Kisan credit card: किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी ‘असा’ करा अर्ज; काय आहेत किसान क्रेडिट कार्डचे फायदे? जाणून सविस्तर…

0

Kisan credit card: देशातल्या शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाला मदत म्हणून केंद्र सरकारने केसीसी ही योजना लागू केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाला आर्थिक मदत करणे हा याचा उद्देश असून, शेतकऱ्यांना या योजेअंतर्गत तब्बल तीन लाखांपर्यंत कर्ज दिलं जाणार आहे. विशेष म्हणजे एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. मात्र अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला नसल्याचे दिसून येते. जर अजूनही तुम्ही केसीसी या योजनेचा लाभ घेतला नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. आज आपण पाहणार आहोत या योजनेचा ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज कसा भरायचा, आणि या योजनेचा  लाभ कसा घ्यायचा. सुरवातीला आपण किसान क्रेडिट कार्ड काय आहे ते पाहूया…

                किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

केसीसी म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड. शेतकऱ्यांना आपली शेती करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाला आर्थिक मदत देता यावी, म्हणून या योजनेची निर्मिती केली आहे. या योजनअंतर्गत शेतकऱ्यांना तब्बल तीन लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. शेतीची मशागत, बियाणे, खतं, अशा शेतीच्या कामांसाठी आर्थिक मदत म्हणून, केंद्र सरकार या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देत आहे. यासाठी शेतकऱ्यांना एक लाख रुपये कर्ज बिनव्याजी देखील देत आहे. या योजनेचा लाभ हा कुठलाही शेतकरी घेऊ शकतो. विशेष म्हणजे, इतरांची जमीन भाडेतत्त्वावर कसणारा शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतो. आता आपण या योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे पाहू..

           असा करा  KCC साठी अर्ज..

देशातला जास्तीत जास्त शेतकरी या योजनेचा लाभार्थि व्हायला हवा, या उद्देशाने केंद्र सरकारने फेब्रुवारी 2020 ला पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ घेत असणाऱ्या सगळ्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. आणि याचाच भाग म्हणून, केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या वेबसाईटवरच किसान क्रेडिट कार्डचा अर्ज उपलब्ध केला. त्यामुळे आता शेतकऱ्यांना घरबसल्या आपल्या मोबाईलवर किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कसा अर्ज करायचा? हे आता आपण सविस्तर जाणून घेऊयात…

तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये असणाऱ्या क्रोमवर जाऊन PM Kisan असं सर्च करायचं आहे. असं सर्च केल्यानंतर तुम्हाला पीएम किसानची वेबसाईट ओपन झालेली दिसेल. या वेबसाईच्या उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला Download KCC Form या पर्यायावर क्लिक करायचं आहे. Download KCC Form या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला किसान क्रेडिट कार्डचा अर्ज ओपन झालेला दिसेल.

इथपर्यंतच सगळी प्रोसेस झाल्यानंतर, तुमच्यापुढे “Loan application form for agricultural credit for PM-KISAN beneficiaries” असं एक पेज पाहायला मिळेल. याचाच अर्थ पीएम-किसान योजनेच्या लाभार्थ्यांकरिता कृषी कर्ज घेण्यासाठी अर्ज असं होतो. आता आपण हा फॉर्म कसा भरायचा या विषयी देखील सविस्तर माहिती पाहू अगदी तुमच्या भाषेत..

                          असा भरा फॉर्म

तुमच्या समोर डाऊनलोड झालेल्या ‘फॉर्म’च्या वरती ‘टू ब्रँच’ मॅनेजर असं दिसतंय का? बरोबर त्या खाली बँकेचं नाव आणि शाखेचं नाव तुम्हाला टाकणं आवश्यक आहे.  तुम्हाला अर्जामधील ‘A’ या भागासमोर “फॉर ऑफिस यूझ” लिहिलं आहे. या ठिकाणी तुम्हाला काहीही भरण्याची आवश्यकता नाही. या रकान्यातील माहिती बँकेला भरावी लागणार आहे.

