Correct process of cooking rise: भात शिजवण्याची ही आहे योग्य पद्धत; या चुकीच्या पद्धतीने भात शिजवत असाल तर होतोय कॅन्सर आणि हार्ट अटॅक..
Correct process of cooking rise: भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भात (rice) खाल्ला जातो. सर्वसामान्य कुटुंबात देखील दररोजच्या जेवणात भात हा असतोच असतो. दक्षिण भारतामध्ये (South Indian) तर भाताला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, भात हा पदार्थ खूप आवडीने खाल्ला जातो. मात्र अनेकांना भात शिजवण्याची योग्य पद्धत माहिती नसल्याचे सर्व्हेतून समोर आलं आहे. एवढंच नाही तर भाग योग्य पद्धतीने शिजवला नसेल, तर हार्ट अटॅक आणि कॅन्सर (heart attack and cancer) होण्याची दाट शक्यता देखील असल्याची माहिती समोर आली आहे. जर तुम्हाला देखील भात शिजवण्याची योग्य पद्धत माहिती नसेल, तर, ही बातमी तुमच्यासाठी खूप म्हत्वाची आहे. (The right way to cook rice)
रोजच्या जेवणामध्ये जर भात नसेल, तर अनेकांचे जेवण पूर्ण होत नसल्याचं अनेक जण सांगतात. साहजिकच यामुळे सर्वसामान्य कुटुंबापासून ते अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील नियमित भाताचे सेवन करतात. भारतातील गरीब जनतेला देखील स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून केंद्र सरकार तांदळाचा पुरवठा करतं. सहाजिकच यामुळे गरीब ते श्रीमंत, छोटा ते मोठा प्रत्येकाच्या आहारात भात असतोच असतो. मात्र भात शिजवण्याची पद्धत अनेकांना माहिती नसल्याचं समोर आल्यानंतर, आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. भात शिजवण्याची योग्य पद्धत समोर आल्यानंतर, अनेकांना आश्चर्याचा धक्का देखील बसला आहे.
भात शिजवण्याची पद्धतीचा सर्वे करण्यात आला. ज्यामध्ये काही धक्कादायक माहिती देखील समोर आली. चुकीच्या पद्धतीने भात शिजवल्यामुळे कॅन्सर त्याचबरोबर हार्ट अटॅक यासारखे गंभीर आजार देखील होत असल्याचे समोर आले आहे. भात शिजवण्याच्या एकूण तीन पद्धतीचा अभ्यास करण्यात आला. या तीन पद्धती मधून भात शिजवण्याची योग्य पद्धत कोणती आहे हे देखील प्रसारित करण्यात आलं. यासंदर्भात अनेक माध्यमांनी सविस्तर अहवाल जाहीर केला आहे. भात शिजवण्याच्या तीन पद्धतींमध्ये कोणती योग्य पद्धत आहे, याविषयी आपण देखील जाणून घेऊ सविस्तर. (Improper cooking of rice leads to cancer and heart attack)
भात शिजवण्याची पहिली पद्धत
भात शिजवण्याच्या तीन पद्धतीचा अभ्यास करण्यात आला, यामधील पहिल्या पद्धतीविषयी जाणून घेऊ. पहिल्या पद्धतीमध्ये दोन तृतीयांश पाण्यात तांदळाचा एक भाग शिजवला गेला. क्वीन्स युनिव्हर्सिटी बेलफास्ट (Queens University Belfast) या संस्थेच्या माध्यमातून तांदूळ शिजवण्याची योग्य पद्धतीचा सर्वे करण्यात आला. पहिल्या पद्धतीने शिजवलेल्या भातामध्ये असणाऱ्या आणि आरोग्यासाठी हानिकारक मानल्या जाणाऱ्या आर्सेनिकचे प्रमाण 50 टक्क्यांनी कमी झाल्याचे सर्वेतून समोर आलं. उर्वरित दोन पद्धतींचा अभ्यास केल्यानंतर, पहिल्या पद्धतीने शिजवलेला भाग हा आरोग्यासाठी खूप हानिकारक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. भात शिजवण्याच्या दुसऱ्या पद्धतीचा अभ्यास करण्यात आला. आपण त्याविषयी देखील जाणून घेऊ.
