Xiaomi: चा नवीन धमाका! २५ हजार किंमत असणाऱ्या स्मार्टफोनचा उठला बाजार; 6000mAh बॅटरी 50MP कॅमेरा असणारा फोन केवळ..
Xiaomi mobile phone: शाओमीच्या रेडमी या ब्रँडने खूप कमी काळात ग्राहकांच्या मनात आपले नाव कोरण्यात यश मिळवले. नवनवीन स्मार्टफोन बाजारात आणत ग्राहकांना अनेक ऑप्शन या ब्रँडने दिले. ग्राहकांना परवडेल अशा किंमतीत आकर्षक आणि भन्नाट फीचर्स असणारे अनेक स्मार्ट फोन रेडमीने बाजारात आणल्याने, या ब्रॅंडचा मोठा ग्राहकवर्ग निर्माण झाला. कमी किंमतीत जास्त फीचर्स, भन्नाट कॅमेरा आणि आकर्षक फोनमुळे या कंपनीने ग्राहकांच्या मनावर राज्य केले. रेडमी बाजारात आल्यानंतर अनेक स्मार्टफोन (smartphone) कंपनीच्या किंमतीत चांगलीच घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा रेडमीने अनेक कंपनीचा बाजार उठवला आहे.
Redmi आता आपला नवीन स्मार्ट फोन भारतात लाँच केला आहे. या फोनमुळे आता अनेक मोबाईलचा बाजार उठलाय. शाओमीने (xiaomi) रेडमी10 हा स्मार्टफोन भारताच्या भेटीला आणला आहे. हा फोन आता ज्या मोबाईलच्या किंमती पंचवीस हजार आहेत, अशा मोबाइल फोनचा बाजार उठवणार आहे. रेडमीने अगदी कमी किमतीमध्ये जबरदस्त फीचर्स दिल्याने, आता अनेकजण हाच स्मार्टफोन परचेंस करताना पाहायला मिळतात.
प्रत्येकजण स्मार्टफोन खरेदी करताना लाँग बॅटरी जबदस्त कॅमेरा, आणि भन्नाट प्रोसेसर हे फीचर्स तर प्रत्येकालाच हवे असतात. मात्र आता शाओमीने अशा अनेक फीचर्ससह आणखीन जबरदस्त फीचर्स redmi 10 या स्मार्टफोनमधून आपल्या ग्राहकांच्या भेटीला आणले आहे. redmi 10 हा स्मार्टफोन भारतात लाँच झाला असून, हा फोन 24 मार्च पासून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. कंपनीने या फोनची बॅटरी ही 6000mAh एवढी तगडी दिली आहे. त्याचबरोबर १८ वॅटची ही बॅटरी असल्याने फास्ट चार्जिंगची सुविधा मिळणार आहे. त्याचबरोबर redmi 10 या स्मार्टफोनचा कॅमेरा देखील 50MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह देण्यात आहे. या फोनची किंमत आणि फीचर्स विषयी आपण अधिक जाणून घेऊया.
स्टोरेज आणि प्रोसेसर
स्मार्टफोन खरेदी करताना अनेकजण स्मार्ट कॅमेरा, हाई बॅकअप बॅटरी, यासह स्टोरेजचा देखील अनेकजण विचार करतात. अलीकडच्या काळात स्टोरेज खूप महत्वाचं ठरतं असल्याचे पाहायला मिळते. आणि म्हणून redmi 10 या smartphone ने ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज त्याच बरोबर 6 जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज वेरियंटमध्ये देखील आपला हा स्मार्टफोन लाँच केला आहे. त्याबरोबरच क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन असणारा ६८० प्रोसेसर देखील कंपनीने आपल्या ग्राहकांच्या भेटीला आणला आहे. या प्रोसेसरमुळे आता ग्राहकांना मोबाईलच्या स्मूतनेस विषयी तक्रार करण्याची संधी मिळणार नाही.
भन्नाट डिस्प्ले
शाओमी या स्मार्टफोन मोबाइल कंपनीने आपल्या नवीन रेडमी १० स्मार्टफोनचा डिस्प्ले खूपच जबरदस्त दिला आहे. या फोनचा डिस्प्ले ६.७१ इंच एचडी त्याचबरोबर एलसीडी डिस्प्ले दिला गेला आहे. तसेच पिक्सेल रिझोल्यूशनसह १५००*७२० असल्याने ग्राहकांना गेमिंग आणि व्हिडिओचा सर्वोत्तम फील येणार आहे. सोबतच स्क्रीनचे संरक्षण व्हावे यासाठी कंपनीने गोरिला ग्लास+ दिला आहे. यामुळे फोन अनेकवेळा पडला तरीदेखील डिस्प्लेचे संरक्षण आरामात होणार आहे.