‘A’ या भागाची माहिती भरून झाल्यानंतर, तुम्हाला ‘B’ या भागाची माहिती भरायची आहे. ही माहिती भरताना, तुम्हाला  कोणत्या प्रकारचे किसान क्रेडिट कार्ड पाहिजे, तो प्रकार निवडायचा आहे. नवीन क्रेडिट कार्ड, त्याच बरोबर जुन्या क्रेडिट कार्डची कर्ज मर्यादा वाढवायची आहे? तसेच तुमचं कार्ड बंद पडलं आहे. अशा सर्व ऑप्शनची तुम्हाला योग्य माहिती भरणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्हाला किती रुपयांचे कर्ज हवं आहे, याचीदेखील माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे.

‘B’ या रकान्यातील संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला ‘C’ रकान्यामध्ये अर्जदाराचे नाव त्याचबरोबर तुमच्या ‘पीएम किसान सन्मान’ योजनेचे पैसे कोणत्या खात्यात जमा होतात, तो ‘अकाउंट’नंबर तुम्हाला टाकायचा आहे. यानंतर तुम्हाला D या रकान्यामध्ये तुमच्या कर्जाची संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे. यात तुम्ही कोणत्या बँकेकडून किती कर्ज घेतलं? शाखेचं नाव काय? घेतलेल्या कर्जाची रक्कम किती शिल्लक आहे? या संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्हाला लिहायची आहे.

‘D’ या रकान्यात संपूर्ण माहिती व्यवस्थित भरल्यानंतर,  तुम्हाला ‘E’ या रकान्यात तुमच्या जमिनी बद्दलची संपूर्ण माहिती द्यायची आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या गावाचं नाव, सर्वे नंबर/ गट नंबर तसेच जमीन तुमच्या मालकीची आहे की भाडेतत्त्वावर कसत आहात? याची देखील माहिती तुम्हाला द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला किती एकर शेती आहे? त्याचबरोबर त्या शेतीमध्ये कोणती पिके घेतली जातात? याबद्दल देखील तुम्हाला माहिती सबमिट करावी लागणार आहे.

‘E’ हा रकाना भरून झाल्यानंतर ‘F’ रकाना दिसेल, हा रकाना शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नसून,  मत्स्यपालन आणि पशुपालन शेतकऱ्यांसाठी असणार  आहे. त्यामुळे तुम्ही हा रकाना भरला नाही, तरीदेखील चालेल. मात्र जर तुम्ही वरील व्यवसाय करत असाल, तर यासंदर्भात ती सगळी माहिती तुम्हाला या रकान्यात भरावी लागेल. सगळी माहिती भरून झाल्यानंतर, तारण म्हणून काय ठेवणार आहे? याची देखील माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला सही करायची आहे. पुढे Acknowledgment हा रकाना बँकेसाठी असणार आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती भरायची नाही.

हा सगळा फॉर्म तुम्ही व्यवस्थित भरल्यानंतर याची प्रिंट काढून बँकेत घेऊन जावे लागणार आहे. या प्रिंट बरोबरच तुम्हाला तुमचा सात बारा आठ-अ  जोडावा लागणार आहे. यासोबतच तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही बँकेचे कर्ज घेतलं नसल्याचं शपथपत्र देखील जोडणं आवश्यक आहे. तसेच तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईजचे तीन फोटो, इत्यादी सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला बॅंकेत जावे लागणार आहे.

वरील सर्व कागदपत्रे ‘चेक’ करून, तुम्ही त्या कागदपत्राची एक पोच देखील तुमच्याकडे ठेवू शकता. यात बँक मॅनेजरची सही असणं आवश्यक आहे.  ही सर्व कागदपत्र तुम्ही बँकेत जमा केल्यानंतर संबंधित बँकेने तुमच्या पत्त्यावर दोन आठवड्यांमध्ये ‘किसान क्रेडिट कार्ड’ पाठवणं आवश्यक असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. किसान क्रेडिट कार्डची वैधता ही पाच वर्षे असते, मात्र तरीदेखील तुम्हाला प्रत्येक वर्षी हे कार्ड रिन्यू करावं  लागणार आहे.

