Lifestyle: नदीत नाणं का फेकतात? घरात लिंबू मिरची का बांधतात? अंत्यसंस्कार केल्यानंतर आंघोळ का करतात? जाणून घ्या शास्त्रीय कारणे..
Lifestyle: पूर्वीपासून अशा अनेक समजुती चालत आल्या आहेत, ज्या आजही आपण पाळतो. मात्र त्या पाळण्यापाठीमागे काय कारणे आहेत, हे आपण कधीही जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. आपले पूर्वज आणि घरातील मोठी माणसं आपल्याला अशा अनेक गोष्टी करायला सांगतात, ज्याचा काहीही संबंध नसतो. अनेकदा या गोष्टी त्यांना देखील का करायच्या असतात हे माहिती नसतं. मात्र पूर्वीपासून चालत आल्या असल्याने त्या देखील या गोष्टींकडे दुर्लक्ष करत नाहीत. खरं तर काही गोष्टींविषयी आपल्याला माहीत नसून देखील त्याचे पालन करणे म्हणजे, ही एक प्रकारची अंधश्रद्धाच आहे.
मात्र अनेकांना ही अंधश्रद्धा वाटत असली तरी, पूर्वीपासून चालत आलेल्या काही समजुती आणि आपले वडीलधारी मंडळी देखील या समजुतीचे पालन करत करतात याला शास्त्रीय कारणे आहेत. अनेकांना या समजुती आपण का फॉलो करतो आहे, ते माहित नसतं. मात्र या समजुतींना काही शास्त्रीय कारणे देखील असतात. याकडे कोणाचेही लक्ष जात नाही, किंवा शास्त्रीय कारणांविषयी कोणालाही फारसं काही माहिती नसतं. आज आपण अशा काही समजुती पाहणार आहोत, ज्या पूर्वीपासून चालत आल्या आहेत. मात्र या समजूती विषयी कोणालाही फारसं काही माहीत नाही.
दुकानात किंवा घरात लिंबू मिरची का लटकवतात
अनेकांना लिंबू आणि मिरची का लटकवतात याविषयी माहिती आहे. मात्र त्यांना जी माहिती माहित आहे, ती काहीतरी वेगळीच असून, त्यात काही तथ्य नाही. मिरची अडकवण्याचे कारण विचारल्यानंतर, अनेक जण सांगतात, आपल्या घराला किंवा दुकानाला नजर लागू नये, वाईट नजरेपासून आपला बचाव व्हावा, यासाठी लिंबू-मिरची बांधण्यात येते. मात्र या गोष्टींत काहीच तथ्य नसून, यासंदर्भात शास्त्रीय कारण दुसरचं आहे. लिंबामध्ये ‘सायट्रीक ॲसिड’ असतं. हे तुम्हाला माहिती असेल, त्यासोबतच मिरची ही आपल्या गुणांनी तिखट असते. सुगंध कीटक आणि कोळी हे कीटक आपल्या घरात आंबट आणि तिखटामुळे प्रवेश करत नाहीत.
घरात जर कीटकानी प्रवेश केला नाही, तर आपले आरोग्य देखील सुरक्षित राहतं. आणि आपण आजारी पडण्यापासून बचावतो. पूर्वी आपल्या आरोग्याची काळजी खूप मोठ्या प्रमाणात घेतली जायची. आपल्या खाण्यात आणि घरातील स्वच्छतेविषयी लोक खूप जागृक असायची. कारण पूर्वी दवाखान्याचे संख्या खूप कमी असल्याने, अनेक जण आजारी पडणे पसंत करत नव्हते. घरात किंवा दुकानात लिंबू आणि मिरची बांधण्याचे हे एक शास्त्रीय कारण आहे. मात्र पूर्वीपासून चालत आलेली, ही समजूत आजही पाळली जाते. मात्र याचा कोणीही विचार करत नाही.
नदीत नाणी का फेकतात
आपण प्रवास करताना नेहमी पाहतो, आपल्या शेजारी बसलेल्या बाकावरची अनेक मंडळी नदी क्रॉस करून जात असताना, नदीत एक रुपया, दोन रुपयांची नाणी टाकत असतात. आणि पाया पडत असतात. मात्र आपल्याला ते असं का करतात? याविषयी काही माहिती नसतं. फक्त आपल्यालाच नाही, तर नदीत प्रवासादरम्यान जी मंडळी नाणी टाकतात, त्या लोकांना देखील आपण नाणी नदीपात्रात का टाकत आहोत, याविषयी माहिती नसतं. मात्र याला देखील शास्त्रीय कारण आहे. तुम्हाला माहिती असेल पूर्वी तांब्याची नाणी वापरात होती.
अनेकांना हे देखील माहिती असेल, तांब्याचा धातु पाणी शुद्ध करण्याचे काम करतो. यातच नदीपात्रात नाणी टाकण्याचं शास्त्रीय कारण दडलं आहे. पूर्वी पाणी शुद्धीकरण करण्यासाठी कुठल्याही प्रकार तंत्र उपलब्ध नव्हतं आणि म्हणून, अनेक जण प्रवास करताना नदीपात्रात शक्य होईल तेवढी तांब्याचा धातू म्हणजेच पूर्वी तांब्याची नाणी असायची, ती नदी पात्रात टाकली जायची. अर्थातच पाणी शुद्ध करण्यासाठी पूर्वी नदीपात्रात नाणे टाकत असत. ही परंपरा अजूनही चालूच राहिली, मात्र याविषयी शास्त्रीय कारण कोणालाही माहिती नाही.
मांजर आडवी गेली तर..
मांजर आडवे जाणे हा प्रकार जवळपास सर्वांनाच माहिती आहे. आपण प्रवास करत असताना, जर आपल्याला एखादी मांजर आडवी गेली, तर आपल्यासाठी ते अशुभ मानला जातं. मात्र या गोष्टींत काहीही तथ्य नाही. अनेक जण असेही मानतात मांजर आडवं गेल्यानंतर, तिथून पुढचा प्रवास न केलेला बरा. मात्र या सगळ्या अंधश्रद्धा असून, माणूस एकविसाव्या शतकातही या भूल थापांना बळी पडतो आहे, हे मोठे दुर्दैव आहे.
आता आपण या संदर्भात शास्त्रीय कारण काय आहे? हे जाणून घेऊ. जसं की तुम्हाला माहिती आहे, पूर्वी लोक बैलगाडा किंवा घोडा गाडीने प्रवास करायची. कारण इतर वाहनांची सुविधा त्याकाळी नव्हती. सहाजिकच त्यामुळे रस्त्याने जात असताना जर एखादं मांजर आडवं गेलं तर, रात्रीच्या काळोखात मांजराचे डोळे चमकतात आणि मग घोडा किंवा बैल चमकणाऱ्या या डोळ्यांना घाबरतात. आणि म्हणून पूर्वी असं काही घडलं, तर प्रवास करणारी मंडळी थोडा वेळ थांबून नंतर प्रवास करायची. मात्र ही प्रथा अशीच चालू राहिली, आणि याचा अर्थ बदलून लोकं मांजर आडवी गेली म्हणजे, ते अशुभ असतं. असं समजू लागली.
अंत्यसंस्कार केल्यानंतर अंघोळ का करतात?
खेडेगावात अनेक जण अनेकांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. अंत्यसंस्कार झाल्यानंतर, अनेक जण घरी असणारा एखादा सदस्य त्यांच्यासाठी पाणी तापवून स्नानगृहामध्ये नेहून ठेवतो. अंत्यसंस्कार करून आलेली माणसं एकेक करून कोणालाही न शिवता, अंघोळ करतात. हे का करतात? तर आजही याचे कारण सांगताना म्हणतात, अंत्यसंस्कार करून आल्यानंतर, त्याचा आत्मा आसपास भटकत असतो. आणि आपण आंघोळ न करताच घरात गेल्यानंतर तो घरात प्रवेश करेल, अशी मूर्खपणाची धारणा अनेकांची असते. मात्र यात काहीही तथ्य नाही.
अंत्यसंस्कार करून आल्यानंतर, आंघोळ करण्यासंदर्भात देखील एक शास्त्रीय कारण आहे. मृत पावलेल्या शरीरामध्ये अनेक हाणीकारक जिवाणू निर्माण व्हायला सुरुवात होते. जसं की तुम्हाला माहिती आहे मृत्यू पावलेल्या माणसाजवळ आणि घरातील किंवा अनेक पाहुणे-रावळे आसपास बसलेली असतात. जवळचा व्यक्ती सोडून गेल्याने, अनेक जण मृत शरीराजवळ मोठ्याने हंबरडा फोडतात. सहाजिकच त्यामुळे अनेक जिवाणू तयार झालेले असतात. ते अनेकांच्या शरीरावर असतात. अंत्यसंस्काराला मोठी गर्दी होत असते. त्यामुळे एकमेकांच्या संपर्कात अनेक मंडळी येत असतात. आणि म्हणून, घरी जाऊन आपल्या शरीरावर कुठल्याही प्रकारचे जिवाणू राहू नयेत, म्हणून प्रत्येक जण आंघोळ करत असतात.
हे देखील वाचा Digilocker on Whatsapp : ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, आधारकार्ड, आता whatsapp वर करता येणार डाउनलोड; जाणून घ्या प्रोसेस..
Edible Oil: खाद्यतेलाबाबत मोठी बातमी, शासनाने घेतला हामोठा निर्णय; खाद्यतेल महागणार की स्वस्त होणार
Lifestyle: दररोज से x केल्याने काय होतं माहिती आहे? से क्स विषयी जाणून घ्या सविस्तर..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम