Best Mileage Bike: या चार टू व्हीलरला आहे सर्वात जास्त मायलेज; किंमतही आहे कमी..

0

Best Mileage Bike: प्रत्येकाला मजबुत आणि दर्जेदार टू व्हीलर खरेदी करायची असते. मात्र फक्त मजबूत आणि दर्जेदार टू व्हीलर असून चालत नाही. याबरोबरच मायलेज देखील दमदार असावं लागतं. तरच आपण गाडी विकत घेण्यास प्राधान्य देतो. तुम्हाला जर ऑफिस किंवा कामानिमित्त सारखं फिरावं लागत असेल तर यासाठी गाडीचे मायलेज खूप महत्त्वपूर्ण ठरतं. आणि म्हणून आम्ही तुम्हाला अशा चार बाइक विषयी सांगणार आहोत, ज्यांचे मायलेज दमदार आहे.

मजबूत आणि दर्जेदार गाडीबरोबर मायलेज देखील दमदार सोबत किंमत देखील कमी असणाऱ्या टू व्हीलरचा शोध प्रत्येकाला असतो. नवीन गाडी खरेदी करताना अनेकजण या सर्व बाबी विचारात घेऊनच, गाडी खरेदी करण्याचा विचार करतात. जर तुम्ही देखील मजबुती बरोबर दमदार मायलेज आणि कमी किंमतीची टू-व्हीलर खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

TVS स्पोर्ट

टीव्हीएस स्पोर्ट (TVS Sports) ही टू-व्हीलर बाजारामध्ये सर्वाधिक पसंत केलेली बाईक आहे. दमदार मायलेज बरोबर मजबुती देखील ही गाडी प्रदान करत असल्याने, ग्राहकांच्या देखील पसंतीस उतरली आहे. या टू-व्हीलरमध्ये 109.7cc BS6 इंजिन आहे. या टू व्हीलरमध्ये असलेले, हे इंजिन 8.18 bhp पॉवर त्याचबरोबर 8.7 NM टॉर्क जनरेट करते. विशेष म्हणजे, ही टू व्हीलर तुम्हाला दोन ड्रम ब्रेकसह मिळते.

एकूण सात कलरमध्ये ही बाइक उपलब्ध असून, या बाइकचे तीन प्रकार करण्यात आले आहेत. या टू व्हीलरची किंमत जाणून घ्यायची झाल्यास, 61 हजार पासून 67 हजारापर्यंत एक्स-शोरूम किंमत ठेवण्यात आली आहे. कंपनीने या बाइला तब्बल 70 किलोमीटर पर लिटर मायलेज देत असल्याचा दावा केला आहे. या गाडीच्या पेट्रोल टाकीची क्षमता दहा लिटर आहे.

Hero HF Deluxe

गेल्या आर्थिक वर्षामध्ये सर्वाधिक विकल्या गेलेली टू-व्हीलरच्या यादीमध्ये ही बाइक तिसऱ्या क्रमांकावर येते. Hero HF Deluxe या टू-व्हीलरमध्ये ग्राहकांना 97.2cc BS6 इंजिन मिळते. हे इंजिन 7.91bhp पॉवर जनरेट करते. सोबतच 8.05Nm टॉर्क निर्माण करते. का नाही गाडी एकूण पाच प्रकारांमध्ये आणि दहा कलरमध्ये खरेदी करता येते. या गाडीची एक शोरूम किंमत 55 हजार 22 रुपये ते 67178 रुपये कंपनीने ठेवली आहे. या गाडीचे पर लिटर मायलेज, 65kmpl आहे.

Honda SP 125 

जर तुम्ही होंडा मोटर कंपनीचे चाहते असाल, तर तुमच्यासाठी ही बाईक खूप फायदेशीर आहे. मजबूती बरोबर तुम्हाला ही बाइक चांगले मायलेज देखील देते. या टू-व्हीलरला 124cc BS6 इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन10.72bhp पॉवर त्याचबरोबर 10.9NM टॉर्क देण्याचे काम करते.

समोर आणि पाठीमागील बाजूस या बाइकला ड्रम ब्रेक सिस्टीम देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, एकत्रित ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे. ही टू व्हीलर तुम्हाला दोन प्रकारात आणि पाच कलरमध्ये खरेदी करता येते. या टू-व्हीलरची एक्स शोरूम प्राईज 83 हजार 88 रूपये ते 69 हजार 700 रुपयांपर्यंत देण्यात आली आहे. कंपनीचे या गाडीला 65kmpl मायलेज दिले आहे .

Honda livo

होंडा कंपनीची आणखी एक दर्जेदार आणि जबरदस्त मायलेज देणारी टू-व्हीलर तुम्ही खरेदी करू शकता. ‘होंडा लिवो’ असं या टू-व्हीलरचं नाव आहे. तुम्हाला दोन प्रकारांमध्ये आणि चार कलरमध्ये ही बाइक खरेदी करता येते. या बाइकची किंमत 75 हजार रुपयांपासून सुरू होते. कंपनीने या गाडीला 60 किलोमीटर पर लिटर मायलेज दिले आहे. या टू व्हीलरला 109.51cc BS6 इंजिन देण्यात आले आहे.

 हे देखील वाचा TATA electric bicycle: टाटाची सगळ्यात स्वस्त आणि दमदार सायकल बाजारात दाखल; किंमत आहे केवळ..

Simple Energy EV: ताशी 105 किमी प्रवास, एका चार्जमध्ये 236 किमी रेंज, किंमत फक्त इतकी..; जाणून घ्या या दमदार इलेक्ट्रिक स्कूटर विषयी..

Mango eating tips: 80 टक्के लोकांना आंबा खाण्याची ही योग्य पद्धत माहितीच नाही; लगेच जाणून घ्या अन्यथा..

SBI e-mudra loan: स्टेट बँकेत अकाऊंट आहे? लगेच करा अर्ज घर-बसल्या मिळेल दोन लाख कर्ज..

IPL 2023: आयपीएलला गालबोट! दिल्लीच्या खेळाडूने पार्टीत महिलेसोबत केले ते विचित्र अश्लील कृत्य; ..तर करार होणार रद्द.. 

IRCTC Tatkal Ticket Booking: रेल्वेचे तत्काळ तिकीट या ठिकाणी करा बूक, अन्यथा होईल मोठी अडचण

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.