Rishabh pant car accident Video: ..म्हणून झाला ऋषभ पंतचा अपघात; शुद्धीवर आल्यानंतर ऋषभ पंतने सांगितला घटनाक्रम..
Rishabh pant car accident Video: भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतचा (Rishabh pant) भीषण कार अपघात झाला. या अपघातात तो जबर जखमी झाला आहे. सद्या त्याच्यावर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पुढील उपचारासाठी त्याला दिल्लीला आणलं जाणार आहे. मात्र सध्या डेहराडूनमध्ये (dehradun Max hospital) धुकं असल्याने एअर ॲम्बुलन्सने दिल्लीला आणलं जाऊ शकत नाही. ऋषभ पंतच्या जीवाला धोका नसला तरी त्याला जबर दुखापत झाली आहे. त्याच्या डोक्याला, पायाला आणि पाठीला मोठी दुखापत झाली आहे. (Rishabh pant car accident video)
ऋषभ पंत आज दिल्लीहून रूडकी (Roorkee) या आपल्या घरी (Roorkee home) निघाला होता. पहाटे सव्वा पाचच्या सुमारास रूडकी येथील नारसन परिसरात हा भीषण अपघात झाला. ऋषभ पंत शुद्धीवर आल्यानंतर, हा अपघात माझी झोप लागल्याने झाला असं सांगितलं,असलं तरी आता वेगळीच माहिती समोर येत आहे. भारतीय एकदिवसीय आणि टी-ट्वेंटी संघातून ऋषभ पंतला वगळल्यानंतर, ऋषभ पंत दोन दिवसापूर्वी दुबईहून दिल्लीला आला होता. आज आपल्या घरी आईला सरप्राईज देण्यासाठी निघाला होता.
नवीन वर्षात आईला सरप्राईज दयायचं म्हणून, ऋषभ पंतने कोणालाही सांगितले नाही. तो आपल्या घरी एकटाच निघाला होता. दुबईवरून दिल्लीला परतल्यामुळे त्याची रात्रभर झोप झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. हिवाळ्याच्या दिवसांत डेहराडूनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात धुकं पडते. असं असताना देखील ऋषभ पंत बेजबाबदारपणे दिल्लीहून आपल्या रूडकी या घराकडे निघाला. एकीकडे पूर्ण वेळ झोप झाली नव्हती, तर दुसरीकडे धुकं असल्याने गाडी चालवण्यासाठी देखील मोठी अडचण निर्माण होत होती.
https://twitter.com/News18Jammu/status/1608771656675397638?t=1hBj8E5b3ZkhHLA9Mb1TuQ&s=19
दिल्ली ते ऋषभ पंतच्या घराचं अंतर जवळपास 180 किलोमीटरच्या आसपास आहे. दिल्लीहून रूडकी आपल्या घरी रात्रीचा प्रवास करत असल्याने पहाटे सव्वा पाचच्या सुमारास प्रचंड मोठ्या प्रमाणात धुकं असल्याने त्याला दिसेनासे झाले. एकीकडे हे कारण दिलं जात असतानाच, दुसरीकडे त्याला झोप देखील लागली असल्याचं बोललं जात आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर, ऋषभ पंत शुद्धीवर आला. शुद्धीवर आल्यानंतर, त्याने देखील मला झोप लागली असल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं.
Rishabh Pant saved. God was with him in the form of these human beings. Video Courtesy @NewsArenaIndia pic.twitter.com/ZkxbHbcJol
— Bulls Eye (@sreeramjvc) December 30, 2022
नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ पंत आपल्या आईला नवीन वर्षासाठी सरप्राईज देणार होता. त्यासाठी त्यांने कुटुंबातील कोणालाही मी घरी येत असल्याचं कळवलं नव्हतं. मात्र रात्री झोप झाली नसल्याने, आणि पहाटे प्रचंड धुकं असल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात त्याच्या पाठीला, दुखापत झाली आहे. पाय देखील फ्रॅक्चर झाला आहे. मात्र तो आता सुखरूप आहे. बीसीसीआयने देखील ऋषभ पंचच्या अपघातावर अपडेट दिली असून, ऋषभ पंतच्या रिकव्हरीची सर्व जबाबदारी BCCI ने उचलली आहे.
हे देखील वाचा Rishabh pant car accident: ऋषभ पंतचा भीषण अपघात; संपूर्ण कार जळाली कसाबसा बाहेर आला पण.. पाहा अपघाताचे CCTV फुटेज..
Acharya Chanakya: पत्नीमध्ये हे चार गुण असतील तर यश तुमच्या पायाशी घालते लोटांगण..
MPSC Recruitment 2023: MPSC मार्फत या पदांसाठी हजाराहून अधिक जागांची मेगा भरती..
PMGKAY: मोफत रेशनच्या नियमात सरकारने केला मोठा बदल; आता रेशन मिळणार इतके..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम