Big Breking: कसबा विधानसभा पोटनिवणुकीत काँग्रेस कडून रविंद्र धंगेकर निवडणूक लढवणार
Big Breking: मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची (Kasaba Vidhansabha Election) प्रक्रिया सुरू आहे. भाजपकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला. परंतु पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेच्या पोटनिवडणुकीत भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांच्या विरोधात भाजपने आपला उमेदवार देऊन निवडून देखील आणला होता. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, असे चिन्ह होते. भाजपने ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी खूप प्रयत्न केले.
महाविकास आघाडीकडून कसबा विधानसभा मतदारसंघाची (Kasaba Vidhansabha Election) जागा काँग्रेसला देण्यात आली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षाचे देखील अनेक उमेदवार इच्छुक होते. परंतु तीनही पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित येऊन ही जागा काँग्रेसला देत रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी दिली आहे. रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे पुणे महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आहेत. मोदी लाटेत झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपचे गणेश बिडकर यांचा जोरदार पराभव केला होता. रवींद्र धंगेकर आणि भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश बापट यांच्यामधील राजकीय वैमनस्य सर्वत्र परिचित आहे.
भाजपच्या उमेदवाराला तगडं आव्हान देऊ शकेल असा एकमेव नेता म्हणून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्याकडे पाहिले जाते. रवींद्र धंगेकर यांनी या अगोदर देखील विधानसभा निवडणूक लढवली आहे. रवींद्र धंगेकर यांचा 2009 च्या विधानसभा निवडणुकीत गिरीश बापट यांच्या विरोधात निसटता पराभव झाला होता. त्यावेळी धंगेकरांनी गिरीश बापटांना घाम फोडला होता. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी जोरदार तयारी केली होती. पक्ष नेतृत्वाने रवींद्र धंगेकर यांना पुढच्या वेळी संधी देऊ, असे सांगून अरविंद शिंदे यांना तिकीट दिले होते. परंतु अरविंद शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला.
यावेळी देखील अरविंद शिंदे काँग्रेसकडून कसबा विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. परंतु रवींद्र धंगेकर यांनी कोरोना काळामध्ये केलेल्या कामामुळे धंगेकर यांचे कसबा विधानसभा मतदारसंघात चांगलेच वजन वाढले आहे. कोरोना काळामध्ये कुटुंबातील लोक कोरोनाग्रस्ताला दवाखान्यात घेऊन जात नव्हते, त्यावेळी बऱ्याच कोरोनाग्रस्तांना रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) स्वतः उचलून दवाखान्यात उपचारासाठी घेऊन जायचे. मतदारसंघातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील बऱ्याच लोकांना धंगेकर यांनी कोरोना काळामध्ये मदत केली आहे. धंगेकरांच्या कार्यालयात गेलेला माणूस मोकळ्या हाताने माघारी येत नाही, असे देखील बोलले जाते. रात्री २, ३ वाजता जरी फोन केला तरी धंगेकर तिथे हजर असतात, असे बोलले जाते.
महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांवर असलेली पकड, कुणाच्या काही छोट्या छोट्या समस्या असतील, प्रशासकीय कामे असतील, दवाखान्याची काही कामे असतील अशा प्रत्येकाला मदत करणारी व्यक्ती म्हणून रवींद्र धंगेकर हे परिचित आहेत. रवींद्र धंगेकर यांच्या कार्यालयावरील गर्दी एखाद्या आमदाराला देखील लाजवेल अशी असते. कसबा मतदारसंघातील ब्राह्मण समाजाची देखील मते घेऊ शकणारा एकमेव व्यक्ती म्हणजे रवींद्र धंगेकर हेच असतील. रवींद्र धंगेकर कुठल्याही पक्षात असतील तरी त्या पक्षाला त्यांना मानणारा वर्ग मत देत असतो. या निवडणुकीत धंगेकरांना कार्यकर्त्यांशी असलेला प्रचंड जनसंपर्क कामी येईल.
रवींद्र धंगेकर यांच्या एवढे प्रचंड जनसंपर्क असणारे आणि ब्राह्मण समाजाची देखील मते घेऊ शकणारा उमेदवार काँग्रेसने मैदानात उतरवला आहे. भाजपवर नाराज असणाऱ्या मतदारांचा देखील धंगेकर यांना फायदा होणार आहे. एकेकाळी भाजपच्या गिरीश बापटांना घाम फोडणारा नेता मैदानात उतरवल्यामुळे भाजपच्या ताब्यात असणारा आणि हक्काचा मतदारसंघ काँग्रेस यावेळी आपल्याकडे घेईल अशी चर्चा होताना पाहायला मिळत आहे.
हेही वाचा: Viral Video: कोल्हापूरच्या एका मर्दान लग्नात घेतलेला उखाणा सोशल मीडियावर घालतोय धूमाकूळ..
Chanakya niti: कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होण्याचे चाणक्य यांचे हे चार मूलमंत्र माहीत असायलाच हवे..
Chanakya Niti: चाणक्यांच्या या मार्गाचा अवलंब केल्यास झटक्यात मिळेल यश..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम