Chanakya Niti: तुमच्यामध्ये हे चार गुण असतील तर अफाट कष्ट करूनही मिळणार नाही यश..
Chanakya Niti: आजच्या या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला यशस्वी व्हायचे आहे. (Everyone make a successful life) यश मिळवण्यासाठी अनेकजण तारेवरची कसरत करत असतात. परंतू अनेकांना मेहनत करुन सुद्धा यश मिळत नाही. यश मिळवण्याचा वाटेत कायम अडथळे येत राहतात. अशावेळी त्या व्यक्तीला निराश न होता आत्मपरीक्षण करण्याची गरज असते. बर्याचदा आपल्यातील काही सवयींमुळे आपण मेहनत करुन सुद्धा यशाच्या लांबच राहतो. त्यामुळे आत्मपरिक्षण करुन त्या सवयी शोधण्याची गरज असल्याचे मत आचार्य चाणक्य (aacharya Chanakya) यांनी मांडले आहे. तसेच माणसाच्या कुठल्या सवयी त्याच्या यशाच्या मार्गात अडथळे निर्माण करतात याबाबत सुद्धा चाणक्य यांनी मार्गदर्शन केले आहे.
आचार्य चाणक्य विविध विषयात पारंगत होते. चाणक्य यांनी लिखाणातून त्यांचे विचार मांडले आहे. त्यांच्या विचारांना चाणक्य निती म्हटले जाते. माणवी जिवनाला समृद्ध करण्यासाठी चाणक्य निती मार्गदर्शक ठरते. तसेच आज प्रत्येकाच्या जिवनात काही ना काही समस्या आहेत. चाणक्य निती नुसार आपल्या जिवनात काही महत्वाचे बदल घडवल्यास सर्व समस्यांवर मार्ग मिळू शकतो. तसेच जिवनात यश प्राप्त करण्यासाठी सुद्धा चाणक्य यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे. माणसातील चार वाईट सवयी त्याला यश मिळवण्यापासून लांब ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. नेमक्या कोणत्या आहेत, त्या सवयी जाणून घेऊया सविस्तर.
संगत आपल्या जिवनावर फार मोठा प्रभाव पाडते. आचार्य चाणक्य यांनी सुद्धा यावरच भाष्य केले आहे. आपल्या आजूबाजूचे वातावरण तसेच आपण कुणासोबत आपला जास्तीत जास्त वेळ घालवतो हे फार महत्वाचे ठरते. बुद्धिवान लोकांच्या संपर्कात राहिल्यास आपल्याला त्याचे अनेक फायदे होतात. मात्र याउलट वाईट आणि चुकीची संगत आपल्या जिवनावर फार मोठा परिणाम करते. वाईट आणि चुकीची संगत असणार्या सोबत राहिल्यास आपण सुद्धा वाईट मार्गाला लागतो. त्यामुळे आपण कोणाची संगत धरायला पाहिजे, याचा विचार करणे फार महत्वाचे आहे असे चाणक्य म्हणतात. यशस्वी व्हायचे असेल तर चांगले विचार आणि बुद्धिवान व्यक्तींचीच संगत धरली पाहिजे. असे चाणक्य नितीमध्ये सांगण्यात आले आहे.
आपण पाहतो, प्रचंड पैसा कमावणार्या व्यक्तीमध्ये सुद्धा समाधानाचा अभाव असतो. पैसा असून सुद्धा यश मिळवण्यात अनेकजण अयशस्वी होत असतात. अशावेळी चाणक्य नीती मधील हा विचार मार्गदर्शक ठरु शकतो. चाणक्य नीती नुसार पैशांचा वापर करण्याची बुद्धी माणसाकडे असायला पाहिजे. अन्यथा पैसा कमावून सुद्धा मनुष्य सुख प्राप्त करु शकत नाही. पैशांचा वापर कायम चांगल्या कामांसाठी करायला पाहिजे. व्यसन आणि इतरांची फसवणूक करण्यासाठी वापरण्यात आलेला तुमचा पैसा तुम्हाला अधोगतीकडे घेऊन जातो. चाणक्य म्हणतात, माता लक्ष्मी सुद्धा अशा व्यक्तींकडे दिर्घकाळ टिकत नाही.
आचार्य चाणक्य म्हणतात, भेदभाव करणे अतिशय वाईट सवय आहे. भेदभाव करण्याची सवय असणाऱ्या व्यक्ती कधीच यशापर्यंत पोहचू शकत नाहीत. कारण भेदभाव करण्याची विचारसरणी असणारे लोक कायम त्यांच्या अहंकारातच असतात. त्यामुळे अनेक बुद्धिमान लोकांच्या संपर्कात ते येऊ शकत नाही. याशिवाय अशा व्यक्तींना समाजात सुद्धा कुठलेच स्थान नसते. अशा व्यक्तीशी संपर्क ठेवण्यापासून लोकं लांबच राहतात. त्यामुळे त्यांच्या बुद्धीचा विकास होत नाही. परिणामी ते यश मिळवण्यापासून लांब राहतात.
मानवी जिवनाला समृद्ध करण्यासाठीचे अनेक मार्ग चाणक्य यांनी सांगितले आहे. त्यापैकीच राग आणि लोभ मनुष्यासाठी कसे हानिकारक आहे, याबाबत सुद्धा त्यांनी भाष्य केले आहे. चाणक्य म्हणतात, राग आणि लोभ हे माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. त्यामुळे हे दोन अवगुण असणार्यांपासून कायम लांब राहिले पाहिजे. रागामध्ये मनुष्याची बुद्धी शुन्य होऊन जाते. तसेच लोभामुळे मनुष्य झुकण्यास तयार असतो. तसेच लोभामुळे तो शत्रूच्या जाळ्यात अतिशय सहजरित्या अडकू शकतो. त्यामुळे या दोन सवयी तुमच्या यशाच्या मार्गात नेहमी अडथळा ठरु शकतात.
हे देखील वाचा Money laundering case: जॅकलीन, नोरा कशा अडकल्या सुकेशच्या जाळ्यात? जॅकलीनला तर रात्रीत चार वेळा..
Virat Kohli: इच्छा नसूनही रोहीत शर्मामुळे BCCI ला द्यावा लागतोय विराट कोहलीचा बळी..
BCCI: भूकंप! BCCI संधीच देत नसल्याने या खेळाडूने अखेर दुसर्या देशाकडून खेळण्याचा घेतला निर्णय..
Relationship tips: महिलांच्या या पाच अवयवांकडे पुरुष होतात सर्वाधिक आकर्षित; पाचवा आहे खूपच रंजक..
Chanakya Niti: कुटुंबात वाईट काळ सुरू होण्यापूर्वी हे पाच संकेत देतात इशारा..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम