकडेवारी दमदार असली तरी देखील ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत देखील भारताची दमछाक केल्याने, भारतीय संघ आज दबावात असणार आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मीचेल स्टार्क (Mitchell starc) आग ओळखत असून, भारतीय प्रमुख फलंदाजांना पुन्हा एकदा आपल्या जाळ्यात ओढण्याची दाट शक्यता आहे.
आगामी विश्वचषकाची तयारी म्हणून भारतीय संघाकडे आता केवळ काहीच एकदिवसीय सामने उरले आहेत. मायदेशामध्ये विश्वचषक होणार असल्याने भारतीय संघावर विश्वचषक जिंकण्याचा देखील दबाव असणार आहे. अशातच आता ऑस्ट्रेलियाने भारताची हवा काढल्याने, अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. गेल्या काही वर्षापासून भारतीय फलंदाज डावखुऱ्या जलदगती गोलंदाजासमोर आपल्या नांग्या टाकत असल्याचे पाहायला मिळाले आहे.
2017 मध्ये झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये देखील मोहम्मद अमीरने भारतीय प्रमुख फलंदाजांची शिकार केली होती. 2019च्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये देखील ट्रेंड बोल्डने भारतीय फलंदाजांना डावखुऱ्या गोलंदाजांचा सामना करता येत नसल्याचं सिद्ध करून दाखवलं. आता पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचा डावखुरा जलदगती गोलंदाज मीचेल स्टार्टने भारतीय फलंदाजाची ही समस्या कायम असल्याचे दाखवून दिले.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात देखील भारतीय प्रमुख फलंदाजांनी मिचेल स्टार्क समोर नांग्या टाकल्या. पहिल्या एकदिवसीय सामन्यात केएल राहुल आणि रवींद्र जडेजा या दोघांनी केलेल्या भागीदारामुळे भारताला विजय साकारता आला. 188 धावांचे आव्हान असताना देखील भारतीय फलंदाजी कोलमडल्याचे पाहायला मिळालं. बरोबर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात देखील याचीच पुनरावृत्ती झाली. आणि भारताला केवळ 117 धावा करता आल्या. ज्या खेळपट्टीवर भारतीय संघ केवळ 117 धावांत गारद झाला, त्याच खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी केवळ ११ षटकात हे आव्हान पूर्ण केले.
चेन्नईच्या मैदानावर खेळण्यात येणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात पावसाचे चावट असले तरी देखील हा सामना होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे सुरुवातीला जलद गती गोलंदाजांना या खेळपट्टीवर मदत मिळणार आहे. फक्त पहिल्याच नाही, तर दुसऱ्या इनिंगमध्ये देखील सुरुवातीची काही षटके जलदगती गोलंदाजांना मदत मिळणार आहे. दोन्ही सामन्यात भारताच्या प्रमुख फलंदाजांनी मिचेल स्टार्क समोर सपशेल नांग्या टाकल्या असल्याने या सामन्यात देखील दोन्ही एकदिवसीय सामन्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.
आज चेन्नईची खेळपट्टी जलदगती गोलंदाजांना साथ देणारी ठरणार असल्याने, डावखुरा गोलंदाज मिचेल स्टार्क धोकादायक ठरणार असल्याची शक्यता आहे. आज मिचेल स्टार्क चेंडू स्विंग करण्यात यशस्वी झाला तर भारतीय फलंदाजी दोन्ही सामन्याप्रमाणे आजही कोलमडण्याची दाट शक्यता आहे. डावखुऱ्या जलदगती गोलंदाजाचे चेंडू स्विंग झाल्यानंतर, भारतीय फलंदाजांना त्यावर गेल्या काही वर्षांपासून अद्याप तोडगा करता आला नसल्याने, आजच्या सामन्यातही भारतीय फलंदाजी बॅकफूटवर असणार आहे.
ऑस्ट्रेलियाला जर भारताच्या सुरूवातीच्या फलंदाजांना लवकर बाद करण्यात यश आलं तर ऑस्ट्रेलिया हा सामना सहज जिंकण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे, भारतीय संघाची मधली फळी संघर्ष करताना पाहायला मिळाली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात केल राहुलने जरी अर्धशतक झळकावले असले तरी, देखील तो महत्त्वाच्या सामन्यात सपशेल अपयशी ठरल्याचा इतिहास आहे.
ऑस्ट्रेलिया संघाची फलंदाजी जरी कमकुवत वाटत असली, तरी देखील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोन्ही सलामीवीर चांगल्या फॉर्ममध्ये आले आहेत. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने जर 240 धावांपर्यंत मजल मारली तर भारतीय संघाचा पराभव होण्याची शक्यता अधिक आहे. प्रथम फलंदाजी करताना भारत 200 धावांपर्यंत पोहचणे देखील अवघड होणार असल्याचे चित्र सध्यातरी पाहायला मिळत आहे. कागदावर जरी भारतीय संघ तुल्यबळ वाटत असला, तरी ऑस्ट्रेलिया हा सामना 70 टक्के जिंकण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा Motorola Smartphone: 50MP कॅमेरा असणारा Motorola चा हा स्मार्टफोन उद्या होणार लॉन्च; किंमत केवळ..
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याविषयी मोठी अपडेट; जाणून घ्या त्वरित..
realme smartphone: realme चा हा दर्जेदार स्मार्टफोन मिळतोय फक्त १० हजारांत; जाणून घ्या डिटेल्स..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम