Dhananjay Munde Car Accident: धनंजय मुंडे यांच्या गाडीला भीषण अपघात, मीडियाने काय पसरवली अफवा?

0

Dhananjay Munde Car Accident: गेल्या काही महिन्यांपूर्वी बीडचे शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार विनायक मेटे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये विधान परिषदेचे आमदार विनायक मेटे यांना आपले प्राण गमवावे लागले होते. ते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या नेत्यांपैकी एक होते. त्यांचा जाण्याने मराठा समाजाला एक झुंजार नेता गमवावा लागला. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर त्यांचा अपघात झाला होता. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर गाडीत बसणाऱ्या प्रत्येकाला सीट बेल्ट बंधनकारक करण्यात आले. (Dhananjay Munde Car Accident)

 

त्यानंतर नुकताच खटावचे भाजप आमदार तसेच सातारा जिल्हा भाजपा अध्यक्ष जयकुमार गोरे यांचा भीषण अपघात झाला. फलटणमधील बानगंगा नदीत पुलावरून त्यांची गाडी कोसळली. चालकाला पुलाचा अंदाज न आल्यामुळे जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांच्यासह त्यांच्या गाडीमधील इतर लोकांना देखील दुखापत झाली. सध्या त्यांच्यावर उपचार देखील चालू आहेत. ही घटना ताजीच असताना धनंजय मुंडे यांच्या बाबतीत देखील असाच प्रकार घडला आहे. त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे.

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला भीषण अपघात (Dhananjay Munde Car Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला. मतदारसंघातील कामे उरकून धनंजय मुंडे परळीला निघाले होते. परळीत मुंडे यांच्या गाडीच्या वाहन चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडला आहे. या अपघातात धनंजय मुंडे यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच त्यांच्या छातीला मार लागला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी स्वतः सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले आहे. परंतु असे असले तरी देखील मुंडे यांना मुंबईत दाखल करण्यात येणार आहे.

 

काय म्हणाले धनंजय मुंडे? धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे पोस्ट करत आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये. अशी पोस्ट मुंडे यांनी त्याच्या फेसबुक खात्यावरून शेअर केली आहे. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे, आवाहन केले आहे.

 

धनंजय मुंडे यांनी स्वतः फेसबुक पोस्ट करून अशी माहिती दिली आहे. परंतु या अगोदर काही वेब पोर्टलने धनंजय मुंडे हे स्वतःच गाडी चालवत असल्याचे वृत्त दाखवले होते. परंतु धनंजय मुंडे यांनी स्वतः पोस्ट करत आपल्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याचे सांगितले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे हे स्वतः गाडी चालवत असल्याचा काही वेब पोर्टलने केलेला दावा खोटा आहे. त्यामुळेच कदाचित धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये शेवटी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले असावे.

 

धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात होण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी देखील त्यांच्या छातीला दुखापत झाली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात येणार आहे. त्यांना परळीहून लातूरला घेऊन जाण्यात येणार आहे. त्यानंतर विशेष विमानाने धनंजय मुंडे यांना मुंबईत उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. मुंडे यांच्या गाडीला रात्री उशिरा अपघात झाल्यामुळे याबाबत कार्यकर्त्यांना कल्पना नव्हती. परंतु ज्यावेळी कार्यकर्त्यांना ही घटना समजली, त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये ही बातमी प्रचंड वेगाने पसरली. धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते त्यांचे प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.

हेही वाचा: urfi javed: उर्फी जावेदने शोधून काढले संजय आणि चित्रा वाघ कनेक्शन; जाणून घ्या उर्फि जावेद चित्रा वाघ वाद..

Cristiano Ronaldo Salary Breakup: रोनाल्डो कमावणार तासाला 21 लाख रुपये, एवढंच नव्हे तर..

Rishabh Pant Update: यामुळे ऋषभ पंतला इन्फेक्शनची शक्यता; जाणून घ्या रुग्णालयातली अपडेट..

Chanakya Niti: या गोष्टीत पत्नीचे समाधान नाही झाले तर पैशाची चणचण सतत भासते..

Dhananjay Munde heart attack: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack), ब्रीच कँडी रुग्णालयात..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.