Viral video: मगरीने क्षणात हरणाचे तुकडे-तुकडे केले; तुम्हीच पहा काळजाचं पाणी करणारा व्हिडिओ..

0

Viral video: सोशल मीडियावर प्राण्यांसंदर्भातले अनेक भयानक आणि काळजाचं पाणी करणारे, व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून देखील मोठ्या प्रमाणात पसंत केलं जातं असल्याचं पाहायला मिळतं. प्राण्यांची जीवनशैली जाणून घ्यायला प्रत्येकाला आवडत असतं. प्राणी कितीही हिंस्त्र असला तरी, तो नक्की काय करतो? कशी शिकार करतो? काय खातो यासंदर्भात जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतो. अनेक प्राण्यांमध्ये मगर हीदेखील अतिशय हिंस्र प्राणी म्हणून ओळखली जाते. असाच एक मगरीचा हरणाची शिकार करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, व्हिडीओ पाहणार्‍यांच्या काळजाचं पाणी होत असल्याचे पहायला मिळत आहे.

प्रामुख्याने हरणाची शिकार अनेक प्राणी करत असतात. सिंह, वाघ, बिबट्या, असे अनेक प्राणी खास करून हरणाची शिकार करताना आपण अनेक वेळा पाहिलं असेल. धावणे ही हरणाची ताकद असली तरी, एखाद्या प्राण्याच्या जबड्यात हरीन सापडलं, तर ते स्वतःला वाचवू शकत नसल्याचं आपण पाहतो. प्रत्येक प्राणी आपल्या भक्ष्याच्या शोधात असतो. मगर देखील पाण्यामध्येच आपल्या भक्ष्याची वाट पाहत बसलेली असते. नदीच्या किंवा तलावाच्या काठी एखादा प्राणी पाणी पिण्यासाठी आला तर मगर कशा प्रकारे झडप घालते, हे आपण अनेक वेळा पाहिलेही असेल.

मगर नेहमी पाण्यातच आपल्या भक्ष्याचा शोध करताना पाहायला मिळते. प्रत्येक प्राण्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात, हे आपल्या प्रत्येकाला माहित आहे. मगरीची देखील काही वैशिष्ट्ये आहेत. मगर पाण्यात असताना पाणीदेखील हलत नसल्याचं पाहायला मिळतं. पाण्यात आपल्यासमोर मगर असली तरी, आपल्याला कधीही पाण्यात मगर असल्याचं जाणवत नाही. मात्र याचाच फायदा घेत मगर ह ल्ला करते, आणि आपली शिकार करत असल्याचं दिसून येतं. पाणी पिण्यासाठी प्राणी नेहमी तलावाकाठी जात असतात, आणि बरोबर याच संधीचा फायदा घेत मगर आपली शिकार करते.

                     काय घडलं नक्की

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत हरणाचा कळप एका तलावाकाठी पाणी पिण्यासाठी येत असताना पाहायला मिळत आहे. हरणाचा संपूर्ण कळप पाणी पिण्यात व्यस्त असताना अचानक मगर हरणावर हल्ला करताना व्हायरल झालेला व्हिडिओ पाहायला मिळते. मगरीने हल्ला केला, हे पाहून पाणी पिण्यासाठी आलेला हरणाचा कळप पळून जातो. मात्र या मगरीच्या तावडीत एक हरिण सापडतं. हरीण मगरीच्या तोंडून सुटण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळत आहे, मात्र मगरीच्या जबड्यातून हरीण सुटत नसल्याचे दिसून येत आहे.

पाणी पिण्यासाठी आलेल्या हरणाच्या कळपावर मगरीने केलेल्या हल्ल्यात एका हरणाची शिकार होते. मगरीकडून हरणाची शिकार झाल्यानंतर, हरणाला पाण्यात घेऊन जात असताना व्हायरल झालेला व्हिडिओ पाहायला मिळत आहे. हरणाला आतमध्ये घेऊन गेल्यानंतर, बाकीच्या अनेक मगरी हरणावर तुटून पडल्याचे देखील या व्हिडिओत पाहायला मिळत असून, हा व्हिडीओ पाहणाऱ्यांचा थरकाप उडताना देखील दिसून येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ तब्बल अडीच मिनिटाच्या आसपास असून, या व्हिडिओत अनेक मगरीने मिळून हरणाचे तुकडे तुकडे करून खात असल्याचे पाहून मन हेलावून जातं.

                     काय म्हणाले नेटकरी

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करताना हळहळ व्यक्त केल्याचं, पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, अनेकांनी हा व्हिडिओ शेअर देखील केला आहे. एका युजर्सने या व्हिडिओवर कमेंट करताना म्हटले आहे, ही सगळी निसर्गाची साखळी आहे. प्रत्येक जण शिकार करूनच आपला उदरनिर्वाह करत असतो. यात विशेष वाटण्यासारखं काहीही नाही. तर दुसर्‍या एका युजर्सनी म्हटलं आहे, हा व्हिडिओ पाहताना काळजात धस्स होतं. यापूर्वी एवढा भयानक व्हिडिओ मी कधीही पाहिला नव्हता.

हे देखील वाचा Viral video: काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ! अजगर जिवंत हरणाला गिळत असताना घडलं असं काही..

Viral video: डब्यात तोंड अडकलेल्या सापाची झालेली केविलवाणी अवस्था तुम्हालाही पाहवणार नाही; एकदा पहाच व्हिडिओ..

Viral video: झाडावरून नदीत उडी घेत, जग्वारने केली मगरीची शिकार; काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल..

यावर क्लिक करुन पहा व्हिडिओ…

Viral video: केवळ सात वर्षाच्या लेकरानं तब्बल दहा किलोचे दोन मासे कसे पकडले? दोन मिनिटाचा हा व्हिडिओ पाहून बसेल धक्का..

Viral video: गाडा वेगाने पळावा म्हणून म्हशीला मारले फटके, सहन न झाल्याने म्हशीने गडी चेंडू सारखा उडाला हवेत..

Viral video: अंड्यातून सापाची पिल्लं कशी बाहेर येतात, हे तुम्ही कधी पाहिलं आहे का? पहा व्हिडिओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.