Beauty Tips: हे पाच जीवनसत्व वाढवतात चेहऱ्याची चमक; जाणून घ्या कोणत्या पदार्थामधून मिळतात हे जीवनसत्व..
Beauty Tips: इतरांपेक्षा आपला आपला चेहरा उठून दिसावा असं प्रत्येकाला वाटत असतं. चमक आणि सौंदर्य वाढवण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय देखील करतात. मात्र तरी देखील हवा तसा चेहरा दिसत नाही. बाजारात येणाऱ्या अनेक सौंदर्य प्रसाधनांचा वापर केल्याने तर चेहऱ्याची आणखीच वाट लागते. नेहमी वेगवेगळ्या कंपनीचे सौंदर्यप्रसाधनांचा वापर केल्याने ही समस्या उद्भवू शकते त्याचबरोबर बाजारात विकले जाणारे सौंदर्यप्रसाधने आहे पूर्णतः नैसर्गिक नसतात आणि केमिकलचा त्यामध्ये समावेश असल्याने, चेहऱ्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.
चेहऱ्याच्या अनेक समस्या मुळासकट घालवण्यासाठी आणि चेहऱ्यावर नॅचरल चमक आणि सौंदर्य मिळवण्यासाठी तुम्हाला चेहऱ्यासाठी उपयुक्त असणारे जीवनसत्व मिळवणे आवश्यक असतं. चेहऱ्यासाठी कोणकोणते जीवनसत्वे आवश्यक आहेत? ही जीवनसत्व कोणत्या पदार्थातून मिळू शकतात? हे जाणून घेणे फार आवश्यक आहे, तरच तुम्ही चेहऱ्याचे सौंदर्य कमावू शकता. कोणत्याही समस्याचे मूळ जोपर्यंत आपण नष्ट करत नाही, तोपर्यंत समस्या उद्भवत राहते. तसेच चेहऱ्याच्या सौंदर्याच्या बाबतीत देखील आहे. चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी कोणती जीवनसत्वे आवश्यक आहेत, आणि ती कोणत्या पदार्थातून मिळतात? याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊ.
व्हिटॅमिन ए
चेहऱ्याचे सौंदर्य कमवायचे असेल, तर तुम्हाला विटामिन ए या जीवनसत्वचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. आपल्या शरीरात विटामिन ए असेल, तर चेहऱ्यावर निर्माण होणाऱ्या सुरकुत्या, काळे डाग, कोरडेपणा इत्यादी समस्या दूर होतात. आता अनेकांना प्रश्न पडला असेल, विटामिन ए हे जीवनसत्व कोणत्या पदार्थातून मिळते, तर याविषय देखील आम्ही सविस्तर माहिती देत आहोत. चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी उपयुक्त असणारे विटामिन ए हे जीवनसत्व दूध अंडी हिरव्या पालेभाज्या, भोपळा या पदार्थांमधून मिळते. हे पदार्थ आहारामध्ये नियमित खाल्ल्याने विटामिन ए हे जीवनसत्व मिळते. आणि याचा परिणाम थेट आपल्या चेहऱ्यावर होतो.
व्हिटॅमिन बी:
चेहऱ्याचे सौंदर्य फुलवण्यासाठी विटामिन बी जीवनसत्व हे देखील खूप आवश्यक आहे. विटामिन बी जीवनसत्वामुळे शरीरामधील रक्तभिसरण प्रक्रिया व्यवस्थित राहते. आणि चेहऱ्यावर तेज निर्माण होते. व्हिटॅमिन बी हे जीवनसत्व ओटीमिल त्याचबरोबर तांदूळ, अंडी, केळी या पदार्थांममधून मिळते.
व्हिटॅमिन सी:
व्हिटॅमिन सी हे देखील चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. व्हिटॅमिन-सी या जीवनसत्त्वमुळे चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतात. त्याचबरोबर सैल असणाऱ्या त्वचेसाठी देखील हे जीनसत्त्व खूप फायदेशीर ठरते. व्हिटॅमिन-सी हे जीवनसत्व मी मिळवण्यासाठी तुम्हाला काकडी त्याचबरोबर टोमॅटो, लिंबूवर्णीय फळे खाणे आवश्यक आहे
व्हिटॅमिन ई
व्हिटॅमिन- ई या जीवनसत्त्वमुळे चेहऱ्यावरचा ओलावा टिकून राहण्यास मदत होते. याशिवाय सूर्याच्या तीव्र किरणांपासून देखील त्वचेचे संरक्षण होते. हे जीवनसत्व मिळवण्यासाठी तुम्ही रोजच्या आहारात सूर्यफुलाच्या बिया, त्याचबरोबर शेंगदाणे आणि हिरव्या पाल्या भाज्या खाणे आवश्यक आहे. या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन ई हे जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आढळते.
व्हिटॅमिन के
व्हिटॅमिन के या जीवसत्वमुळे चेहऱ्यावर असणाऱ्या काळी वर्तुळे त्याचबरोबर सुरकुत्या पासून देखील बचाव होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. हे जीवनसत्व मिळवण्यासाठी रोजच्या आहारात सोयाबीन, फ्लॉवर, कोबी या भाज्यांचा समावेश करणे आवश्यक आहे.
हे देखील वाचा Vinayak mete: आता मी कसं जगू, मला सरणात उडी मारू द्या…; विनायक मेटेंच्या आईचा हंबरडा पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी..
SSC JE Recruitment 2022: स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत या पदांसाठी निघाली मेगा भरती; असा करा अर्ज..
Asia Cup: चहलच्या पत्नीला श्रेयस अय्यर करतोय डेट; दिनेश कार्तिक मुरली विजयची होणार पुनरावृत्ती..
Relationship tips: या तीन सवयी couple पती-पत्नीचे आयुष्य करतात उध्वस्त..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम