Rail Coach Factory Recruitment 2023: रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये या उमेदवारांसाठी मोठी भरती; लगेच करा अर्ज..

0

Rail Coach Factory Recruitment 2023: जर तुम्ही दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय (ITI) केला असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. बेरोजगारीच्या या दुनियेत आता नोकरी मिळवणं खूप मोठं आव्हान आहे. बेरोजगारी बरोबरच महागाईने देखील उच्चांक गाठला असल्याने आता नोकरी करणं आवश्यक झालं आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असली तरी आता अनेक विभागांमध्ये काही जागांची भरती देखील होताना पाहायला मिळत आहे.

रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये तब्बल (Rail Coach Factory) 550 रिक्त जागांची भरती निघाली असून, या संदर्भातली अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2023 निश्चित करण्यात आली आहे. रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये केल्या जाणाऱ्या पाचशे पन्नास रिक्त जागांसाठी उमेदवारांची पात्रता त्याचबरोबर कोणकोणत्या पदासाठी किती जागा निश्चित करण्यात आल्या आहेत? तसेच उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घेऊया सविस्तर.

रिक्त पदानुसार जागा

‘फिटर’ या पदासाठी एकूण 215 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘वेल्डर’ या पदासाठी 230 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘मशीनिस्ट’ या पदासाठी पाच रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ‘पेंटर’ या पदासाठी 5 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.’कारपेंटर’ या पदासाठी 5 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी 75 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. मॅकॅनिकल या पदासाठी 15 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये 550 रिक्त जागांसाठी पदानुसार उमेदवारांची पात्रता ठेवण्यात आली आहे. रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये जर तुम्हाला नोकरी करायची असेल, तर तुम्हाला दहावीमध्ये किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे. सोबतच तुम्ही त्या-त्या विभागामधील आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेचा विचार करायचा झाल्यास उमेदवाराचे वय 31 मार्च 2023 पर्यंत 15 ते 24 वर्ष असणे आवश्यक आहे. एससी/एसटी आणि ओबीसी उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे.

परीक्षा फी/ नोकरीचे ठिकाण/ निवड

रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शंभर रुपये अर्ज शुल्क आकारलं जाणार आहे. मात्र एससी/एस टी आणि पीडब्ल्यूडी तसेच महिला उमेदवारांना मात्र कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना कपूरथला पंजाबमध्ये नोकरी करावी लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या निवडीविषयी सांगायचं झाल्यास, दहावी आणि आयटीआय गुणांच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. त्याचबरोबर कागदपत्रं आणि वैद्यकीय तपासणीनंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

ऑनलाईन अर्ज कसा करायचा? 

रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये नोकरी करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे. यासाठी अर्जाची शेवटची मुदत 4 मार्च ठेवण्यात आली आहे. उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://www.rcf.indianrailways.gov.in/ असं सर्च करायचं आहे. यानंतर तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर, तुम्हाला सविस्तर अर्ज करता येणार आहे. डायरेक्ट अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करा. डायरेक्ट अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करा. अधिकृत वेबसाइट https://www.rcf.indianrailways.gov.in/

हे देखील वाचा Big Breking: कसबा विधानसभा पोटनिवणुकीत काँग्रेस कडून रविंद्र धंगेकर निवडणूक लढवणार 

Sexual ability Tips: चाळीशीत हवीय पंचविशीतल्यासारखी लैंगिक क्षमता? लगेच करा हे काम..

regular sex benefits: नियमित सेक्स केल्याने शरीरावर होतोय हा गंभीर परिणाम; जाणून घ्या आठवड्यातून किती वेळा सेक्स करणं आहे फायदेशीर..

Gautami Patil: गौतमी पाटीलला कोर्टाचा दणका; अखेर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर बंदी..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.