Gautami Patil: गौतमीला पुन्हा दणका! ..म्हणून थेट महिलांनीच काठीने दिला चोप; पाहा व्हिडिओ..

0

Gautami Patil: गेल्या काही महिन्यांपासून वाद गौतमी पाटीलची (Gautami Patil) पाठ सोडायला तयार नाही. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा होत आहे. गौतमी अश्लील नृत्य करते. यामुळे तरुण उत्तेजित होतात. असा आरोप करत अनेक संघटनांनी गौतमी पाठीच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी केली असतानाच, आता गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात मोठा राडा झाल्याचं समोर आलं आहे.

पुणे जिल्ह्यामधील खेड तालुक्यातील बहिरवाडी या ठिकाणी गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू असताना काही तरुणांनी राडा करण्याचा प्रयत्न केला. एकीकडे गौतमी पाटीलचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सुरू असताना दुसरीकडे तरुणांनी घातलेल्या राड्यामुळे कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या महिला प्रेक्षकांनीच हातात काठ्या घेऊन झोप दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गौतमी पाटील हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं आहे. खास करून ग्रामीण भागामध्ये गौतमी पाटीलचा खूप मोठा चाहता वर्ग असल्याचं पाहायला मिळतं. गौतमी पाटीलचा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने तरुण उपस्थित राहतात. विशेष म्हणजे, तरुणांबरोबर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद असतो. मात्र गौतमी पाटीलच्या अनेक कार्यक्रमात राडे देखील झाल्याचे सातत्याने पाहायला मिळाले आहेत. आता पुन्हा एकदा खेड तालुक्यातील बहिरवाडी या ठिकाणी गौतमीच्या कार्यक्रमात राडा झाला.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात अनेक ठिकाणी राडा झाल्यामुळे अनेक कार्यक्रम देखील बंद करावे लागले आहेत. काही कार्यक्रमांमध्ये राडा झाल्यानंतर, संयोजक टीम राडा मिटवण्याचा प्रयत्न करते. एकंदरीत असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. मात्र खेड तालुक्यातील बहिरवाडी या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमातील राडा मिटवण्यासाठी थेट महिला प्रेक्षकांनीच हातामध्ये दांडकी घेतली.

खेड तालुक्यातील बहिरवाडी या ठिकाणी यात्रेनिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत होता. काही तरुणांनी धुडगुस घालण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रम सुरू असताना तरुणांनी केलेल्या राड्यामुळे आयोजकांना कार्यक्रम बंद देखील करावा लागला. मात्र कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या महिलांनी पुढाकार घेत हातामध्ये दांडकी घेत तरुणांना चोप दिला. आणि कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात महत्वाची भूमिका पार पाडली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील झाला आहे.

हे देखील वाचा Rail Coach Factory Recruitment 2023: रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये या उमेदवारांसाठी मोठी भरती; लगेच करा अर्ज..

regular sex benefits: नियमित सेक्स केल्याने शरीरावर होतोय हा गंभीर परिणाम; जाणून घ्या आठवड्यातून किती वेळा सेक्स करणं आहे फायदेशीर..

Big Breking: कसबा विधानसभा पोटनिवणुकीत काँग्रेस कडून रविंद्र धंगेकर निवडणूक लढवणार 

Sexual ability Tips: चाळीशीत हवीय पंचविशीतल्यासारखी लैंगिक क्षमता? लगेच करा हे काम..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.