IPL 2022: ‘या’ कारणामुळे महेंद्रसिंग धोनीने दिला चेन्नई संघाच्या ‘कॅप्टन’ पदाचा राजीनामा; धोनीचा हा शेवटचा हंगाम, वाचा सविस्तर..

Mahendra Singh Dhoni resign captaincy: कॅप्टन कूल म्हणून जगभरात ओळखल्या जाणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने अचानक चेन्नई सुपर किंग्स (chennai super kings) संघाच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिल्याने, क्रिकेट चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. खासकरून महेंद्र सिंग धोनीच्या चाहत्यांना हा मोठा धक्का बसला असून, आता यापुढे महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग संघाचा कर्णधार नसणार आहे. चेन्नई सुपर किंग संघाचे कर्णधारपद रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja is a new captain for CSK) देण्यात आले असल्याचे चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या ट्विटर करून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाच्या कर्णधार पदावरून महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) राजीनामा देणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आज अचानक महेंद्रसिंग धोनीने राजीनामा देऊन, आपल्या चाहत्यांना एक प्रकारे धक्का दिला आहे. चेन्नई सुपर किंग संघाचा आगामी कर्णधार रवींद्र जडेजा करण्यात आले आहे. महेंद्रसिंग धोनीने फक्त आपल्या कर्णधार पदाचाच राजीनामा दिला नाही, तर कदाचित हा त्याचा शेवटचा हंगाम असू शकतो, असंसे देखील आता बोललं जाऊ लागलं आहे. महेंद्रसिंग धोनी हा अचानक निर्णय घेण्यासाठी ओळखला जातो. यापूर्वी देखील महत्त्वाच्या पदावरून अचानकपणे राजीनामा देऊन, क्रिकेट चाहत्यांना धोनीने धक्के दिल्याचे पाहायला मिळाले आहे.

धोनीच्या फॅन्स आणि क्रिकेट चाहत्यांमध्ये धोनीने अचानक कर्णधार पदाचा राजीनामा का दिला? अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. मात्र अचानक धोनीने राजीनामा देण्याचे कारण म्हणजे, वाढत्या वयामुळे महेंद्रसिंग धोनी आगामी काळात चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग असेल, की नाही याविषयी ठामपणे सांगता येत नसल्याने, धोनीच्या नेतृत्वात आता चेन्नई सुपर किंग संघ एक उत्तम कर्णधार तयार करत असल्याचे बोलले जात आहे. जोपर्यंत महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग संघाबरोबर आहे, तोपर्यंतच धोनीच्या मार्गदर्शनाखाली चेन्नईला एक उत्कृष्ट कर्णधार मिळावा, अशी संघ मालकाची इच्छा असल्याचे, देखील बोललं जात आहे.

आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग संघ महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात सर्वाधिकवेळा फायनलमध्ये पोहचला आहे. ‘डॅडी’आर्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेन्नई सुपर किंग संघाने अनेक क्रिकेट विश्लेषकांचा, अंदाज चुकत गेल्यावर्षी फायनलमध्ये धडक मारली. आणि विजेतेपदाला गवसणी देखील घातली. या संघात विशेष असे कोणते खेळाडू नसले, तरी महेंद्रसिंग धोनीचा अनुभव आणि क्रिकेटचे अचुक डावपेच, यामुळे महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग संघाला फायनल जिंकून दिला. महेंद्रसिंग धोनीने केलेल्या कामगिरीमुळे आणखी काही हंगाम महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग संघाचा कर्णधार म्हणून भूमिका बजावेल, असं अनेक क्रिकेट चाहत्यांना वाटत होतं.

मात्र धोनी हा एक उत्कृष्ट कर्णधाराबरोबर एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणूनही ओळखला जातो. कुठल्या पदावरून कधी पायउतार व्हायचं, हे त्याच्यापेक्षा जास्त कोणालाही समजणार नाही, असंही बोललं जातं. संघाच्या हितासाठी जे काही करायचं ते धोनी नेहमी करतो. वैयक्तीक स्वार्थ बाजूला सारून, धोनी नेहमी आपल्या संघासाठी जे योग्य आहे, त्याचाच विचार करतो. कुठल्याही खेळात भावनिक होऊन चालत नसतं, तुम्हाला प्रॅक्टिकलवरच विचार करावा लागतो, असं धोनी अनेकवेळा म्हणाला आहे. आता देखील धोनीने भावनिक न होता संघाच्या आगामी बांधणीसाठी कर्णधार पदाचा राजीनामा दिला असल्याचं बोललं जात आहे.

धोनीने चेन्नई सुपर किंग संघाचा राजीनामा दिला असला तरी, तो आपल्या संघासाठी बॅट्समन आणि विकेटकीपरच्या भूमिकेत खेळत राहणार असल्याचे चेन्नई सुपर किंग संघाच्या अधिकृत हँडलवरून सांगण्यात आले आहे. मात्र यात काहीही तथ्य नसल्याचं बोललं जात आहे. धोनीने आत्तापर्यंत घेतलेले सगळे निर्णय अचानक घेतले असून, धोनीचा हा हंगाम देखील शेवटचा हंगाम होणार असल्याचं क्रिकेट वर्तुळात बोललं जात आहे. धोनी आता रवींद्र जडेजाच्या नेतृत्वात खेळणार असून, कॅप्टन पदाचे अनेक डावपेच तो रवींद्र जडेजाला शिकवणार आहे.

अचानक निर्णय घेण्यात धोनी मातब्बर

लाईम लाईट पासून नेहमी लांब राहणारा एम एस धोनी जगभरात कमालीचा लोकप्रिय आहे. चिमुकल्यांपासून मोठ्यांपर्यंत देखील धोनीची प्रचंड मोठी क्रेझ असल्याचं पाहायला मिळतं. धोनी सोशल मीडिया पासून नेहमी लांब असतो, मात्र तरी देखील त्याची लोकप्रियता काही कमी झाली नाही. कुठलाही निर्णय अचानक घेण्यात धोनी मातब्बर आहे. भारतीय कसोटी संघातून देखील धोनीने अचानक निवृत्ती जाहीर केली होती. एवढंच नाही तर महेंद्रसिंग धोनीने भारतीय संघाच्या कॅप्टन पदाचा राजीनामा देखील अचानकच दिला होता. आज चेन्नई सुपर किंग संघाचे कर्णधारपद देखील अचानक सोडून, धोनीने पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना खासकरून आपल्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.

हे देखील वाचा.रैना’ला नाकारल्याने, एक लाख चाहत्यांनी चेन्नईला अनफॉलो केलंय; यावर काय म्हणाला धोनी..

धोनी आणि रैनाचं का बिनसलं? ‘या’ कारणामुळे धोनीने रैनाला केलं दुर..

PM Yojna: ‘या’ योजनेअंतर्गत मिळतेय मोफत शिलाई मशीन; कसा करायचा अॉनलाईन अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत…

Viral Video: चार वाघांना एकटं माकड पुरून उरलं; व्हायरल व्हिडिओ पाहून….

Viral video: रस्त्याने जात असताना म्हताऱ्याचा किडा वळवळला; विनाकारण बैलाला मारली काठी अन्.. पहा व्हायरल व्हिडिओ..

डोळ्यात पाणी आणणारा व्हिडिओ; माकडाच्या तोंडात तोंड घालून टॅक्सी चालकानं वाचवला जिव, डोळे उघडताच माकडाने मारली मीठी..

Ration Card Update: रेशनकार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करायचंय? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत…

सेक्स विषयी मॅच्युअर्ड असणाऱ्या पुरुषांकडेच मुली जास्त आकर्षित होतात, आणि संबंधही ठेवतात; पण का? वाचा सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.