Vinayak mete: आता मी कसं जगू, मला सरणात उडी मारू द्या..,”; विनायक मेटेंच्या आईचा हंबरडा पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी..

Vinayak mete: शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक आणि माजी मंत्री विनायक मेटे यांचे काल बीड वरून मुंबईला जाताना पहाटे कार अपघातात दुःखद निधन झाले. विनायक मेटे यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. विनायक मेटे यांच्या अशा अचानक अपघात निधनामुळे कुटुंबाबरोबरच अनेकांना धक्का बसला आहे. मृत्यूनंतर विनायक मेटेंच्या बीडमधील तुकाई निवासस्थानी विनायक मेटे यांच्या आईला आणण्यात आलं. त्यावेळी गाडीतून उतरताच आईने हंबरडा फोडला. आणि उपस्थित असणाऱ्या सगळ्याच्या डोळ्यातून आश्रु आले.

काल रविवारी बीडवरून मुंबईला जात असताना पहाटे पाचच्या सुमारास भातण बोगद्याजवळ विनायक मेटे यांच्या फोर्ड गाडीला अपघात झाला. आणि यात विनायक मेटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ते मराठा आरक्षणाच्या आयोजित मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी निघाले होते. विनायक मेटे यांच्या मृत्यूनंतर मेटे कुटुंबाने अक्षरशः हंबरडा फोडला. विनायक मेटे यांच्या आईने आपल्या भावना मोकळ्या करताना फोडलेला आक्रोश पाहून उपस्थित असणारे सर्वजण रडू लागले.

आई ती आईच असते, आईसारखे प्रेम या जगात आपल्या लेकरावर कोणीही करू शकणार नाही. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. विनायक मेटे यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या आईने फोडलेला हंबरडा पाहून हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मृत्यू नंतर विनायक मेटे यांच्या आईला मेटेंच्या निवास्थानी आणल्यानंतर, हंबरडा फोडत आई म्हणाली, मला आता जगायचं नाही. आता मी कशी जगू. मला आता सरणात उडी मारू द्या. मला आता अन्न पानी नको, असं म्हणत मेटे यांच्या मातोश्री यांनी मोठमोठ्याने हंबरडा फोडला.

विनायक मेटे यांच्या आईचे आपल्या लेकरावर असणारं प्रेम पाहून उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागली. मला आता अन्न पाणी देऊ नका, मला जगायचं नाही. माझा बाबा काय लोक जमवायचा.. घरी कितीही लोक आली, तरी माझ्या बाबाने कधीच हाडतूड केली नाही. कधीच कुणाला निघून जावा म्हणाला नाही. आता मी जागून काय करू, असं म्हणत मेटेंच्या आईने हंबरडा फोडत आपल्या भावनांची वाट मोकळी केली. विनायक मेटे यांच्या मातोश्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, हा व्हिडिओ पासून अनेकांच्या डोळ्यातून पाणी वाहत आहे.

फक्त आईच नाही, तर विनायक मेटे यांच्या कुटुंबातील नातेवाईक देखील विनायक मेटे यांच्या जाण्याने मोठ मोठ्याने हंबरडा फोडताना पाहायला मिळत आहे. विनायक मेटे हे राजकारणाबरोबरच आपले कुटुंब आणि नातेसंबंध सांभाळण्यास महत्व देत होते. विनायक मेटे यांच्या भावजई वैशाली मेटे यांनीही हंबरडा फोडला. मला कधीही वडिलांच्या प्रेमाची कमतरता भासू दिली नाही. हे माझं सासर आहे, असं मला कधीच वाटलं नाही. असं म्हणत त्यांनीही आपल्या भावना मोकळ्या केल्या. विनायक मेटे यांच्या भाची कल्पना वळेकर यांनी देखील ते माझे मामा होते, मात्र वडिलांसारखा मी त्यांच्याकडे हट्ट करत होते, त्यांनी माझा हट्ट कधीही पूर्ण केला नाही, असं एकदाही झालं नाही. अशा भावना त्यांनी देखील व्यक्त केल्या.

हे देखील वाचा SSC JE Recruitment 2022: स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत या पदांसाठी निघाली मेगा भरती; असा करा अर्ज..

यावर क्लिक करून पाहा व्हिडिओ

Asia Cup: चहलच्या पत्नीला श्रेयस अय्यर करतोय डेट; दिनेश कार्तिक मुरली विजयची होणार पुनरावृत्ती..

MTNL Plan: Airtel, Jio चा उठला बाजार! केवळ २२५ रुपयांमध्ये लाइफटाइम incoming outgoing देतेय ही कंपनी..

Relationship tips: या तीन सवयी couple पती-पत्नीचे आयुष्य करतात उध्वस्त..

Farmer Scheme: या तीन योजना शेतकऱ्यांना करतात लाखोंचे अर्थसहाय्य; जाणून घ्या या योजनांविषयी सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.