most searched people in 2022: भारतात गुगलवर सर्वाधिक सर्च झालेली दहा नावं जाणून तुम्हीही व्हाल चकित..

0

most searched people in 2022: कोणत्याही प्रश्नाचे उत्तर हवं असेल, तर प्रत्येक जण गुगलवर सर्च करतो. अनेक जण आपलं सामान्य आयुष्य जगत असतात. मात्र अशा काही लोकांची अचानक इतकी चर्चा होते, की अनेकजण या लोकांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. अर्थात यासाठी Google सगळ्यात प्रभावी माध्यम आहे. 2022 या वर्षामध्ये देखील अशा काही लोकांची जबरदस्त चर्चा झाली, ज्यांच्या विषयी अनेकांना फारसं काही माहिती नव्हतं. मात्र ही लोक गुगलवर सर्वाधिक सर्च केली गेली. कोणती आहेत, ही लोक? आणि का सर्च केली गेली जाणून घेऊया सविस्तर.

भारतात गुगलवर सर्वाधिक सर्च (Google Search) केलेल्या यादीमध्ये काही राजकारण्यांचा समावेश आहे. काही क्रीडा क्षेत्रातील मंडळी आहेत. तर काही चित्रपटाशी संबंधित सेलिब्रिटी देखील आहेत. ज्यांचं नाव यापूर्वी फारसं चर्चेत राहिलं नाही. गुगलवर भारतात सर्वाधिक सर्च केलेल्या नावामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्या नुपूर शर्मा यांचा पहिला क्रमांक लागतो. त्यांनी पैगम्बर मोहम्मद यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. अनेकांना नुपूर शर्मा कोण होत्या माहीत नसल्याने, अनेकांनी नुपूर शर्मा हे नाव सर्च केले.

भारतामध्ये सर्वाधिक सर्च केलेल्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर द्रौपदी मुर्मु यांचा क्रमांक लागतो. द्रौपदी मुर्मु या भारताच्या राष्ट्रपती बनल्यानंतर, गुगलवर त्यांचं नाव सर्वाधिक सर्च करण्यात आलं. द्रौपदी मुर्मु आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती बनल्या. यापूर्वी देशात द्रौपदी मुर्मु हे नाव फारसं कोणालाही माहीत नसल्याने, अनेकांनी या कोण आहेत? याची माहिती गुगलवर सर्च करून घेतली.

गुगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या यादीमध्ये इंग्लंडचे राष्ट्राध्यक्ष ऋषी सनक यांचा क्रमांक लागतो. इंग्लंडचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांचं नाव गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आला. लिझ ट्रस यांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्याचा राजीनामा दिल्यानंतर, त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. सुनक हे भारतीय वंशाचे असल्याने कदाचित त्यांचं नाव अधिक चर्चेत आले. आणि त्याला Google वर सर्च करण्यात आले.

प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (susmita Sen) यांचे देखील नाव गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलं. या यादीमध्ये सुस्मिता यांचा चौथा क्रमांक लागतो. आयपीएलचे पहिले चेअरमन ललित मोदी (Lalit Modi) यांच्यासोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर, तिचं नाव सर्वाधिक चर्चेत आलं. मनी लाँड्रिंग, गैरवर्तन त्याचबरोबर अनुशासन विरुद्धच्या कारवाईत दोषी आढळल्यानंतर, ललित मोदी 2010 ला देश सोडून पळून गेले.

Google वर सर्वाधिक सर्च केलेल्या यादीत पाचव्या क्रमांकावर लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंजली अरोरा (Anjali Arora) हिचा नंबर लागतो. ती कंगना राणौत (Kangna Ranaut) होस्ट असणाऱ्या ‘लॉक अप’ या रिअॅलिटी शो नंतर अधिक चर्चेत आली. अंजली अरोरा सोशल मीडियावर खूप चर्चेत असणारी इन्फ्लुएंसर आहे. मात्र गुगलवर तिला सर्च करण्याचं कारण वेगळं आहे. 2022 मध्ये तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या कारणामुळे तिला Google वर सर्वाधिक सर्च केलं गेलं.

या नंतर Google वर सर्वाधिक सर्च झालेल्या यादीत अब्दू रोगिक (abdu rogic) याचा नंबर लागतो. अब्दू रोगिक हा गायक, ब्लॉगर त्याचबरोबरच बॉक्सर देखील आहे. त्याची उंची खूप लहान आहे. मात्र आनंदी-लकी वर्तनासाठी त्याने प्रसिद्धी मिळवली आहे. रोसिकला ग्रोथ हार्मोनच्या कमतरतेचा त्रास आहे. 19 व्या वर्षीमध्ये देखील त्यांच्यात बालकाचा दर्जा जाणवतो. बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये एंट्री झाल्यानंतर, त्याची लोकप्रियता वाढली.

महाविकास आघाडी सरकारचा भाग असलेल्या आणि शिवसेना पक्षाचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेमधून एक तृतीयांश पेक्षा जास्त आमदार फोडले. आणि महाविकास आघाडी सरकार मधून बाहेर पडले. पुढे त्यांनी भारतीय जनता पार्टी (BJP) सोबत शिवसेनेतून (shivsena) बाहेर पडलेल्या चाळीस आमदारांना सोबत घेऊन सरकार स्थापन केले. यानंतर एकनाथ शिंदे कोण आहेत, हे सर्वाधिक सर्च केलं गेलं.

वयाच्या 41 व्या वर्षी मुंबईकर प्रवीण तांबेने (Pravin tambe) इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) पदार्पण केले. सर्वात वयस्कर खेळाडू म्हणून, आयपीएलमध्ये पदार्पण करत प्रवीण तांबेने इतिहास रचला. प्रवीण तांबेची राजस्थान रॉयल्सने (rajsthan royals) २०१३ साली निवड केली होती. श्रेयस तळपदे (shreyash Talpade) यांनी कौन प्रवीण तांबे या OTT platform वर रिलीज झालेल्या चित्रपटात प्रवीण तांबे यांची भूमिका साकारली होती. तेव्हापासून तांबे हे नाव चर्चेत आले.

हे देखील वाचाSecond Hand Bike: 2019 मधील hero spender Plus मिळतेय २० हजारांत; जाणून घ्या सर्व डिटेल्स..

Chanakya Niti: या चार गोष्टींमुळे आयुष्यातून निघून जाते लक्ष्मी; प्रचंड मेहनत करूनही मिळत नाही यश..

Malaika Arora: अर्जुन त्याच्यासारखा नाही मर्द आहे, म्हणून मी मलायका अरोराचं खळबळ जनक विधान..

shoaib malik ayesha omar marriage: सानिया सोबतच्या घटस्फोटानंतर शोएब मलिक या तारखेला आयशा उमरशी करणार लग्न; आयशाने केले स्पष्ट..

Salman Khan: अभिनेता सलमान खानला सापानं केला दंश; सध्या सलमानची प्रकृती..

Electric Scooter: मोबाईलच्या किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; दहा रुपयांत धावणार दीडशे किलोमीटर..

rhea chakraborty relationship: रिया चक्रवर्तीच्या गळाला लागला विराट कोहलीचा जिवलग मित्र; त्याचाही होणार सुशांत सिंह..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.