Brijbhushan Singh: ब्रिजभूषण सिंह राज ठाकरे यांच्या नाकावर टिच्चून मुंबईत घेणार सभा; राज ठाकरेंचे वजन भाजपनेच केलं कमी..

0

Brijbhushan Singh: ब्रिजभूषण सिंग (Brijbhushan Singh) आणि राज ठाकरे Raj Thackeray) यांचा वाद काही संपता संपेना. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरुद्ध घेतलेल्या भूमीकेमुळे, त्यांना चांगलाच अडचणीचा सामना करावा लागत आहे. राज ठाकरे यांनी आपली राजकीय भूमिका बदलल्यानंतर प्रथमच आयोध्याला जाणार असल्याचं घोषित केलं. आपल्या अयोध्या दौऱ्याची (Ayodhya daura) तारीखही त्यांनी 5 जून ठेवली होती. मात्र या दौऱ्याला भारतीय जनता पार्टीचे (BJP) उत्तर प्रदेशचे Uttar Pradesh) खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरे जोपर्यंत उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत अयोध्येत पाऊल ठेऊ दिले जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. आणि राज ठाकरे यांचा अयोध्या दौराला ग्रहण लागलं.

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला जरी ग्रहण लागलं असलं तरी, ब्रिजभूषण सिंह मात्र मुंबईमध्ये उत्तर भारतीयांसाठी मोठी सभा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. एकीकडे ब्रिजभूषण सिंह यांच्यामुळे राज ठाकरे यांना आपला आयोध्या दौरा स्थगित करावा लागला. मात्र राज ठाकरे यांच्या नाकावर टिच्चून आता खासदार ब्रिजभूषण सिंह मुंबईत सभा घेणार असल्याने राज ठाकरे आणि मनसेचे कार्यकर्ते आता काय भूमिका घेणार, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे.

मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात घेतलेल्या भूमिकेनंतर, राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून कमालीचे चर्चेत आहेत. त्यातच त्यांनी अयोध्या दौरा देखील घोषित केला, मात्र भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या या दौऱ्याला कडाडून विरोध केला. राज ठाकरे यांना जर आयोध्येत यायचं असेल, तर उत्तर भारतीयांची माफी मागावी लागेल. तरच उत्तर प्रदेशच्या धर्तीवर राज ठाकरे यांना पाऊल ठेवू दिलं जाईल. अन्यथा कुठल्याही परिस्थितीत राज ठाकरे यांना अयोध्येत येऊ दिलं जाणार नसल्याची टोकाची भूमिका ब्रिजभूषण सिंह यांनी घेतली. आपल्या दौऱ्याला विरोध होतोय, हे पाहून राज ठाकरे यांनी देखील अयोध्या दौरा स्थगित करण्याची घोषणा केली. आणि चार दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या सभेत आपण हा दौरा का स्थगित करत आहोत? याचे कारणही आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं.

माझा आयोध्या दौऱ्याला जो काही विरोध होतो आहे, हा सगळा ट्रॅप असून, या ट्रॅपमध्ये आपल्याला अडकवण्याचा प्लॅन असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितलं. एवढं सगळं होऊन देखील मी नियोजित वेळेत दौरा करायचं ठरवलंच, तर आपल्या कार्यकर्त्यांना अडचणी येऊ शकतात, आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून जेलमध्ये देखील टाकण्यात येऊ शकतं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून, मी तूर्तास हा दौरा स्थगित करत असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितलं. आता हा ट्रॅप कोणी रचला याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून राज्यात जोरदार रंगली‌ आहे.

खासदार ब्रिजभूषण सिंह हे शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध करत असल्याचं मनसेकडून सांगण्यात येत आहे. खासदार ब्रिजभूषण सिंह शरद पवार (Sharad Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule) यांचे एकत्र फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. या सगळ्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार Rohit Pawar) यांनी मनसेवर जोरदार हल्ला चढवला आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून एक पोस्ट करताना म्हटले आहे, राज ठाकरे राज्यातले मोठे नेते आहेत. मला त्यांचा आदर आहे. मात्र भाजप आपला वापर करून घेतं आहे, तरी मनसेला हे कसं कळत नसेल? खा. बृजभूषण सिंह हे कोणत्या पक्षाचे आहेत, हे तरी मनसेनं पाहायला पाहिजे.

आगामी महापालिका निवडणुकीत बृजभूषण सिंह मुंबईत प्रचाराला आले, तर मनसेने आश्चर्य वाटून घेऊ नये. अनेक वर्ष शरद पवार ‘महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे’चे अध्यक्ष आहेत तर खा. बृजभूषण सिंह हे ‘भारतीय कुस्ती संघा’चे अध्यक्ष आहेत. त्यामुळे मनसेला खेळातही राजकारण दिसत असेल, तर त्यांनी तातडीने आपल्या राजकीय मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यायला हवी. त्यामुळे त्यांचा अपघात टाळून पक्षाचा बचाव तरी करता येइल. असा घणाघात रोहित पवार यांनी मनसेला लगावला आहे. रोहित पवार यांनी केलेल्या टीकेमुळे आता ब्रिजभूषण सिंह मुंबईत येऊन सभा घेणार असल्याची जोरदार चर्चा राज्यात रंगली आहे.

हे देखील वाचा Digilocker on Whatsapp : ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, आधारकार्ड, आता whatsapp वर करता येणार डाउनलोड; जाणून घ्या प्रोसेस..

Edible Oil: खाद्यतेलाबाबत मोठी बातमी, शासनाने घेतला हा मोठा निर्णय; खाद्यतेल महागणार की स्वस्त होणार

Viral Video: जाळीच्या बाहेरून सिंहाची करत होता थट्टा, हात तोंडात सापडताच सिंहाने पाडला तुकडा; व्हिडिओ पाहून उडेल थरकाप..

Ration shop: या कारणामुळे रेशन दुकानात आता गव्हा ऐवजी मिळणार तांदूळ; अन्न पुरवठा विभागाने घेतला निर्णय..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.