Ration card: कोणत्या महिन्यात काय दराने किती रेशन तुम्ही घेऊन गेला आहात? जाणून घ्या सविस्तर माहिती सोप्या भाषेत..
Ration card: देशातील गरीब जनतेला स्वस्त धान्य मिळवून देण्याच्या उद्देशाने सरकारने प्रत्येक गावात स्वस्त धान्य दुकानाची निर्मिती केली. रेशन कार्ड च्या माध्यमातून गरीब जनतेला या दुकानातून आपल्या हक्काचा माल खरेदी करता यावा, याची तरतूद करण्यात आली. एकीकडे सरकारकडून सर्वसामान्यांना सर्वतोपरी मदत प्रयत्न केला जात असला, तरी दुसरीकडे मात्र सर्वसामान्यांची स्वस्त धान्य दुकान परवाना धारक मोठ्या प्रमाणात लूटमार करत करत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. आणि शासनाने बायोमेट्रिक ही प्रणाली सुरू केली. मात्र तरी देखील सर्वसामान्यांची लूट सुरूच असल्याचे पाहायला मिळते.
तुम्हाला देखील रेशन दुकानदार नियमानुसार धान्य देत नसेल याविषयी काही शंका असल्यास तुम्ही आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवर दर महिन्याला मिळालेला माल सहज तपासू शकता. आज आपण याच विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ऑनलाइनच्या या जमान्यात तुम्हाला देखील स्मार्ट होणं फार आवश्यक आहे. अजूनही तुम्हाला दर महिन्याला किती माल कोणत्या दराने मिळतो. हे माहीत नसेल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे.
दर महिन्याला मिळणारा माल तुम्हाला किती आणि कोणत्या दरात मिळायला हवा, हे तुम्ही आता ऑनलाईन सहज तपासू शकता. याशिवाय तुमच्या रेशन कार्डची ईत्थंभूत माहीती तुम्ही ऑनलाईन मिळवू शकता. तर चला जाणून घेऊया सविस्तर.
ऑनलाईन कसे बघायचे रेकॉर्ड
रेशन कार्ड ऑनलाईन बघण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला क्रोमवर जावं लागेल. क्रोमवर गेल्यानंतर , तुम्हाला mahafood.gov.in असे सर्च करायचं आहे. यानंतर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची अधिकृत वेबसाईट तुमच्यासमोर उघडेल. वेबसाईट स्क्रीनवर येताच उजव्या बाजूला ऑनलाईन सेवा हा पर्याय तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्या बरोबर खाली ऑनलाईन रास्तभाव दुकान या पर्यायावर तुम्हाला जायचे आहे.
यानंतर AePDS सर्व जिल्हे असा पर्याय तुम्हाला दिसेल. त्यावर क्लिक करताच AePDS नावाच एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. नव्याने उघडलेल्या या पेजवर रिपोर्ट या पर्यायाखाली ‘RC Details’ वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर लगेच ‘RC Details’ चे पेज तुमच्या स्क्रीनवर ओपन होईल. इतपर्यंत वेवस्थीत प्रोसेस झाल्यानंत तुम्हाला महिना, वर्ष त्याचबरोबर १२ अंकी रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे. ज्याला SRC सुद्धा म्हंटले जाते. हा नंबर टाकून तुम्हाला सबमिट या पर्यायावर क्लिक करायचं आहे. यानंतर लगेच रेशन कार्ड तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
स्क्रीनवरील रेशन कार्डमध्ये काय असतं?
तुमच्या स्क्रीनवर दिसणार्या रेशन कार्डमध्ये तुम्हाला सुरुवातीलाच कुटूंब सदस्याची माहिती बघायला मिळेल. त्यानंतर जिल्हा, तालुका आणि सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशन कार्ड धारकांना धान्य वितरित करण्यासाठी परवाना मिळालेल्या दुकानाचा नंबर पाहायला मिळेल. ज्याला FPS (Fair Prize Shop) असे देखील म्हणतात.
यानंतर कोण-कोणत्या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ मिळतो आहे, म्हणजेच धान्य मिळते आहे, याची माहिती असते. जसे की, दारिद्रय रेषेखालील गट, प्राधान्य गट, अंत्योदय गट असं वर्गीकरण केलेलं पाहायला मिळेल. तसेच कुटुंब रेशन कार्डअंतर्गत किती धान्य घेण्यास पात्र आहे? याची सुद्धा माहिती दिलेली असते. Entitlement for RC या रकान्यात तुम्ही ही माहिती पाहू शकता.
धान्याचे दर कसे बघायचे?
कुटुंब ज्या प्रवर्गात मोडतात, त्या प्रवर्गा अंतर्गत रेशन कार्डचे वितरण केले जाते. जसे की पिवळे कार्ड, केशरी कार्ड या कार्ड नुसारच धान्याचे दर ठरत असतात. यासाठी तुम्हाला क्रोमवर जाउन mahaepos.gov.in असं सर्च करावं लागेल. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर ओपन झालेल्या पेजवर उजवीकडे पॉलिसी आणि प्राईज या पर्यायावर क्लिक करावं लागेल. यानंतर तुमच्याकडे जे कोणतं कार्ड असेल त्यानुसार तुम्हाला किती धान्य काय दराने मिळेल याची सविस्तर माहिती पाहायला मिळेल.
हे देखील वाचा Smartphone Earning: घरबसल्या मोबाइलवरून कमवा दररोज एक हजार रुपये; विश्वास नाही बसत? जाणून घ्या सर्व डिटेल्स..
Women Sex Life: सेक्समुळे महिलांचे वजन वाढते? जाणून घ्या लग्नानंतर वजन वाढण्याची कारणे..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम