Indian Army Recruitment 2024: भारतीय सेनामध्ये 381 जागांसाठी मेगा भरती; कोणाला करता येणार अर्ज? वाचा सविस्तर..

0

Indian Army Recruitment 2024 : भारतीय सैन्य शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत मेगा भरती निघाली असून, या संदर्भातली अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एकूण 381 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 21 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करावा लागणार आहे. जाणून घेऊया, या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर..

भारतीय सैन्य शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत 381 81 रिक्त जागांसाठी केल्या जाणाऱ्या भरतीसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आणि पदानुसार जागांची संख्या पाहू सविस्तर.

SSC (T)-63 आणि SSCW (T) 34 या पदासाठी एकूण 379 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा संबंधित विषयामध्ये इंजिनिअरिंग पदवी संपादन केलेला असणे आवश्यक आहे. किंवा उमेदवार इंजीनियरिंगच्या शेवटच्या वर्षामध्ये शिकत असेल तरीदेखील अर्ज करता येणार आहे.

SSC (W) टेक या पदासाठी 1 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यासाठी उमेदवाराने कुठल्याही शाखेमधील पदवी संपादन केलेली असणे आवश्यक आहे. SSC(W) (नॉन टेक) या पदासाठी एक रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यासाठी उमेदवार B.E/B.Tech पदवी संपादन केलेला असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा/ परीक्षा फी

भारतीय सैन्य शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत केल्या जाणाऱ्या भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे, यामध्ये उमेदवारचे वय 32 ठेवण्यात आले आहे. सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सुट दिली जाणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.

पगार/अर्ज प्रक्रिया

भारतीय सैन्य शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत निवड करण्यात येणाऱ्या उमेदवाराला दरमहा 56 हजार 100 ते 2 लाख 50 हजार रुपये पगार दिला जाणार आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असणार आहे. इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. यासाठी आपल्या मोबाईल मधील क्रोमवर जाऊन https://www.indianarmy.nic.in/home असं सर्च करायचं आहे.

त्यांनतर अधिकृत वेबसाईट ओपन होईल. खाली स्क्रोल केल्यानंतर, सविस्तर अर्ज करू शकता. डायरेक्ट अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करा. डायरेक्ट अर्ज करण्यासाठी यावर क्लिक करा.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा..

हे देखील वाचा Smriti Mandhana marriage date: स्मृती मंधानाचं ठरलं! या व्यक्तीबरोबर करणार शाही विवाह सोहळा..

Right age to get married: लग्न करणाऱ्या प्रत्येक मुला-मुलींना लग्नाचे हे योग्य वय माहीत असायलाच हवे, अन्यथा..

IND vs ENG 1St test: ओली पोपच्या वादळात भारत उध्वस्त; त्या कारणामुळे इंग्लंड विजयाच्या उंबरठ्यावर..

NMMC Recruitment 2024: या उमेदवारांसाठी 110 जागांची भरती; जाणून घ्या डिटेल्स आणि असा करा अर्ज..

Mumbai Customs Recruitment 2024: दहावी पास उमेदवारांसाठी या विभागात मेगा भरती; 63 हजार पगार, वाचा सविस्तर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.