Rishabh pant accident video: घायल होता, अंगावर कपडे नव्हती, तरीही लोकं व्हिडिओ काढत होती; तेवढ्यातूनही पंत म्हणाला बंद कर..; पाहा व्हिडिओ…

0

Rishabh pant accident video: दिल्लीहून (Delhi) डेहराडूनला (dehradun) जात असताना ऋषभ पंतचा आज पहाटे सव्वा पाच वाजता रुडकीच्या (Roorkee) गुरुकुल नरसन (Gurukul Narsan) परिसरामध्ये भीषण अपघात झाला. बरोबर सव्वा पाच वाजता ऋषभ पंची (Rishabh pant) गाडी डिव्हायडर धडकून पलटी झाली. आणि 5 वाजून 28 मिनिटांनी गाडीने पेट घेतला. तरीदेखील ऋषभ पंत सुदैवाने बचावला. तमाम क्रिकेट चाहत्यांचे प्रेम आणि देवाच्या आशीर्वादामुळेच ऋषभ पंत वाचला, हे तुम्ही आता भीषण अपघात पाहिल्यानंतर म्हणाल. (Rishabh pant car accident video)

ऋषभ पंचा अपघात इतका भीषण होता, की एक्सीडेंट झाल्यानंतर, पुढच्या पाच मिनिटात गाडी जळून खाक झाली. अपघातानंतर ऋषभ पंत बिलकुलही पॅनिक झाला नाही. ऋषभ पंत मोठ्या धैर्याने आलेल्या संकटाचा सामना करत स्वतःहून गाडीने पेट घेतल्याबरोबर बाहेर पडला. ऋषभ पंत वेळीच बाहेर पडल्याने, आपल्या चाहत्यांना पुन्हा मैदानात पाहायला मिळणार आहे. मात्र त्यासाठी त्याच्या चाहत्यांना एक दीड वर्ष वाट पाहावी लागणार आहे.

भारतीय लोकांसाठी आजचा दिवस फारच वाईट होता. सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचं निधन झालं, त्यांनतर कसोटी क्रिकेटला आपल्या तालावर नाचवणाऱ्या ऋषभ पंतचा कार एक्सीडेंट झाला. हा एक्सीडेंट प्रचंड भीषण होता. त्या एक्सीडेंटचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेक दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात. गाडीने पेट घेतल्यानंतर, ऋषभ पंतने मोठ्या हिंमतीने वेळीच बाहेर येत स्वतःचा जीव वाचवला. ऋषभ पंतच्या अंगावर कपडे देखील नसल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

ऋषभ पंतचा एक्सीडेंट झाल्यानंतर, पुढच्या पाच मिनिटात गाडीने पेट घेतला. मात्र तेवढ्या वेळात ऋषभने गाडीतून बाहेर येण्यात यश मिळवलं. बाहेर आल्यानंतर स्थानिकांकडून रिषभ पंतला मदत देखील मिळाली. अंगावर कपडे नसल्याने ऋषभ पंतला एका स्थानिक व्यक्तीकडून चादर देण्यात आली. लोकांचा सहारा घेत ऋषभ पंत एक्सीडेंट झाल्यानंतर, उभा राहिला. डोक्याला जबर जखम झाल्यामुळे चेहऱ्यावर रक्त येत असल्याचे देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

एकीकडे ऋषभ पंत अंगावर चादर घेऊन वेदनेने विव्हळत स्वतःला सावरत होता. स्थानिकांनी ॲम्बुलन्सला (ambulance) फोन करून ॲम्बुलन्स देखील बोलावली होती, तोपर्यंत ऋषभ पंत ॲम्बुलन्सची वाट पाहत जखमी अवस्थेत उभा होता. मात्र तेवढ्यात एका इसमाने ऋषभ पंतचा व्हिडिओ (Rishabh pant video) काढायला सुरुवात केली. ऋषभ पंतचे कॅमेराकडे लक्ष गेलं. आणि ऋषभ पंत संतापल्याचं देखील पाहायला मिळत आहे. ऋषभ पंतला मदत करण्याऐवजी जखमी अवस्थेतला व्हिडिओ काढल्याने चाहते देखील संतापले आहेत.

हे देखील वाचाRishabh pant car accident Video: ..म्हणून झाला ऋषभ पंतचा अपघात; शुद्धीवर आल्यानंतर ऋषभ पंतने सांगितला घटनाक्रम..

Rishabh pant car accident: ऋषभ पंतचा भीषण अपघात; संपूर्ण कार जळाली कसाबसा बाहेर आला पण…; पाहा अपघाताचे CCTV फुटेज..

PMGKAY: मोफत रेशनच्या नियमात सरकारने केला मोठा बदल; आता रेशन मिळणार इतके..

PM Kusum Yojana: आता मागेल त्याला दिला जाणार सौर पंप; जाणून घ्या सौर पंप मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया..

MSRTC Recruitment 2023: दहावी पास उमेदवारांसाठी एसटी महामंडळात निघाली मोठी भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

MPSC Recruitment 2023: MPSC मार्फत या पदांसाठी हजाराहून अधिक जागांची मेगा भरती..

Wearing Bra While Sleeping: तुम्हीही ब्रा घालून झोपता? असाल तर त्वरीत थांबवा अन्यथा..

Relationship Tips: संबंध करताना या 5 गोष्टींतून कळते तुमचा पार्टनर मनापासून साथ देतोय का..

Shikhar Dhawan: मिस्टर आयसीसीचे करिअर संपुष्टात; BCCI ने संपवलं शिखर धवनचे करिअर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.