WI vs IND Test Series: विराट कोहलीच्या नेतृत्वात BCCI ने कसोटी संघ केला जाहीर; पुजारासह या खेळाडूंना मिळाला डच्चू, तर गिल उपकर्णधार..

0

WI vs IND Test Series: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC final 2023) झालेल्या पराभवानंतर, आता भारतीय संघ (indian team) वेस्टइंडीज दौऱ्यावर (west indies tour) जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी20 सामने खेळणार आहे. 12 जुलैपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. वेस्टइंडीज दौऱ्यापासून भारतीय संघ आगामी 2023/25 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला सुरुवात करणार आहे.

दहा वर्षापासून भारतीय संघाला अद्याप आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. गेल्या वेळेस देखील भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहचला होता. मात्र न्युझीलंड संघाकडून भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. साहजिकच भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याचा अनुभव होता. मात्र भारतीय संघाला या अनुभवाचा फायदा उचलता आला नाही. भारत या सामन्यात पहिल्याच दिवशी बॅकफूटवर गेला. तो परत सामन्यात आलाच नाही.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये अनेक अनुभवी खेळाडूंनी सुमार खेळाचे प्रदर्शन केलं. यामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) विराट कोहली (Virat Kohli) चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) शुभमन गिल (Shubman Gill) या आघाडी फलंदाजांचा देखील समावेश आहे. वेस्टइंडीज विरुद्ध (West Indies vs INDIA test series) होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी संघात अनेक बदल होणार अशी चर्चा असतानाच, बीसीसीआयने (BCCI) कसोटीसाठीचा संघ जाहीर केला.

महत्वाचे म्हणजे, बीसीसीआयने जाहीर केलेल्या संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे (Virat Kohli) देण्यात आले आहे. विराट कोहली या कसोटी संघाचे नेतृत्व करणार असून, चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) या संघातून वगळण्यात आले आहे. चेतेश्वर पुजाराबरोबर मोहम्मद शमी, रोहित शर्मा, अक्षर पटेल देखील या संघाचा भाग नसणार आहेत.

बीसीसीआयने निवडलेल्या संघामध्ये विराट कोहली कर्णधार, तर शुभमन गिलला उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सोबतच काही नवीन खेळाडूंना देखील पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. यामध्ये यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, उमरान मलिक, सरफराज खान, प्रसिद्ध कृष्णा यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या अजिंक्य राहणेचा (ajinkya Rahane) देखील या दौऱ्यात संधी देण्यात आली आहे. रहाणे बरोबर केएस भरतला पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. कुलदीप यादवची देखील या दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. मात्र बीसीसीआयने निडलेला हा संघ बीसीसीआय फेक अकाउंटवरून निवडलेला आहे. मात्र हे ट्विटर अकाऊंट इतकं हुबेहूब आहे, की कोणाला शंका देखील येणार नाही. या संघात शार्दुल ठाकूर, रविंद्र जडेजा, आर अश्विन, इशान किशन तसेच मोहम्मद सिराज यांनाही संधी दिली आहे.

हे देखील वाचा Success Story: शाब्बास लाल केळीतून 35 लाख उत्पन्न, वाचा इंजिनियर तरुणाची यशोगाथा..

Darshana Pawar murder Case: ..म्हणून या किरकोळ कारणासाठी डिलिव्हरी बॉयनेच संपवलं दर्शना पवारला..

Chanakya Niti on Humanity: या चार लोकांची साथ वेळीच सोडा, नाहीतर आयुष्य उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही..

Monkey drinking alcohol video: पट्ट्याने माकडाला पाजली तब्बल दोन पेग दारू; पाहा व्हिडिओ..

Dilip Vengsarkar: ..म्हणून धोनीला विराट भारतीय संघात नको होता; निवड समिती अध्यक्षांच्या खुलाशाने खळबळ..

Lust Stories 2 trailer: इंटीमेट सीन्सचा भरणा असणारा आणखी एक ट्रेलर रिलीज; तमन्नाने पार केल्या साऱ्या सीमा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.