भात शिजवण्याची दुसरी पद्धत
क्वीन्स युनिव्हर्सिटी बेलफास्ट या संस्थेनी भात शिजवण्याच्या योग्य पद्धतीचा अभ्यास करताना, दुसऱ्या पद्धतीमध्ये एकूण पाच भाग पाणी आणि एक भाग तांदूळ याप्रमाणे भात शिजवला. यामध्ये पहिल्या पद्धतीच्या तुलनेत दुसऱ्या पद्धतीमध्ये आरोग्यासाठी हानिकारक असणाऱ्या आर्सेनिक या घटकाचे प्रमाण पहिल्या पद्धतीपेक्षा कमी झाल्याचे पहायला मिळाले. मात्र तरी देखील भात शिजवण्याची दुसरी पद्धत योग्य नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. आता आपण भात शिजवण्याची योग्य आणि तिसरी पद्धत काय आहे? हे देखील सविस्तर जाणून घेऊ.
भात शिजवण्याची तिसरी पद्धत
भात शिजवण्याच्या पहिल्या पद्धतीपेक्षा दुसरी पद्धत ही थोडीशी योग्य असल्याचं निष्कर्षांत म्हटलं गेलं. मात्र दुसरी पद्धत देखील योग्य नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. भात शिजवण्याची तिसरी पद्धत ही योग्य असल्याचं या संस्थेच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलं. आपण भात शिजवण्याची तिसरी म्हणजेच, योग्य पद्धत नक्की काय होती? याविषयी जाणून घेऊ. तर सर्वप्रथम पाण्यामध्ये तीन ते चार तास तांदूळ भिजत ठेवला गेला. तीन चार तास पाण्यामध्ये भिजवलेला तांदूळ नंतर शिजवला गेला. आणि नंतर शिजवलेल्या तांदळामध्ये वरील दोन पद्धतीत शिजवलेल्या तांदळापेक्षा तब्बल 80 टक्क्यांनी आरोग्यासाठी हानिकारक असणाऱ्या आर्सेनिक घटकाचे (arsenic toxin) प्रमाण कमी झाल्याचे पहायला मिळाले.
भातामुळे कॅन्सर आणि हार्ट-अटॅक येण्याचे नक्की कारण काय?
पिकं लवकर यावी, त्यासाठी शेतकऱ्यांकडून पिकांवर खूप मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा मारा केला जातो. सतत पडणारा अवकाळी पाऊस आणि वातावरणात होणाऱ्या सतत बदल्यामुळे पिकांचे देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा मारा करताना पाहायला मिळते. दीड दोन दशकांपूर्वी रासायनिक खतांचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात होत नसायचा. अनेक जण सेंद्रिय पद्धतीने शेती करत असल्याने शेतातून मिळणारी पाकं देखील खाण्यायोग्य असल्याचे पाहायला मिळायचं.
मात्र अलीकडच्या काळात सेंद्रिय खतांच्या होणाऱ्या अतिरिक्त वापरामुळे पिकं दूषित होतात. याचा सगळ्यात जास्त परिणाम भाताच्या शेतीवर होतो. रासायनिक औषध, खतांच्या अतिरिक्त वापरामुळे भातामध्ये टॉक्सिन्स वाढले जाते. टॉक्सिन्स वाढल्यामुळे तांदळामध्ये आर्सेनिक नावाचे घटक मोठ्या प्रमाणात वाढते. जे आरोग्यासाठी खूप अपायकारक आहे. साहजिकच या संदर्भातला अभ्यास केल्यानंतर, कॅन्सर आणि हार्ट अटॅक येत असल्याची माहिती समोर आली.
हे देखील वाचाRight Age to Get Pregnant: आई होण्याचे योग्य वय जाणून तुम्हाला देखील बसेल धक्का..
Viral video: जखमी कुत्र्याने दोन सिंहांना दाखवले अस्मान; विश्वास नाही बसत पाहा व्हिडिओ..
Extra Marital Affairs: या सहा कारणांमुळे महिला ठेवतात विवाहबाह्य संबंध; चौथं कारण आहे खूपच भयंकर..
SBI Recruitment 2022: या पदवीधरांसाठी SBI मध्ये निघाली मेगाभरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम