Alcohol drink: दारू सोडण्याचा विचार करताय? सावधान! अचानक दारू पिणं बंद केल्यास आरोग्यावर होतात हे गंभीर परिणाम..
Alcohol drink: अलीकडच्या काळात तरुणाई देखील मोठ्या प्रमाणात दारूच्या (Alcohol) आहारी गेल्याचे पाहायला मिळते. दारू हे आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र तरी देखील दारूचे सेवन मोठ्या प्रमाणात केलं जातं. दारू पिण्याची अनेकांची वेगवेगळी पद्धत आहे. दिवसभर दारू पिणाऱ्यांची संख्या देखील आपल्या आसपास असल्याचं पाहायला मिळतं. मात्र आपले शरीर हे एका तासात केवळ एक पेक आणि दिवसांतून तीन पेक दारू पचवू शकतं. हे देखील तुम्ही लक्षात घेणे आवश्यक आहे.
सुरुवातीला गंमत म्हणून, अनेक जण दारू पितात. मात्र हीच गंमत नंतर लाईफस्टाईलचा एक भाग देखील बनते. आणि मग खूप प्रयत्न करून देखील दारू सुटता सुटत नाही. ग्रामीण भाषेत या सवयींना बेवडा म्हणूनही संबोधले जातं. असो, आज आपण दारू सोडणाऱ्या आपल्या वाचकांसाठी ही खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. जर तुम्ही अचानक दारू सोडण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. अचानक दारू सोडल्याने तुमच्या आरोग्यावर आणि शरीरावर खूप मोठे गंभीर परिणाम होतात. जाणून घेऊया सविस्तर.
दारू अचानक बंद केली तर…
दारूमुळे अनेकांचे आयुष्य उध्वस्त झाल्याचं आपण अनेकदा पाहतो. मात्र आपलं आयुष्य उध्वस्त होत चाललं आहे, हे दारू पिणाऱ्याला लगेच लक्षात येत नाही. दीर्घकाळ दारू पिणाऱ्या व्यक्तीला काही काळानंतर दारूमुळे आपण आयुष्यातून खूप काही गमावलं आहे, याची जाणीव होते. आणि अशी मंडळी अचानक दारू सोडण्याचा निर्णय घेतात. तुम्ही देखील अचानक दारू सोडण्याचा निर्णय घेतला असेल, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे फार आवश्यक आहे. कारण अचानक दारू सोडल्यामुळे शरीराची यंत्रणा बिघडू शकते. दारू सोडण्याच्या प्रक्रियेसंदर्भात डॉक्टर तुम्हाला योग्य सल्ला देतील. आता आपण दारू सोडल्याने नेमके कोणते परिणाम होतात? हे सविस्तर जाणून घेऊ.
डिप्रेशन: जर तुम्ही अचानक दारू सोडण्याचा निर्णय घेतला आणि अचानक दारू सोडली तर तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता. अशी माहिती संशोधनातून समोर आली आहे. थकवा: दारू पिण्याची सवय असेल, आणि अचानक तुम्ही दारू सोडण्याचा निर्णय घेतला तर तुमच्या शरीराला खूप थकवा जाणवतो. कोणतेही काम करण्यासाठी तुम्ही खूप दमलेला दिसता. साहजिकच यामुळे तुम्ही तज्ञांच्या सल्ल्याने दारू सोडण्याचा निर्णय घेणे आवश्यक आहे.
अस्वस्थता चिडचिड: जर तुम्ही अचानक दारू सोडण्याचा निर्णय घेतला, आणि त्या दृष्टीने पाऊले टाकली, तर तुम्हाला खूप अस्वस्थता जाणवते. यासोबतच तुम्ही खूप चिडचिडपणा करायला सुरुवात करता. छोट्या-छोट्या गोष्टीवरून तुमचा संताप व्हायला सुरुवात होते. साहजिकच यामुळे तुमचं कोणत्याही गोष्टींमध्ये लक्ष लागत नसल्याचे देखील समोर आले आहे. जर तुम्ही दीर्घकाळ दारू पीत असाल, आणि अचानक दारू सोडण्याचा निर्णय घेतला, तर या समस्या तुम्हाला जाणवतात.
भावनिक: गेल्या अनेक वर्षांपासून दारू पिण्याची सवय असेल, आणि अचानक जर तुम्ही दारू सोडण्याचा निर्णय घेतला, तर कोणत्याही कारणावरून माणूस भावनिक होत असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. अशा केसमध्ये तुम्ही मोठमोठ्याने रडू देखील लागता, आणि मग तुम्हाला आसपास कोण आहे, याचं भानही राहत नाही. उच्च रक्तदाब: अचानक दारू सोडल्यामुळे रक्तदाबाची देखील समस्या जाणवते.
डोकेदुखी: अचानक दारू सोडल्यामुळे डोकेदुखी सारखी समस्या देखील उद्भवते. अनेक वर्षापासून शरीराला लागलेली सवय अचानक आपल्या शरीराला पचनी पडत नाही. भूक: अनेक वर्षापासून दारू पिण्याची सवय असेल, आणि जर तुम्ही अचानक दारू सोडण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला भूक लागत नसल्याची माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे.
घाम येणं/ झोप: जर तुम्ही अनेक वर्ष दारू पीत असाल, आणि अचानक दारू सोडण्याचा निर्णय घेतला असेल तर तुमच्या शरीराला घाम येतो. शिवाय तुम्हाला झोप देखील व्यवस्थित लागत नाही. अशा अनेक वेगवेगळ्या समस्या तुम्हाला अचानक दारू सोडल्यामुळे जाणवू शकतात. साहजिकच या समस्यांपासून दूर राहायचं असेल, तर तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने दारू सोडण्याचा निर्णय घेणे आवश्यक आहे. दारू सोडल्यानंतर आपलं शरीर पूर्वीसारखं सामान्य स्थितीत यायला किती वेळ लागतो? आपण हे देखील जाणून घेऊ.
दारू सोडल्यानंतर शरीर किती काळाने सामान्य होतं?
अनेक वर्ष दारू पिण्याची सवय असेल, आणि तुम्ही दारू सोडण्याचा निर्णय घेतला असेल, तर तुमचं शरीर पूर्वीसारखं सामान्य स्थितीत यायला काही वेळ लागू शकतो. प्रत्येकाच्या वयानुसार, त्याचबरोबर वजनावर आणि तुम्ही दारूचे किती सेवन करत होता? यावर तुमच्या शरीराची सामान्य स्थिती अवलंबून असणार आहे. उदाहरण देऊन समजून घ्यायचं झाल्यास, जर तुम्ही खूप वर्षापासून भरपूर प्रमाणात दारू पीत असाल, तर तुमचे शरीर दारू सोडल्यानंतर सामान्य व्हायला खूप वेळ लागू शकतो. काहींचे शरीर सामान्य होण्यासाठी काही आठवडे लागतात. तर काहींसाठी पूर्वीसारखं शरीर सामान्य होण्यासाठी काही महिने देखील लागतात.
हे देखील वाचा Relationship Tips धोकेबाज पार्टनरमध्ये असतात ही लक्षणे; आताच जाणून घ्या अन्यथा आयुष्य होईल उद्ध्वस्त..
Marriage Tips: या पाच गोष्टींचे पालन करा, अन्यथा वैवाहिक जीवनाचा होईल सत्यानाश..
SBI Recruitment 2022: भारतीय स्टेट बँकेत तब्बल इतक्या जागांसाठी मेगा भरती; जाणून घ्या सर्व डिटेल्स..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम