धोनी आणि रैनाचं का बिनसलं? ‘या’ कारणामुळे धोनीने ‘रैना’ला केलं दुर

0

आयपीएल २०२२चा (IPL auction 2022) मेघा लिलाव नुकताच पार पडला. यावर्षी आयपीएलमध्ये दोन नवीन संघ प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याने काही महत्त्वाच्या खेळाडूंना प्रचंड मोठी रक्कम मिळाली. एकीकडे अनेकांना मोठी रक्कम मिळाली असली तरी, दुसरीकडे आयपीएलच्या इतिहासात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंना खरेदीदारही मिळाला नाही. त्यातलंच एक महत्त्वाचं नाव म्हणजे सुरेश रैना. (Suresh Raina)

गेल्या दशकापासून चेन्नई सुपर किंग संघाकडून खेळताना सुरेश रैनाने ‘मिस्टर आयपीएल’ म्हणून आपली ओळख निर्माण केली. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग संघाने जे काही अचीवमेंट केले आहे, त्यात सुरेश रैनाचे खूप मोठे योगदान आहे. चेन्नईच्या अनेक महत्वाच्या विजयात सुरेश रैनाने केलेली ऐतिहासिक कामगिरी कोणीही नाकारू शकणार नाही. मात्र यावेळी सुरेश रैनाला कोणीही खरीदार मिळाला नसल्याने, अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

दोन कोटी बेस प्राईज ठेवण्यात आलेल्या सुरेश रैनाला कोणीही खरेदी केले नाही, हे एकवेळ ठीक आहे. मात्र एवढी वर्ष चेन्नई सुपर किंग संघाला सुरेश रैनाने जे योगदान दिले आहे, हे कधीही न विसरण्यासारखं आहे. म्हणून किमान चेन्नई सुपर किंग संघाने, तरी सुरेश रैनाला आपल्या संघात घ्यायला हवं होतं, असं अनेकांनी म्हटलं. एवढंच नाही तर धोनीच्या खूप जवळचा असणाऱ्या सुरेश रैनाला महेंद्रसिंग धोनीने देखील का नाकारलं, दोघांमध्ये काहीतरी बिनसलं आहे, अशाही चर्चाही रंगू लागल्या.

दुबईमध्ये झालेल्या आयपीएल 2020 च्या हंगामात सुरेश रैनाने कोव्हीड मुळे माघार घेतली होती. सुरेश रैनाने ऐन वेळी माघार घेतल्याने, अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. चेन्नई सुपर किंगला याचा खूप मोठा फटका देखील बसला. चेन्नई सुपर किंग संघ साखळीतच गारद झाल्याचं पाहायला मिळालं. ऐनवेळी सुरेश रैनाने आयपीएलमधून माघार घेतल्याने फ्रॅंचायजी विषयी आणि कॅप्टन विषयी असणारी आपली विश्वासार्हता कमी करून घेतली, असं आता बोलण्यात येत आहे.

आयपीएल 2020 मध्ये सुरेश रैनाने ऐनवेळी वेळी माघार घेतल्याने, फ्रॅंचाईजी आणि कॅप्टन विषयी आपली विश्वासार्हता कमी करून घेतली. आणि म्हणून या वेळेस होणाऱ्या आयपीएलमध्ये सुरेश रैनाला चेन्नई सुपर किंग संघाने खरेदी केलं नसल्याचं बोललं जात आहे. जो खेळाडू आपल्या मालकाला आणि कॅप्टनला ऐनवेळी संकटात टाकतो, तो आपल्या संघाच्या काय कामाचा असं आता सोशल मीडियावर बोललं जातं आहे‌.

या हंगामात सुरेश रैनाला कोणीही खरेदी केलं नाही, या प्रकरणावर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने याविषयी अद्याप काहीही भाष्य केलं नाही. मात्र सुरेश रैनाला नाकारण्यात महेंद्रसिंग धोनीचा खूप मोठा हात असल्याचे देखील बोलले जात आहे. जर महेंद्रसिंग धोनीने आग्रह केला असता, तर सुरेश रैनाला नाकारण्याची कोणाचीही हिंमत झाली नसती. असं देखील बोललं जातं आहे‌.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.