Book reading benefits: पुस्तकांचे वाचन केल्यास थेट मेंदूवर होतो हा परिणाम; जाणून तुम्हालाही बसेल धक्का..
Book reading benefits: पुस्तक (Book) वाचण्याचे पुष्कळ फायदे आहेत. आपण लहान असतांना आई-वडिल, (father and mother) शिक्षक (teacher) किंवा घरातले ईतर मोठे सदस्य आपल्याला कायम अभ्यासा व्यतिरिक्त सुद्धा पुस्तके वाचायला सांगायचे. पुस्तक वाचल्याने आपल्या ज्ञानात वाढ होते, हा एक पुस्तक वाचण्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे. पण तुम्हाला माहितीये का? पुस्तक वाचल्याने थेट तुमच्या मेंदुवर परिणाम होतो. होय तुम्ही बरोबरच वाचले आहे. वाचाल तर वाचाल. शिकेल तो टिकेल. हे वाक्य तुम्ही अनेक ठिकाणी ऐकलं असेल. खास करून खेडेगावात जे विजेचे पोल उभा केले जायचे, त्यावर हे वाक्य हमखास तुम्ही वाचलं असेल. पूर्वी शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी शिक्षण विभागाकडून अशा योजना राबविण्यात आल्या होत्या. (Reading a book increases depth)
आपल्या मित्र परिवारात किंवा नातेवाईकांमध्ये कोणीतरी एखादं असतं, ज्याला ज्याला वाचनाचा छंद असतो. अनेकांना पुस्तके वाचण्याचा छंद असतो. पुस्तके वाचल्याने विविध गोष्टींचा अर्थ नव्याने कळायला लागतो. माणुस शांत होत जातो. स्वभावातली नम्रता, प्रगल्भता वाढत जाते. अनेकदा पुस्तके तुमच्यासाठी मार्गदर्शक सुद्धा ठरतात. त्यामुळे अनेकांनी तर माणसांऐवजी पुस्तकांनाच आपले मित्र केले आहे. अशाप्रकारे पुस्तके वाचण्याचे एक ना अनेक फायदे आहेत, जे आपल्याला कुठलाही वाचक अगदी सहजतेने सांगू शकेल. पण पुस्तके वाचल्याने मेंदूवर काय परिणाम होतो? याबद्दल सांगितलेले तुम्ही कोणाकडूनही ऐकले नसेल. मात्र आज आपण पुस्तक वाचल्याने मेंदूवर काय परिणाम होता याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
कल्पनाशक्ती वाढते
पुस्तके वाचतांना अनेक गोष्टींचा अर्थ तुम्हाला नव्याने कळत जातो. बरीचशी माहिती नव्याने मिळत जाते. माहितीचा संचय वाढतो. अनेकदा काही वाचक आपले अनुभव शेअर करतांना सांगतात, वाचतांना त्यांना चित्रपट बघत असल्यासारखे जाणवते. कारण आपण वाचत असतांना, वाचनातील पात्रं थेट मेंदुशी कनेक्ट होतात. त्यामुळे आपला मेंदू आपल्याला ती पात्रे जिवंत असल्याची कल्पना करुन दाखवतो. वाचनामुळे कल्पनाशक्तीत प्रचंड वाढ होते. एखाद्या लेखकासाठी हे फार फायदेशीर ठरु शकते.
मेंदूतील व्हाईट मॅटर वाढते
मेंदू संबंधीत करण्यात आलेल्या काही संशोधनांच्या मते वाचन मेंदूसाठी फार फायदेशीर आहे. वाचन मेंदूचा व्यायाम घडवून आणतो. मेंदू मधील सकारात्मक विचार वाढीस लागतात. वाचनाने मेंदू रिवायवर फिल करतो. त्यामुळे मेंदूच्या पेशींमधील संवाद सुद्धा सुधारतो. परिणामी मेंदूमधील व्हाईट मॅटर वाढू लागते. जे मेंदुच्या निरोगी आयुष्यासाठी फार महत्वाचे असते. जर तुम्हाला देखील मेंदूचे निरोगी आरोग्य हवे असेल, आणि मेंदुला ला चालना द्यायची असेल, तर तुम्ही नियमित काही ना काही एक ते दोन तास वाचन करणे आवश्यक आहे.