आपण वरील पाहिलेली सगळी प्रक्रिया ही पीएम किसान योजनेच्या लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आहे, हे लक्षात घ्या. अनेकांच्या मनात आता प्रश्न आला असेल, जर आम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी नसेल, तर आम्हाला किसान क्रेडिट कार्ड मिळणार नाही का? तर असं अजिबात नाही, तुम्हाला देखील किसान क्रेडिट कार्ड मिळणार आहे. यासाठी तुम्हाला बँकेत दुसरा एक फॉर्म दिला जाईल, जो तुम्ही व्यवस्थित भरून जमा करणं आवश्यक आहे.

आपण पाहिलेली सर्व प्रक्रिया ही ऑफलाईन अर्जासंदर्भातली  पाहिली. आता तुम्ही ऑनलाईन देखील किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी अप्लाय करू शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला स्वत:च अर्ज करता येणार नाही‌.  त्यासाठी तुम्हाला जवळच्या Common Service Centre म्हणजेच आपले सेवा केंद्रावर जाऊन अप्लाय करावा लागणार आहे. यासाठी तुम्हाला काही शुल्क देखील आकारण्यात येऊ शकतो.

आतापर्यंत आपण किसान क्रेडिट कार्ड कसं काढायचं हे पाहिलं. आता या किसान क्रेडिट कार्डामुळे शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे? किती कर्ज मिळणार आहे?  हे देखील पाहू..

‘किसान क्रेडिट कार्ड’ अंतर्गत शेतकऱ्यांना किती क्षेत्र आहे? त्याचे उत्पन्न किती आहे? क्षेत्र कोणत्या प्रकारचं आहे? या संदर्भात अभ्यास करून कर्ज वाटप केलं जातं. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्ज देण्याची मुभा आहे. तुम्ही भरलेल्या वरील फॉर्मवर काहीतरी तारण ठेवलेलं असेल, मात्र जर तुम्ही 1 लाख साठ हजार रुपयांपर्यंत कर्ज घेत असाल, तर तुम्हाला यासाठी कोणत्याही प्रकारचे तारण ठेवावे लागणार नाही.  शेतकऱ्यांना हे कर्ज सात रुपये टक्क्यांनी दिले जाते. मात्र जर तुम्ही घेतलेल्या कर्जाची परतफेड एका वर्षाच्या आत करणार असाल, तर तुम्हाला या व्याजात सवलत मिळणार आहे.

एका वर्षाच्या आत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केवळ चार टक्के व्याजदर आकारण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी जर एक लाख रुपयाचे कर्ज घेतलं, तर हे बिनव्याजी कर्ज असणार आहे. या व्यतिरिक्त किसान क्रेडिट कार्ड घेणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने विमा देखील जाहीर केला आहे. जर तुम्ही या क्रेडिट कार्ड अंतर्गत लोन घेतलं असेल, आणि तुमचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास, तुम्हाला पन्नास हजार रुपयांचा विमा देखील मिळणार आहे.

(या संदर्भातली कुठलीही अडचण येत असेल, तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता)

हे देखील वाचा Ration card:केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्यय;ही आहे रेशन कार्ड धारकांसाठी खूशखबर असं करा आधार कार्डशी रेशनकार्ड लिंक आणि..

Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत..

रेशनची पावती मिळत नाही? चिंता करू नका असा चेक करा दर महिन्याला मिळालेला माल अन् उठवा रेशन दुकानदारचा बाजार..

Aadhar card update: लग्नानंतर बदललेलं नाव आधारकार्डवर अपडेट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत

Gudipadwa ; ही आहे गुढीपाडवा उभारण्याची योग्य पद्धत; गुढीपाडव्याविषयी जाणून घ्या अधिक..

प्रधानमंत्री आवास योजना: घरबसल्या तुमच्या मोबाईलवर अशी पहा घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची यादी..

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! घरबसल्या मोबाईलवर असा पहा फेरफार उतारा अगदी सोप्या भाषेत..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.