Sikandar Shaikh: मोठा निर्णय! सिकंदर वरील अन्यायामुळे पुन्हा रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार..

0

Sikandar Shaikh: दरवर्षी मोठ्या ऊत्साहात महाराष्ट्र केसरी (maharashtra Kesari) कुस्ती (wrestling) स्पर्धा पार पडते. मात्र यंदाची स्पर्धा चांगलीच चर्चेत आली आहे. यंदाच्या स्पर्धेत शिवराज राक्षे (Shivraj rakshe) या कुस्तीगिराने महाराष्ट्र केसरीचा सन्मान मिळवला. मात्र अद्यापही सिकंदर शेख या खेळाडूचेच नाव चर्चेत आहे. सेमी फायनल सामन्यात सिकंदर शेखचा महेंद्र गायकवाड (Mahendra gaykwad) या खेळाडूने पराभव केला. परंतू अनेकांना हा पराभव मान्य नाही. पंचाच्या चुकीच्या निर्णयाने सिंकदर शेख पराभूत झाला. सिकंदर शेखवर अन्याय झाला असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. त्यामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवरुन चांगलाच वाद पेटला आहे.

अजूनही सोशल मिडीयावर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचीच चर्चा सुरु आहे. पंचाच्या चुकीच्या निर्णयाने सिकंदर शेखचा पराभव झाला. अन्यथा तोच महाराष्ट्र केसरीचा खरा दावेदार होता. त्यामुळे सिकंदरवर अन्याय झाला असल्याचे मत व्यक्त केलं जात आहे. तसेच दुसरीकडे पंचाचा निर्णय अंतिम असल्याचे सांगत प्रतिवाद केला जात आहे. त्यामुळे हा वाद आता चांगलाच पेटला आहे. सिकंदरचे चाहते दिवसेंदिवस आक्रमक होत आहेत. सिकंदरला संधी देण्याची मागनी होत आहे. मात्र स्पर्धा संपल्यानंतर हे अशक्य आहे. परंतू हा वाद मिटवण्यासाठी काही कुस्तीप्रेमींनी मधला मार्ग काढला आहे.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात लढत झाली होती. या लढतीमध्ये पैलवान महेंद्र गायकडवाड याने टांग डाव मारली. परंतू तो डाव पूर्णपणे लागला नसताना सुद्धा महेंद्र गायकवडला पंचाकडून चार गुण देण्यात आले. जिथे दोन गुण देण्याचीच गरज होती. असे मत काही कुस्ती तज्ज्ञांनी मांडले. या सामन्यात पैलवान सिकंदर शेखचा पराभव झाला. पंचाच्या चुकीच्या निर्णयानेच सिकंदरचा पराभव झाला असल्याने अनेकांनी हा पराभव अयोग्य ठरवला. पोलिस कर्मचारी पैलवान संग्राम कांबळे यांनी तर पंच मारुती सातव यांना फोन करुन धमकीच दिली. संग्राम कांबळे यांच्यावर याप्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला. काहींनी तर थेट आयोजकांवर आरोप केले. त्यामुळे स्पर्धा संपली असून सुद्धा हा वाद मात्र सुरुच आहे.

अशातच सांगलीतील अंबाबाई तालीमीने हा वाद मिटवण्यासाठी मधला मार्ग सुचवला आहे. सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात पुन्हा सामना घेण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. अंबाबाई तालीमीच्या या निर्णयाचे सोशल मिडीयावर स्वागत केल जात आहे. संजय ही लढाई करण्यासाठी आता सिकंदर तयार देखील झाला आहे. दुसरीकडे महेंद्र गायकवाड या पैलवानाकडून मात्र अद्याप यावर काहीही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. जर त्याच्याकडून होकार आला तर ही लढत महाराष्ट्राला पुन्हा पाहायला मिळणार आहे.

अंबाबाई तालीमीचे अध्यक्ष संजय भोकरे यांनी दोन्ही खेळाडूंना आवाहन केले आहे. आमच्या तालीमीच्यावतीने हा सामना घेण्यासाठी आम्ही तयार आहोत. तसेच या सामन्यामध्ये जो खेळाडू जिंकेल त्यास महाराष्ट्र केसरीच्या तोलामोलाची गदा देण्यात येईल अशी घोषणा संजय भोकरे यांनी केली. तसेच विजेत्यास महाराष्ट्र महाकेसरी या किताबाने गौरवण्यात येईल असे देखील त्यांनी जाहीर केले.

सोशल मिडीयावर या घोषणेचे स्वागत करण्यात आले असून चाहत्यांकडून सिकंदरने पुन्हा एकदा सामना खेळण्याचे आवाहन केलं जात आहे. सिकंदर शेखने स्वत: सुद्धा त्याच्यावर अन्याय झाला असल्याचे मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे सिकंदर शेखने अंबाबाई तालीमचे अध्यक्ष संजय भोकरे यांच्या आवाहनास प्रतिसाद दिला आहे. सिकंदरने सामना खेळणार असल्याची तयारी दर्शवली आहे. मात्र महेंद्र गायकवाडकडून आतापर्यंत कोणतेही स्पष्टीकरण आले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा ही लढत रंगणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हे देखील वाचा Woman Needs: स्त्रियांना पुरुषाकडून असतात या अपेक्षा; स्त्रियांवर छाप पाडायची असेल या गोष्टी तुमच्याकडे हव्याच..

Kissing Tips: पहिलं kiss चुकलं तर होईल सत्यानाश; जाणून घ्या पहिल्यांदा किस करताना कोणती काळजी घ्यायची..

Rishabh Pant: क्रिकेट विश्वात खळबळ, ऋषभ पंतवर हे काय बोलून गेला रिकी पाँटिंग..

Wrestling Protest: खेळाडूंच्या रूम समोर रूम घेऊन, दरवाजा उघडा ठेऊन बृजभूषण सिंह करायचा हा घाणेरडे कृत्य..

Gautami Patil: गौतमी पाटील बाबतची ही गोष्ट जाणून तुम्हालाही बसेल धक्का..

Viral Video: भर रस्त्यावरच तरुणी आली खळीला; बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसून करू लागली घाणेरडा खेळ, पाहा व्हिडिओ..

Relationship tips: महिलांच्या या पाच अवयवांकडे पुरुष होतात सर्वाधिक आकर्षित; पाचवा आहे खूपच रंजक..

Amruta fadnavis: मुस्लिम मुलासोबत नवीन करिअर सुरू करणं अमृता फडणवीसांना चांगलंच भोवलं; पाहा काय झालं..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.