Viral video: सिंहाच्या जबड्यातून लेकराला सोडवण्यासाठी म्हशीला द्यावा लागला जीव; लेकरू तर वाचलं पण..
Viral video: आईचे (mother) लेकरावर (son) किती प्रेम (love) असतं हे शब्दात सांगता येणे अशक्य आहे. मग ती आई कोणाचीही असो, अगदी प्राण्यांची आई असेल, तरी देखील आपल्या लेकरांवर ती जीवापाड प्रेम करते. वेळप्रसंगी लेकराचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीव देखील देताना आपण अनेकदा पाहतो. असाच एक व्हिडिओ (video) सध्या सोशल मीडियावर (social media) तुफान वायरल (Viral) झाला आहे. सिंहाच्या (lion) जबड्यातून आपल्या लेकराला वाचवण्यासाठी म्हशीने सिंहासोबत केलेली झुंज ( buffalo lion fight) पाहताना अनेकांच्या काळजाचा ठोका चुकताना पाहायला मिळत आहे.
सोशल मीडिया हे व्हायरल व्हिडिओचे (social media Viral video) व्यासपीठ आहे. सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ तुफान व्हायरल होत असल्याचं आपण पाहतो. खास करून प्राण्यांचे व्हिडिओ चांगलेच व्हायरल होतात. साहजिकच प्राण्यांच्या लाईफस्टाईल विषयी अनेकांना जाणूण घेण्याची उत्सुकता असते. सिंह हा किती हिंस्र प्राणी आहे, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. मोठ-मोठे प्राणी सिंहाच्या वाटेलाही जाण्याचं धाडस करत नाहीत. चुकून आपल्या वाटेत सिंह आला तरी देखील अनेक प्राणी आपली वाट बदलतात. परंतु वेळ जेव्हा आपल्या लेकरावर येते, तेव्हा मात्र आपल्या जीवाची परवा न करता आई कोणाशीही दोन हात करते. मग सिंह असो की आणखी कोणी.
आईचे लेकरावर किती प्रेम असतं याचं दर्शन देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जीवाची परवा न करता वेळ प्रसंगी आई लेकरासाठी आपला जीव देखील देताना मागेपुढे पाहत नाही. याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. सिंहासोबत सामना करणं शक्य नाही. हे माहीत असून देखील आपल्या लेकराला वाचवण्यासाठी म्हशीने दोन हात केल्याचं सोशल मीडियावर व्हायरस झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. आपल्या लेकरावर सिंहाने हल्ला केला आहे, हे लक्षात येताच वाऱ्याचा वेग धारण करत म्हशीने सिंहाशी दोन हात केले.
काय घडलं नेमकं?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत म्हशीचं रेडकू शांत चरत असल्याचे पाहायला मिळत आहे. म्हैस देखील रेडकाच्या काही अंतरावरच चरताना पाहायला मिळत आहे. मात्र या दोघांनाही पुढच्या काही सेकंदात आपल्याला हे जग सोडून जाऊ लागणार आहे, याची कल्पना देखील नाही. माय लेकरं दोघेही शांत गवत खात असताना अचानक एका सिंहाने म्हशीच्या पिल्लावर हल्ला केला. मात्र आपल्या लेकरापासून काही अंतरावर चरत असणाऱ्या म्हशीने लगेच आपल्या लेकराला वाचवण्यासाठी धाव घेतली. सिंहाने रेडकाला आपल्या जबड्यात पकडलं इतक्यात म्हशीने आपल्या शिंगाने सिंहाला उचलून फेकून दिलं.
रेडकावर हल्ला करायला गेलेल्या सिंहाला म्हशीने जोरदार धडक दिल्याने सिंहाच्या जबड्यामधून रेडकू सुटले खरे, परतू सिंहाने रेडकू सोडून म्हशीलाच आपली शिकार बनवल्याचं या व्हिडिओत पहिला मिळत आहे. म्हशीने सिंहाला जोरदार धडक दिल्यानंतर, म्हशीचे पिल्लू सिंहाच्या तावडीतून सही सलामत सुटल्याचं या व्हिडिओ दिसत आहे. मात्र सिंह रेडकू सोडून म्हशीची शिकार करण्याकडे वळले. आपल्या पिल्लाला वाचवण्यात म्हशीला यश आलं. लेकराला वाचवण्यासाठी म्हशीने सिंहासोबत दोन हात केले. यात तीला यश देखील आलं, मात्र सिंहाने म्हशीवर हल्ला केल्यानंतर, मात्र ती सिंहाचा फार काळ प्रतिकार करू शकली नाही.
काय म्हणाले नेटकरी?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या हृदयस्पर्शी व्हिडिओ खाली अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हृदयस्पर्शी व्हिडिओ शेअर करताना एका युजर्सने म्हटले, या जगात आईसारखे कोणीही प्रेम करू शकत नाही. लेकरासाठी आपला जीव या जगात फक्त आईच देऊ शकते. दुसाऱ्या एका युजर्सने म्हटले आहे, एखाद्याने तुम्हाला आई लेकरावर किती प्रेम करते? हा प्रश्न विचारला, तर हा व्हिडिओ दाखवा. आणखी एका युजर्सने म्हंटले आहे, आई कधीच स्वतःसाठी जगत नाही, आई नेहमी आपल्या लेकरासाठी जगते. यापूर्वी हे मी ऐकून होतो, आज प्रत्येक्षात पाहायला देखील मिळाले.
हे देखील वाचा Diwali Package: रेशनकार्ड धारकांची दिवाळी राज्य सरकारकडून साजरी; साखर, डाळ, तेलासह या वस्तू मिळणार केवळ शंभर रुपयांत..
INDvSA: बॅटिंग करत असताना के एल राहुलच्या पायातच निघाला साप; पुढे काय झालं पाहा व्हिडिओ..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम