Rishabh Pant Health Update: मोठी बातमी! ऋषभ पंतचे पुन्हा ऑपरेशन होणार; आता जाणून घ्या कधी उतरणार मैदानात..

0

Rishabh Pant Health Update: 30 डिसेंबर हा दिवस भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी काळा दिवस होता. दिल्लीवरून (Delhi) रुडकी (Roorkee) या आपल्या घरी जात असताना भारताचा विकेटकीपर आणि आक्रमक फलंदाज ऋषभ पंतचा (Rishabh pant) कार अपघात झाला. हा अपघात प्रचंड भीषण होता. अपघात झाल्यानंतर, पुढच्या पाच मिनिटात कार जळून खाक झाली. मात्र सुदैवाने ऋषभ पंत थोडक्यात बचावला. आता पंतच्या उपचारावर मोठी माहिती समोर आली आहे.

भारतीय क्रिकेट चाहते खास करून ऋषभ पंतचे चाहते, ऋषभ पंतला मैदानावर लवकरात लवकर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ऋषभ पंत लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी अनेक जण प्रार्थना देखील करत आहेत. यातच आता पंतच्या उपचारावर मोठी माहिती समोर आली आहे. खरंतर पंतच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. ऋषभ पंतच्या प्रकृतीमध्ये अधिक गतीने सुधारणा होत आहे. Inside स्पोर्टनुसार ऋषभ पंतला पुढच्या सोमवार पर्यंत कोकीलाबेन रुग्णालयामधून (Kokilaben Hospital) डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयच्या BCCI अधिकाऱ्यांनी इन्साइड स्पोर्टला दिलेल्या माहितीमध्ये ऋषभ पंतचे ऑपरेशन यशस्वी झाल्याचे म्हटले आहे. त्याची प्रकृती देखील मोठ्या वेगाने सुधारत असल्याचं सांगण्यात आलं आहे. या आठवड्यात हॉस्पिटल मधून त्याला डिस्चार्ज मिळणार असून, पुढच्या एका महिन्यात दुसरे ऑपरेशन करण्याची तयारी तपासानंतर मेडिकल टीम घेणार आहे.

30 डिसेंबरला दिल्लीवरून आपल्या रूडकी या आपल्या घरी जात असताना ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात तो थोडक्यात बचावला. मात्र त्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या पाठीला कपाळाला, आणि गुडघ्याला दुखापत झाल्याने आता त्याला पूर्णपणे रिकव्हरी होण्यासाठी ६ ते ७ महिने कालावधी लागणार आहे. तब्बल एक महिना उपचार केल्यानंतर, पंत आता या आठवड्यात हॉस्पिटल मधून घरी परतणार आहे.

भीषण अपघातामध्ये ऋषभ पंतच्या उजव्या गुडघ्याच्या लिगामेंटला मोठी दुखापत झाली होती. पंतच्या गुडघ्याच्या लिगामेंटचे ऑपरेशन यशस्वीरित्या झाले आहे. एवढेच नाही, तर तो उपचाराला जबरदस्त प्रतिसाद देत असून लवकर रिकव्हरी होत आहे. मात्र असं असलं तरी त्याला आणखी एका ऑपरेशनला हॉस्पिटलमध्ये यावे लागणार आहे. फेब्रुवारीमध्ये पंतच्या उजव्या गुडघ्यावर ACL वरती ऑपरेशन होणार आहे.

BCCI टीम डॉ. पारडीवालांच्या संपर्कात

ऋषभ पंतचे दुसरे ऑपरेशन कधी करायचे? हे सर्व प्रक्रिया मेडिकल टीम पाहत आहे. आमची मेडिकल टीम देखील डॉ. पारडीवाला तसेच हॉस्पिटलच्या संपर्कात असून, त्याला लवकरच मैदानात पाहण्याची आमची इच्छा आहे. पंतला ऑपरेशन नंतर पूर्णपणे रिकव्हरी व्हायला चार पाच महिने कालावधी लागणार आहे. त्यानंतर त्याचे ट्रेनिंग सुरू होईल. ट्रेनिंगसाठी देखील त्याला दोन महिन्यांचा काळ लागणार आहे. त्यानंतर तो मैदानात उतरण्यास सज्ज होऊ शकतो. असं डॉक्टरांचे म्हणणे आहे. याचा अर्थ तो आयपीएल आणि 2023 विश्वचषकाला मुकण्याची दाट शक्यता आहे.

हे देखील वाचाOnline SBI Account: आता घरबसल्या काढता येणार SBI Bank account; जाणून घ्या साविस्तर प्रोसेस..

Chanakya niti: कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होण्याचे चाणक्य यांचे हे चार मूलमंत्र माहीत असायलाच हवे..

India Post Recruitment 2023: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पोस्ट विभागात सर्वात मोठी भरती; जाणून घ्या साविस्तर..

Karthik vajir: लोकशाही असूनही शिक्षक अतिरेक्यासारखं पायदळी तुडवतात, हे सांगणाऱ्या लेकराची परिस्थिति पाहून वाहतील अश्रू; पाहा व्हिडिओ..

IND vs AUS: T20 नंतर कसोटी संघातूनही केएल राहुलचा पत्ता कट..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.