सर्वोत्तम कॅमेरा
अलीकडच्या काळात स्मार्टफोन खरेदी करताना ग्राहक नेहमी कॅमेराचा विचार करत असतात. अलीकडच्या काळात फोटो, व्हिडिओ, रिल्स बनवण्यात ग्राहकांना अधिक रस असल्याचे जाणवत असल्याने, ही मंडळी प्रथम कॅमेराला प्राधान्य दिल्याचे दिसून येतात. आणि म्हणून, कंपनीने देखील या गोष्टी लक्षात ठेवून, रेडमी 10 या फोनचा कॅमेरा जबरदस्त बनवला आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 50MP प्रायमरी कॅमेरा दिला गेला आहे. जो ड्युअल रियर कॅमेरा setup सह देण्यात आला आहे. त्याचबरोबर 2MP डेप्थ सेन्सर देखील आहे. या फोनचा फ्रंट कॅमेरा देखील कमालीचा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंग करण्यासाठी तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये 5MP कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये पोर्ट्रेट मोड आणि नाईट मोड असे अनेक ऑप्शन देण्यात आले आहे.
तुमच्या बजेटमध्ये
स्मार्टफोन खरेदी करताना अनेक जण फीचर बरोबरच स्मार्टफोनच्या किंमतीचा देखील विचार करून स्मार्टफोन खरेदी करत असतात. कमी किंमतीत अनेक फीचर्स आणि स्टाइलिश लुक असणारा स्मार्टफोन प्रत्येकाला हवा हवासा असतो. मात्र एकाच फोनमध्ये हे सगळं मिळेल याची शक्यता फार कमी असते. आणि अनेकांना तडजोड करावी लागते. मात्र या फोनमध्ये तुम्हाला अजिबात ऍडजेस्टमेंट करावी लागणार नाही. किंमती पासून ते अनेक भन्नाट फीचर्स बरोबर या फोनला कमालीचा लूक देखील देण्यात आला आहे. या फोन संदर्भात अनेक फिचर्स विषयी आपण वरती बोललो आहे. मात्र आता आपण या फोनची किंमत किती आहे याविषयी जाणून घेऊयात.
तर हा स्मार्टफोन तुम्हाला 4G LTE, ड्युअल सिम सह येणार आहे. इतर स्मार्टफोन प्रमाणे यात देखील connectivity देण्यात आली आहे. ज्यात तुम्हाला, Wi-Fi ब्लूटूथ, GPS आणि USB टाइप सी पोर्टसह मिळतो. हा फोन तुम्हाला अनेक आकर्षक कलरमध्ये मिळणार आहे. हा स्मार्टफोन तुम्हाला पॅसिफिक ब्लू, मिडनाईट ब्लॅक, त्याचबरोबर कॅरिबियन ग्रीन या तीन रंगात मिळणार आहे. शाओमीने रेडमी १० हा स्मार्टफोन दोन प्रकारात लाँच केला आहे. एक ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंटमध्ये मिळणार आहे. तर दुसरा ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटचा असणार आहे.
४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंटमध्ये असणारा स्मार्टफोन तुम्हाला केवळ १०,९९९ रुपयांत मिळणार आहे. त्याचबरोबर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज वेरियंटमध्ये असणारा फोन तुम्हाला अवघ्या१२,९९९ रुपये रुपयांत मिळणार आहे. लोकांना हा फोन बाजारात कधी उपलब्ध होतोय याची उत्सुकता असेल, तर तुम्हाला जास्त वाट पाहावी लागणार नाही. येत्या 24 मार्च पासून तुम्ही हे दोन्हीं फोन खरेदी करू शकता. Flipkart.com आणि Mi.com वेबसाइटवरून तुम्ही याची खरेदी करू शकता. जर तुम्ही शएचडीएफसी बँक कार्डने फोन खरेदी केला तर तुम्हाला एक हजार अतिरिक्त सूट मिळणार आहे.
हे देखील वाचाा samsung Galaxy चा नवा धमाका; 108MP कॅमेऱ्यासह अनेक भन्नाट फिचर्स असणाऱ्या ‘या’ फोनने बाजारात केलाय कहर..
‘या’ दोन वेबसाइट्सनी फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनचा उठवला बाजार; निम्म्यापेक्षा कमी किमतीत विकतायत वस्तू..
‘या’ कारणांमुळे उडालाय उष्णतेता भडका; ..उन्हात ‘घ्या’ ही काळजी, अन्यथा उष्माघातामुळे होईल..
मोदींना जमलं नाही ते बजाज यांनी करून दाखवलं; शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ, वाचा सविस्तर
मोठी बातमी! ‘या’ योजेअंतर्गत प्रत्येक महिन्याला मिळणार तीन हजार; असा घ्या लाभ..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम