Viral Video: कोल्हापूरच्या एका मर्दान लग्नात घेतलेला उखाणा सोशल मीडियावर घालतोय धूमाकूळ..
Viral Video: कोल्हापूर म्हटल की काही ना काही हटके असतेच. कोल्हापुरी (Kolhapur) भाषा तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात इतर भागात शिवी समजले जाणारे शब्द कोल्हापुरात प्रेमाने आणि आपुलकीसाठी बोलले जातात. तसे पाहायला गेले तर कोल्हापूरला दिग्गज पैलवान देखील घडत असतात. कोल्हापूरच्या मातीत सगळ्या गोष्टी मुबलक पाहायला मिळतात. इकडची लोक दिसायला जरी रगील दिसत असली तरी तेवढीच प्रेमळ असतात. कोल्हापुरात कशाचीच कमी नाही. पाठीमागील महापूर सोडले तर कोल्हापुरात नैसर्गिक आपत्ती देखील फारशी नसते. (Viral Video)
कोल्हापूरच्या एका मर्दान त्याच्या लग्नात घेतलेला उखाणा एवढा प्रचंड गाजतोय की सोशल मीडियावर हा व्हिडिओ आत्तापर्यंत १ कोटी १७ लाखापेक्षा अधिक (११.७ मिलियन) लोकांनी बघितला आहे. हा व्हिडिओ रेडिओ सिटीचा (Radio City) आरजे सुमित (RJ Sumit) याच्या लग्नातला आहे. या व्हिडिओत “हापूस आंबा पिवळा आंब्याची पांढरी कोय, श्वेता बरोबर लग्न करून थंडीची केलिया मी सोय”, असा उखाणा त्याने घेतला आहे. या व्हिडिओला ६ लाखापेक्षा अधिक लाइक्स मिळाल्या आहेत.
आरजे सुमितने (Rj Sumit) घेतलेल्या उखाण्याची चर्चा महाराष्ट्रात (Viral Video) तर होतच आहे. परंतु त्याच्या पत्रिकेची चर्चा सोशल मीडियावर आणि मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात झाली होती. बऱ्याच न्यूज चॅनलने त्याची मुलाखत घेतली होती. लग्नाचं निमंत्रण द्यालोय.. यायला लागतय, २४ नोव्हेंबरला म्हणजे शनिवारी ४ वाजता साखरपुडा हाय आणि सांच्याला ७ वाजता हळदी.., डीजे तेन सांगिटलाय. लोळून नाचूया, तुम्ही फक्त वेळ काढून या. लग्न रव्वारी 1 वाजून ३ मिनिटाचा मुहूर्त काढलाय भटजींनी. नाटकं सांगायची न्हाईत. गपगुमान यायचं. तसा खर्च बी ढीग केलाय, त्यामुळं काय ईषयच न्हाई. जेवणा बिवणाची सोय हाय. पत्ता माहितीये न्हव, अशा आशयाची त्यांच्या लग्नाची पत्रिका होती.
सुमित हा रेडिओ जॉकी (RJ Sumit) म्हणून रेडिओ सिटी मध्ये काम करतो. सुमितचे सोशल मीडियावर १.५ लाखापेक्षा अधिक फॉलॉवर्स आहेत. तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो त्याच्या व्हिडिओच्या माध्यमांतून तरुणाईला चांगला संदेश देत असतो, तसेच त्यांचे मनोरंजन देखील करत असतो. सुमित हा सामाजिक कार्यात देखील तेवढाच सक्रिय असतो. त्याने या अगोदर काही सामाजिक उपक्रम देखील राबवले आहेत. कोल्हापुरी भाषा सोशल मीडियावर गाजवण्यास सुमितचा मोठा वाटा आहे. कोल्हापुरात सुमित एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. त्याला मानणारा खूप मोठा वर्ग कोल्हापुरात पाहायला मिळतो. हेच त्याचे चाहते त्याने केलेल्या कुठल्याही आव्हानाला भरभरून प्रतिसाद देत असतात.
Chanakya niti: कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होण्याचे चाणक्य यांचे हे चार मूलमंत्र माहीत असायलाच हवे..
Online SBI Account: आता घरबसल्या काढता येणार SBI Bank account; जाणून घ्या साविस्तर प्रोसेस..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम