Salman Khan: अभिनेता सलमान खानला सापानं केला दंश; सध्या सलमानची प्रकृती..

0

सुपरस्टार सलमान खानला (Salman Khan) सापानं दंश केला आहे. त्याच्या पनवेल येथील फार्महाऊस मध्ये ही धक्कादायक घटना आहे. त्यानंतर रात्री 3.30 वाजता सलमानला दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. MGM हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. ख्रिसमस आणि वाढदिवसानिमित्त तो काल पनवेल येथील फार्म हाऊसवर गेला होता. त्याच्या सोबत त्याचे मित्र व कुटुंबीय देखील हजर होते.

 

आज मध्यरात्री सलमान बाहेर पडल्यानंतर हा प्रकार घडला आहे. सापाने दंश करताच सलमानला (Salman Khan) त्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. 27 डिसेंबरला सलमान खानचा वाढदिवस असतो. तो नुकताच आयुष्याच्या 57 व्या वर्षांत पदार्पण करणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलमान खान यावेळी कुठलाही गाजावजा न करता आपला वाढदिवस साजरा करणार आहे.

 

त्यासाठीच तो आपल्या कुटुंबियांना घेऊन पनवेल येथील फार्म हाऊसवर गेला होता. ख्रिसमसचे देखील काल त्याने सेलिब्रेशन त्याने केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार यावेळी सलमानच्या (Salaman) वाढदिवसानिमित्त एक छोटीशी पार्टी होणार होती. मात्र दुर्दैवाने हा प्रकार घडला. त्याला दंश केलेला साप हा बिनविषारी होता. त्यामुळे त्याला आज हॉस्पिटल प्रशासनाने त्याला डिस्चार्ज दिला आहे.

 

27 डिसेंबर 2021 सलमान 56 वर्षांचा होत आहे. उद्या त्याचा वाढदिवस पनवेल येथील फार्महाऊसवर साजरा केला जाणार आहे. मात्र या कार्यक्रमाला ठराविक लोक उपस्थित राहणार आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि काही खास मित्र या कार्यक्रमाला सहभागी होणार आहेत. तो खूप लोकांना त्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आमंत्रित करणार नाही.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.