Viral video: पाच किलो आट्याचं पीठ मागणारं पोरगं रातोरात स्टार झालं; कहानी आणि व्हिडीओ पहा एका क्लिकवर..

0

Viral video: सोशल मीडियाच्या या जमान्यात कुणाचा व्हिडीओ कधी व्हायरल होईल, आणि तो कधी रातोरात स्टार होईल, हे कोणालाही सांगता येत नाही. टिकटॉक, इंस्टाग्राम (instagram) रिल्समुळे (reals) अनेकजण रातोरात स्टार झाले, आणि असंख्य जणांना रोजगार देखील मिळाला. मात्र देशात असे अनेक लोकं आहेत, जे आजही रस्त्यावर सिग्नलवर भीक मागताना पाहायला मिळतात. यात छोट्या छोट्या लेकरांचा देखील समावेश असतो. यासंदर्भातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, एक छोटाशा बाल मजूर रातोरात स्टार (Star) झाला आहे.

काही माणसं कितीही गरीब असली, कोणतंही काम करत असली, तरी काहींमध्ये एखादा कमालीची एटीट्यूड असतो, जो अनेकांना आकर्षित करून टाकतो. या संदर्भातले अनेक व्हिडीओ देखील आपण सोशल मीडियावर पाहिले असतील. मात्र एक छोटं आठ नऊ वर्षाचं लेकरं भीक मागत असताना त्याने दाखवलेला एटीट्यूड सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजत असून, या व्हिडिओला कोटींमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. रस्त्यावर सिग्नलवर अनेक जण हातामध्ये पेन घेऊन, तो पेन विकताना आपण पाहिलं आहे. पेन विकत असताना ही मंडळी अनेकांना पेन घेण्यासाठी आग्रह, विनवणी करत असतात.

मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून, पेन विकत असणाऱ्या मुलाचा एटीट्यूड पाहून, तुम्ही चक्रावून जाल. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत हा मुलगा,कॅमेऱ्याकडे पाहून लोकांना म्हणत आहे, भैय्या कोणीतरी पाच किलो आटा घेऊन द्या, माझी आई आजारी आहे. मात्र ही दोन वाक्य पूर्ण झाल्यानंतर लगेच मुलगा म्हणतोय, मी असं म्हणणाऱ्यातला मुलगा नाही. तुम्हाला द्यायचं तर द्या, नाहीतर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मात्र हे बोलत असताना त्याच्या एटीट्यूडचं, एक्टिंगचं सोबतच कॉन्फिडन्सचं देखील कौतुक करावं तेवढं कमीच आहे.

नक्की प्रकरण काय

deepak_mahipal_mavi2112 या इंस्टाग्राम आयडीवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या मुलाचं नाव अद्याप काय आहे हे समजू शकले नाही. मात्र मी मीडियात लवकर प्रसिद्ध व्हावं, अशी या मुलाची इच्छा आहे. तशी तो बोलून देखील दाखवतो. मी गरीब असलो तरी, मला गरीब राहायचं नाही. मला श्रीमंत व्हायचं आहे, असे देखील हा छोटा मुलगा एका व्हिडिओत म्हणताना पाहायला मिळत आहे. सोबतच पुष्पा या चित्रपटाचा डायलॉग देखील आपल्या स्टाइलने झळकावत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याने मारलेला डायलॉग अनेकांच्या पसंतीस उतरला असून, या छोट्या मुलाचं कौतुक आता अनेक जण करताना दिसून येत आहेत.

‘तेरी झलक शरपी’ या गाण्यावर हा मुलगा अल्लू अर्जुनची स्टाइल करत डान्स करतो. मी गरीब असलो तरी मला गरीब राहायचं नाही. लवकरच मी मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धीस यावे. अशी इच्छा देखील हा छोटा मुलगा बोलून दाखवतो. अल्लू अर्जुनच्या गाण्यावर डांस केल्यानंतर, कोणीतरी त्याला विचारतो तुझं नाव काय? यावर हा म्हणतो, पुष्पा झूकेना नहीं, या डायलॉग बरोबरच तो आपल्या स्वतःचा डायलॉग देखील अॅड करतो. याच मुलाचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, या व्हिडिओत त्याच्या एक्टिंग कॉन्फिडन्स आणि एटीट्यूड ने सगळ्यांनाच वेड लावलं आहे.

काय म्हणाले नेटकरी

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला तब्बल, ४० लाखाच्या आसपास लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरला असून, यावर अनेकांनी भन्नाट अशा कमेंट्स केल्या आहेत. एक यूजर्सने कमेंट करताना म्हटले आहे, वा क्या बात है! या वयात या मुलाचा असणारा कमालीचा एटीट्यूड एक दिवस याला मोठा स्टार बनवणार यात शंका नाही. तर दुसर्‍या एका यूजर्सने म्हटले आहे, एवढे कमी वय असूनही, या मुलाचा ॲटीट्युड, कॉन्फिडन्स आणि एक्टिंग कमालीची असून, आपण याचे दिवाने झालो आहोत. अशा अनेक मजेशीर आणि भन्नाट कमेंट्स अनेकांनी केल्याचं पाहायला मिळत आहे.

हे देखील वाचा Viral video: अंड्यातून सापाची पिल्लं कशी बाहेर येतात, हे तुम्ही कधी पाहिलं आहे का? पहा व्हिडिओ..

Viral video: गाडा वेगाने पळावा म्हणून म्हशीला मारले फटके, सहन न झाल्याने म्हशीने गडी चेंडू सारखा उडाला हवेत..

Viral video: आपल्या मालकाला मिठी मारत कुत्र्याने फोडला हंबरडा; कारण जाणून तुमच्याही डोळ्यातून येईल पाणी..

Viral video: वादळात भली मोठी कार हवेत कागदासारखी उडाली; सोळा वर्षाचं पोरगं चालवत होतं कार! काय झालं पुढे, पहा तुम्हीch…

Pancard: दोन दिवसांत पॅन कार्ड आधारशी लिंक करा, नाहीतर भरावा लागेल दहा हजार दंड; फक्त एक मेसेज पाठवून करु शकता लिंक...

खत: तुमच्या मोबाईलवर असा चेक करा जवळच्या दुकानात खतांचा किती स्टाॅक शिल्लक आहे, आणि उठवा..दुकानदाराचा बाजार..

Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..

Ration card:केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! हीआहे रेशन कार्ड धारकांसाठी खूशखबर; करा आधार कार्डशी रेशनकार्ड लिंक आणि..

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! घरबसल्या मोबाईलवर असा पहा फेरफार उतारा; अगदी सोप्या भाषेत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.