ब्रेन कनेक्टिव्हिटी वाढते
काही यशस्वी लोकं नेहमी सांगतात की, अमके-ढमके पुस्तक वाचल्याने माझे संपूर्ण आयुष्यच बदलले. अभ्यासकांच्या मते असे फार क्वचितच होते. मात्र एखादी कादंबरी तुमचे आयुष्य बदलवण्यास कारणीभूत ठरु शकते. कारण कादंबरीचा प्रभाव मेंदुवर दीर्घकाळ राहतो. त्यामुळे वाचन झाल्यानंतर, सुद्धा तुम्हाला कादंबरी कनेक्ट करुन ठेवते. वाचन झाल्यानंतर सुद्धा कादंबरीतील पात्र तुम्हाला जाणवत राहतात. त्यामुळे दीर्घ वाचनाने कनेक्टिव्हिटी वाढीस लागते. ब्रेन कनेक्टिव्हिटी एकाग्रतेसाठी फायदेशीर आहे.
एकाग्रता वाढते
वाचन मेंदूला व्यायाम घडवते. त्यामुळे मेंदूच्या पेशींना ऊर्जा मिळते. परिणामी माणसाची स्मरणशक्ती वाढू लागते. तसेच वाचन मेंदूला क्रमाने विचार करायला मदत करते. त्यामुळे एकाच ठिकाणी जास्त वेळ लक्ष ठेवण्यात मदत होते. यासोबत एकाच गोष्टीवर किंवा एका ठिकाणीच लक्ष केंद्रित होण्यास मदत होते. परिणामी तुमची एकाग्रता वाढू लागते. आजच्या काळात चलबिचल मन फार नुकसानदायी ठरु शकते. याऊलट एकाग्रता माणसाला शांत आणि संयमी बनवते. त्यामूळे एकाग्रतेचा तुमच्या जिवनात पुष्कळ फायदा होऊ शकतो.
विश्लेषणात्कता वाढते
वाचनाने तुमच्या माहितीत भर होत जाते. अनेक गोष्टींची नव्याने माहिती मिळते. त्यामुळे एखाद्या विषयावर बोलतांना सामान्य व्यक्ती पेक्षा वाचन करणारी व्यक्ती अधिक विश्लेषणात्मक आणि तर्कशुद्ध बोलु शकते. माहितीचा संचय वाढल्याने विश्लेषण करणे सोपे जाते. याशिवाय जर तुम्ही थ्रिलर पुस्तके वाचत असाल, तर तुमची विश्लेषणात्मकता जोराने वाढू लागते. कारण थ्रिलर आणि रहस्यमय पुस्तके वाचल्याने तुमचा मेंदू सुद्धा तशाच गोष्टी फ्रेम करु लागतो.
त्यामुळे तुमचा विश्लेषणात्मक तर्क अधिक वाढत जातो. एखाद्या विषयाचे प्रेझेंटेंशन करायचे असल्यास किंवा कुणाला समजावून सांगायचे असल्यास, हे तुम्हाला फायदेशीर ठरु शकते. तसेच विद्यार्थी जिवनात वाद-विवाद स्पर्धांमध्ये तर विश्लेषणात्मक तर्क हा गुण तुम्हाला बक्षिस सुद्धा मिळवून देऊ शकतो.
हे देखील वाचा Chanakya Niti: या तीन गोष्टी तरुणांच आयुष्य करतात उध्वस्त; जाणून घ्या कोणत्या आहेत त्या गोष्टी, आणि राहा दोन हात लांबच..
Yoga Asanas For Married Couple: वैवाहिक जिवनातला आनंद द्विगुणित करतात ही योगासने..
Marriage Tips: या ६ पदार्थांचा आहारात करा समाविष्ट; लैंगिक क्षमता वाढून मिळेल भरपूर आनंद..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम